Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’10′आजारांना दूर करतील तुळशीचं पानं !

$
0
0

भारतीय  संस्कृतीमध्ये तुळशीचे महत्त्व जितके धार्मिक आहे तितकेच आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे आयुर्वेदिक उपचारांप्रमाणेच कित्येक समस्यांमध्ये तुळशीची पानं हा प्राथमिक उपचार म्हणून केला जातो. म्हणूनच या ’10′ समस्यांमध्ये तुम्ही तुळशीचं पानं नक्की उपचार म्हणून वापरू शकता.

  • ताप कमी करतो -

तुळशीमध्ये अ‍ॅन्टिबॅक्टेरियल, अ‍ॅन्टीफंगल गुणधर्म असल्याने शरीरातील संसर्ग दूर होण्यास मदत होते. व्हायरल इन्फेक्शनमुळे वाढलेला ताप कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमित 2-3 पानं चघळणे आरोग्यदायी आहे. तर तापामध्ये तुळशीच्या पानांचा काढा दर 2-3 तासांनी पिणे फायदेशीर आहे. प्रामुख्याने लहान मुलांना हा काढा देणे अत्यंत सुरक्षित आहे. तापाचा अशक्तपणा टाळणारे ’7′ सुपरफूड्स तुम्हांला ठाऊक आहेत का ?

  • मधूमेह नियंत्रित करते -

नैसर्गिकरित्या रक्तातील साखर  नियंत्रणात ठेवण्याचा पर्याय म्हणजे तुळसीची पानं ! तुळसीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक इन्सुलिनच्या कार्याला गती देतात. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय नक्की करून पहा.

  • हृद्याचे कार्य सुधारते -

तुळशीमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक रक्तदाब नियंत्रित करून घातक कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्यापोटी काही तुळशीची पानं चावून खाल्ल्यास हृद्यविकारांपासून तुमचा बचाव होतो तसेच त्रास कमी होण्यासही मदत होते. (‘विठ्ठल’ नामाचा जप सुधारतो हृदयाचे आरोग्य !)

  • ताण कमी होतो -

तुळशीच्या पानामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन नियंत्रित करण्यास मदत होते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची क्षमता सुधारते,फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी होतो.  त्यामुळे नियमित 10-12 पानं चघळल्यास नैसर्गिकरित्या शरीरातील ताण हलका होण्यास मदत होते.

  • मूतखड्यापासून आराम मिळतो –  

तुळशीचं पानं ही उत्तम डिटॉक्सिफायर असल्याने मुतखड्याचा त्रास नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमुळे मुतखडे नैसर्गिकरित्या विरघळतात तसेच वेदनाही कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच तुळशीच्या पानांचा रस मधासोबत सहा महिने घेतल्यास  मुतखड्याचा त्रास पूर्णपणे बरा होण्यास मदत होते. लिंबूपाण्यानेही किडनीस्टोन्स कमी होतात. 

  • कॅन्सरचा धोका कमी होतो -

तुळशीतील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटकांमुळे ब्रेस्ट कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरची शक्यता कमी होण्यास मदत होते. तुळशीमुळे अशा ट्युमरला होणारा रक्तपुरवठा रोखला जातो. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तुळशीचं पानं नियमित चघळा.

  • धुम्रपानाची सवय सोडण्यास मदत होते -

तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीस्ट्रेस घटक असल्याने धूम्रपानाची सवय मोडण्यास अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीची पानं चघळल्यास त्यातील मेंन्थॉलप्रमाणे आढळणारे कुलिंग घटक सिगारेट ओढण्याची इच्छा कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यातील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक पूर्वी धुम्रपानामुळे झालेल्या धमन्यांचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात. मैत्री, प्रेम आणि सिगारेट … , पण प्रेमात खरचं सारं माफ असतं ? वाचा ही सत्यकहाणी

  • त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते -

तुळशीच्या पानांमध्ये दूषित घटक दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यातील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टि फंगल गुणधर्मामुळे अ‍ॅक्ने आणि ब्रेकआऊट्सची समस्या कमी होण्यास मदत होते.टाळूवरील खाज कमी करण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी तुळशीची पूड खोबरेल तेलात मिसळून केसांना लावावा.

  • श्वसनाचे त्रास दूर होतात -

कफ,कोल्ड आणि श्वसनाचे विकार दूर करण्यासाठी तुळस फायदेशीर आहे. बॅक्टेरियामुळे श्वसनमार्गात निर्माण होणारे इन्फेक्शन दूर करण्यास तुळस फायदेशीर आहे.

  • डोकेदुखीचा त्रास कमी होतो –

मायग्रेन, सायनस यांमुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळस फायदेशीर आहे. तुळशीच्या काढ्याप्रमाणेच त्याची वाफ घेणे फायदेशीर आहे. अ‍ॅक्युप्रेशरच्या सहाय्याने मिनिटाभरात तुम्ही डोकेदुखीची समस्या दूर करू शकता.


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  10 ways tulsi or holy basil ​keeps you healthy​

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>