नाश्त्याला ब्रेड टोस्ट खाणे तुम्हांला नक्कीच पसंत असेल. पण त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी फायदा होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? हे थोडे आश्चर्यकारक वाटत असले तरीही सौंदर्यतज्ञ शिल्पी बोस यांनी सुचवलेला हा पर्याय नक्की करून पहा.
साहित्य -:
- 1 टीस्पून ब्रेडचा चुरा 1 टीस्पून ओटमिलमध्ये मिसळा.
- यामध्ये 2-3 टीस्पून दूध मिसळा.
- तयार मिश्रण चेहर्यावर लावून हलका मसाज करा. प्रामुख्याने हनुवटी,नाक आणि कपाळावर मसाज करा.
- 10-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
- हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळेस करावा. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल.
कशाप्रकारे चेहरा स्वच्छ करते – :
ब्रेड त्वचेतील घाण, अतिरिक्त तेल काढण्यास मदत करते. तर ब्लॅकहेड्सची समस्यादेखील रोखण्यास फायदेशीर ठरते.
यामुळे अॅक्नेच्या ब्रेकआऊट्सची समस्या कमी होण्यास मदत होते.
ओटमीलमुळे चेहर्यावरील मृतत्वचा काढण्यास मदत होते.
यापॅकमुळे चेहर्यावरील छिद्रं मोकळी होण्यास मदत होते. तसेच त्वचा मुलायम होते.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - You have to try this no-fail remedy for blackheads
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.