Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शेपूच्या पानांनी कमी करा गुडघ्यांचे दुखणे

$
0
0

उग्र वासाची, लहानशा हिरव्या पानांची शेपूची भाजी अनेकांची आवडती भाजी आहे. शेपूमुळे पचनमार्ग स्वच्छ होण्यास मदत होते, डायरियापासून आराम मिळतो. पण यासोबतच संधीवाताच्या रुग्णांसाठी गुडघ्यांचे दुखणे आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हांला ठाऊक आहे का ? नॅचरोपॅथ डॉ. एच.के.बाखरू यांनी सुचवलेला हा उपाय तुम्हीही नक्की करून पहा. हिवाळ्यात सांध्यांचे दुखणे रोखण्यासाठी खास ’6′ टीप्स !

कशी ठरतात शेपूची पानं फायदेशीर  ? 

शेपूच्या पानांमध्ये दाहशामक घटक मुबलक आढळतात. त्यामुळे शेपूची पानं तिळाच्या तेलात मिसळून नियमित गुडघ्यांवर लवल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. शेपूमध्ये प्रामुखाने कॅल्शियम आढळते. त्यामुळे आहारात शेपूच्या भाजीचा अवश्य समावेश करावा. यामुळे हाडांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. तसेच ऑस्टोपोरायसिसची समस्या कमी होण्यास मदत होते. म्हणूनच वाढत्या वयानुसार हाडांच्या कमकुवतपणापासून बचावण्यासाठी शेपूची भाजी आहारात टाळू नका. दुधातून नाही या ’5′ भाज्यांमधून मिळवा ‘कॅल्शियम’

फायदेशीर उपाय - 

उपाय # 1

कपभर तिळाच्या तेलात ताजी शेपूची पानं उकळा.

हे मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर गुडघ्यावर हलका मसाज करावा.

यासोबतच एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे.

उपाय # 2

मसाजासोबत शेपूची भाजी आहारातदेखील घेणे आवश्यक आहे. शेपूच्या भाजीचा वास उग्र असल्याने तुम्ही टाळत असल्यास त्यात तुमच्या आवडीची भाजी जसे की बटाटा किंवा मूगाची डाळ मिसळा.  ‘शेपू’ची भाजी आहारात ठेवण्याची ’7′ आरोग्यदायी कारणं नक्की जाणून घ्या.

उपाय #3

सॅलेड किंवा रायतामध्येदेखील तुम्ही शेपूचा वापर करू शकता.

संबंधित दुवे - 

जिना चढता-उतरताना होणार्‍या चुका ठरतात ‘गुडघेदुखी’ची कारणं !

संधिवाताच्या रुग्णांसाठी 9 सुपरफुड्स !!

योगासनांनी दुर करा ‘गुडघेदुखी’चा त्रास !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Expert recommended natural remedy for joint pain and swelling

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>