9 नोव्हेंबर 2015 – धनत्रयोदशी ( धन्वंतरी जयंती )
अमृतमंथनातून निर्माण झालेली आरोग्यशास्त्राची देवता म्हणजे ‘धन्वंतरी’ ! आजकाल आपण आजारी पडलो की डॉक्टरांचा धावा करतो. पण आयुर्वेदाचा आणि आरोग्यरक्षणाचा अधिपती धन्वंतरी यांच्या मते, आजारी पडूच नये म्हणून आपण दक्ष राहणे हे गरजेचे आहे. स्वास्थ्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात सुचवलेल्या मार्गानुसार आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मग जाणून घ्या धन्वंतरी देवतेच्या हातात असलेल्या चार शस्त्रांचे स्वास्थ्य सुधारक चार संकेत -
# 1 चक्र -
मनातील आणि शरीरातील विषारी घटकांच्या संहाराचे प्रतिक म्हणजे ‘चक्र’ ! शरीरात विषारी घटकांचा प्रादूर्भाव वाढल्यास आपल्या आरोग्यात बिघाड होण्यास सुरवात होते. म्हणूनच धन्वंतरीच्या हातातील चक्र ‘आयुर्वेदा’च्या शस्त्रारूपी सहाय्याने मानवी शरीरातील दोष कमी करण्यास मदत करतात. ( नक्की वाचा - ‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय ! )
#2 शंख -
प्राचीन काळापासून शुभ कार्याची सुरवात ‘ शंख नादाने’ केली जाते. शंख ध्वनीच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक उर्जा पसरवण्यास मदत होते. तसेच हवेतील प्रदूषण आणि विषाणू कमी करण्यास शंखनाद फायदेशीर ठरतो. वातावरण प्रसन्न झाले की आपोआपच मनाची चंचलता कमी होते, मानसिक ताण हलका होतो परिणामी आरोग्य सुधारण्यास मदत होते.
# 3 जळू (जलौका) -
रक्त हे जीवधारक आहे. मानवी शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी रक्त शुद्ध आणि प्रवाही रहाणे आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार जळू हे रक्ताशुद्धीसाठी फायदेशीर आहे. जळूचा त्वचेला स्पर्श झाल्यास शरीरातील अशुद्ध रक्त शोषले जाते. रक्तदाब वाढल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी जळू लावला जातो. मग या ’6′ लक्षणांमधून मिळतात ‘उच्च रक्तदाबा’चे संकेत !
#4 अमृत कलश –
अमृताचा कलश हा रामबाण आयुर्वेदीक औषधांचा भांडार समजला जातो. बदलत्या काळानुसार औषधशास्त्रात अनेक बदल झालेत. पण आयुर्वेदात अनेक आजारांवर मात करण्याची तसेच प्रतिबंध करण्याची क्षमता असल्याने ‘आयुर्वेद’ या अमृतारुपी घडाचा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच वापर करा.
(संदर्भ सौजन्य – शीव आयुर्वेदीक महाविद्यालय-सायन येथील प्रोफेसर आणि वैद्य डॉ. रजनी पाटणकर )
संबंधित दुवे -
अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी बनवा ‘सुगंधित उटणं’
छायाचित्र सौजन्य – www.priestservices.com
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.