Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फिजेट स्पिनर या नवीन खेळण्याविषयी तुम्हांला काय वाटते ?

$
0
0

आजकाल आपण सर्वत्र एक लहान आकाराचे,बॉल-बेअरिंग असलेले रोटेशनल साधन अनेक मुलांच्या हातात पहातो ज्याला फिजेट स्पिनर असे म्हणतात.सध्या हे एक सर्वात लोकप्रिय व जलद गतीने विक्री होत असलेले खेळणे आहे.बाजारात त्याचे ADHD(Attention Deficit Hyperactive Disorder),चिंता व ऑटिझम ग्रस्त मुलांवर उपचार या दृष्टीने मार्केटींग केले जाते.या खेळण्यामुळे एकाग्रतेला चालना मिळते असे देखील सांगण्यात येते.पण अमेरिकेत अनेक  शाळांमध्ये या खेळण्यावर  बंधनं  घालण्यात आली आहेत. आहे कारण त्यामुळे मुलांचे वर्गातून लक्ष विचलित होताना आढळत आहे.लोक हाताच्या बोटांने हे साधन फिरवतात व त्याच्या गतीचा आनंद घेतात.त्यामुळे अनेकांना आज त्याचे जणू व्यसनच लागले आहे.यासाठी तुमच्या मुलांना या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !

जाणून घेऊयात फिजेट स्पिनर या खेळाविषयी या लोकांची  काय मतं आहेत.

२७ वर्षांचा गौरव सांगतो,”या खळण्याचे अक्षरश: वेड लागते मी आता या शिवाय राहूच शकत नाही.”पुढे आम्ही त्याला विचारले की यामुळे तुझी एकाग्रता वाढली का? तर त्यावर त्याने सांगितले की,”नाही यामुळे माझी एकाग्रता वाढली नाही.उलट माझे लक्ष ब-याचदा विचलित झाले.पण मला त्याने खेळणे फार आवडते.”यासाठी वाचा एकाग्रता वाढवण्यासाठी करा ‘ब्रम्हमुद्रा’ !

त्यानंतर आम्ही इयत्ता दहावीमधील अभिनव या मुलाला याबाबत विचारले तेव्हा त्याने सांगितले की,” मी हे विकत घेतले कारण माझ्या मित्राकडे फिजेट स्पिनर होते.या खेळण्याची किंमत फार कमी आहे.तसेच आम्हाला पहायचे असते की आमच्या दोघांपैकी कोणाचा फिजेट स्पिनर दीर्घकाळ फिरतो.” त्यानंतर एकाग्रतेविषयी तो म्हणाला की,” फिजेट स्पिनरमुळे एकाग्रता वाढते.मला कशी ते सांगता येणार नाही पण हे खरे आहे.” बुद्वी तल्लख रहावी यासाठी वाचा भिजवलेल्या बदामांचे ’6′ आरोग्यदायी फायदे !

मुलींना देखील हे खेळणे फार आवडते.आॉफिसमध्ये जाणारी पंचविस वर्षीय Alice Cara Peter सांगते,”मी देखील फिजेट स्पिनरने खेळते पण त्यामुळे माझ्या एकाग्रतेमध्ये बदल झालेला नाही.या खेळण्याने खेळण्यात मौज आहे त्यामुळे अनेकांना हा खेळ आवडतो.हा खेळ पोकीमॉन गो सारखाच एक खेळ आहे त्यामुळे काही महिन्यांनी दुस-या एखाद्या खेळामुळे तो देखील नक्कीच बाद होईल.”

सत्ताविस वर्षीय संध्या राघवन सांगते,”माझ्याकडे स्वत:चे फिजेट स्पिनर नाही.पण माझा एक ऑफिसमधील मित्र आम्ही कॉफीसाठी गेलो तेव्हा त्याचे एक फिजेट स्पिनर घेऊन आला होता.फिजेट स्पिनर मध्ये काही चमत्कारीक गुणधर्म आहेत का ते मला माहित नाही.पण मला चांगलं आठवत आहे की मी माझ्या मित्राला कॉफीसाठी भेटले तेव्हा तो माझ्याशी काय बोलत आहे याकडे माझे लक्षच नव्हते.मी त्या स्पिनर बरोबर खेळत राहीले व मला देखील एक स्पिनर घ्यायला हवे असा विचार करीत राहीले.कदाचित हे खेळणे मनोविकार असणा-या लोकांचे लक्ष एकाग्र करण्यासाठी चांगले फायदेशीर असेल.पण माझे मात्र या खेळण्यामुळे लक्ष विचलित झाले.”तसेच वाचा या ’4′ फायद्यांसाठी मुलांना व्हिडियो गेम खेळू द्या !

आश्चर्य म्हणजे अनेकांना हा खेळ आवडत नाही.सव्विस वर्षीय Rocky Uchil या फीटनेस ट्रेनरच्या मते,”फिजेट स्पिनर हे मी आत्तापर्यंत्त बिघितलेल्या फॅडपैकी एक अत्यंत त्रासदायक फॅड आहे.मला त्यामुळे फार त्रास होतो.त्यामुळे मला खरंच कळत नाही की लोकांना ते एकाग्रता वाढविणारे साधन आहे असे का वाटते.” रॉकीप्रमाणेच अनेकांनी असे मत व्यक्त केले.

थोडक्यात फिजेट स्पिनर बाबत संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.पण या खेळाच्या फ्रेझमुळे आजकाल त्यामध्ये निरनिराळे प्रकार निर्माते निर्माण करीत आहे.अनेक स्पिनर मध्ये लोकांना सतत लागणारा लीपबाम उपलब्ध करण्यात येत आहे.काही स्पिनर हे कुकीज अथवा चॉकलेट या खाण्याच्या साहित्यापासून तयार केले जात आहे.काही फिजेट स्पिनरवर मुलांचे आवडते सूपरहिरो जसे की हॅरी पॉटर,बॅटमॅन असतात.थोडक्यात कल्पकता वापरुन विविध प्रकारचे फिजेट स्पिनर निर्माण केले जात आहेत.तुम्हाला देखील फिजेट स्पिनरचे वेड आहे का ? की तुम्हाला ते आवडत नाही किंवा त्यामुळे तुम्हाला काहीच फरक पडत नाही?किंवा तुमचा आवडता फिजेट स्पिनर कोणता आहे ?आम्हाला तुमचे याबाबत असलेले मत जाणून घेणे नक्कीच आवडेल.यासाठी आमच्या कंमेट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रीया जरुर कळवा.एकाग्रता वाढविण्यासाठी जाणून घ्या या ’5′ कारणांसाठी सामुहिकरित्या ध्यान का करावे ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>