Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरम की थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर !

$
0
0

केसांचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही तेल, शाम्पू, कंडीशनर यांची निवड अगदी चोखंदळपणे कराल. पण यासोबतच केस धुताना पाण्याअचे तापमान सांभाळणेदेखील गरजेचे आहे. कारण अति गरम पाण्याने केस धुणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे केस रफ  होतात  तसेच केसगळतीची समस्या वाढते. म्हणून थंड पाण्याने केस धुणे योग्य आहे  का ?

हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते, साध्या किंवा थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर आहे. यामुळे केसांमधील घाण, कचरा व शाम्पू पूर्णपणे निघण्यास मदत होते. केवळ पाण्याचे तापमान थंड असणे पुरेसे नाही. तर पाण्याची क्वालिटीदेखील महत्त्वपूर्ण ठरते. पाणी जड असू नये. सौम्य पाण्याने केस धुणे अधिक फायदेशीर ठरते. जड पाण्याने केस धुतल्याने केस दाट आणि रफ होतात. तसेच केसांमधील शाम्पू तसाच राहतो.  त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी ते थंड व सौम्य पाण्याने केस धुवा.

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचे नुकसान होते. जर तुम्हांला थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नसेल कोमट पाण्याचा वापर करावा. मात्र गरम पाणी अंगावर आणि थंड पाणी केसांवर वापरू नका. पाण्याच्या तापमानात बदल झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करणे हा उत्तम पर्याय आहे.

संबंधित दुवे - 

केसांच्या वाढीसाठी दूर करा हे ’5′ गैरसमज !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Hot or cold water — which is better for a hair wash? (query)

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>