अवयव दान केले असेल तुम्ही रक्तदान करु शकत नाही.अपोलो हॉस्पिटलच्या Molecular Biology & Immunology lab व Transfusion Medicine चे सिनीयर कन्सल्टंट Dr. (Prof) R N Makroo यांच्यामते याचे कारण असे की अशा रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती फार कमी झाली असल्यामुळे ते रक्तदानासाठी पात्र ठरत नाहीत.काही केसेसमध्ये असे रुग्ण रक्तदानासाठी कायमस्वरुपी बाद ठरतात.काही रुग्णांना रक्तदानासाठी पात्र होण्यासाठी अवयव दानानंतर कमीतकमी १२ महिने वाट पहाण्याची गरज असते.असे असले तरी जर Brain Covering Transplant झाले असेल तर तुम्ही रक्तदान करु शकत नाहीत.कारण ही प्रक्रिया मेंदूच्या आजाराशी संबधित असू शकते.तसेच जाणून घ्या अॅनेमिक रुग्ण रक्तदान करु शकतो का ?
एवढंच नाही तर अॅन्टीबायोटीक्स घेणारे व इनफेक्शन असलेले रुग्ण देखील रक्तदान करु शकत नाहीत.तसेच जाणून घ्या उच्च रक्तदाबाचा रुग्ण रक्तदान करू शकतो का ? जर तुम्ही तुमच्या अॅन्टीबायोटीक्स चा डोस मागच्या आठवड्यामध्ये पू्र्ण केला असेल किंवा मागच्या दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला एखादे इनफेक्शन झाले असेल तर तुम्हाला रक्तदान करता येत नाही.तुम्ही तुमचा अॅन्टीबायोटीक्सचा डोस पूर्ण करुन बरे झाल्यावर ७२ तासांनी रक्तदान करु शकता.ज्या रुग्णामध्ये Blood Transfusion करण्यात आले आहे असे रुग्ण देखील रक्तदान करु शकत नाही.तसेच जाणून घ्या गर्भारपणात रक्तदान करणे योग्य आहे का ?
रक्तदान करण्यासाठी रक्तदाता शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी असावा लागतो.तसेच रक्तदात्याचे वय १८ ते ६५ यामध्ये असावे लागते.रक्तदात्याचे हिमोग्लोबिन १२.५ gm/dL पेक्षा जास्त व वजन ३५० मिली रक्तदान करण्यासाठी ४५ किलो ४५ मिली रक्तदान करण्यासाठी ५५ किलो असावे लागते.जाणून घ्या या ‘४’ आरोग्यदायी फायद्यांसाठी रक्तदान करावे !
जर तुम्ही अवयव प्रत्यारोपणानंतर १२ महिन्यांनी रक्तदान करत असाल तर-
- रक्तदान केल्यावर पुढील चार तासांमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी व द्रव पदार्थ घ्या.
- जर रक्त काढलेल्या ठिकाणी रक्तस्त्राव होत असेल तर हात वर उचला व रक्तस्त्राव होणारा भाग रक्तस्त्राव होणे थांबे पर्यत दाबून ठेवा.
- जर असे करुन देखील रक्तस्त्राव सुरुच असेल तर रक्तदात्याने त्वरीत ब्लड बैंकेत संपर्क साधावा.
- जर रक्तदात्याला रक्तदान केल्यावर थकवा अथवा चक्कर येत असेल तर त्याने पाठीवर झोपावे व दोन्ही पाय वर उचलावे.असे करुन देखील चक्कर येतच असेल तर रक्तदात्याने ब्लड बैंक अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- रक्तदान केलेल्या ठिकाणी लावलेली बॅन्डेड १० ते १२ तासानंतरच काढून टाकावी.
- रक्तदान केल्यानंतर २४ तास रक्तदात्याने कोणतेही कठीण व्यायाम अथवा परिश्रम करु नयेत.
- रक्तदान केल्यानंतर अर्धातास धूम्रपान करु नये.तसेच रक्तदान केल्यावर पुढील जेवण घेण्यापूर्वी अति मद्यपान देखील करु नये.
तसेच रक्तदानाबाबत हे ’10′ गैरसमज आजच दूर करा !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock