दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटीस दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यंदा २०१७ साली या दिनानिमित्त “हिपॅटायटीस दूर करा” असा संदेश देण्यात येत आहे.
Neonatal Jaundice म्हणजे नवजात बाळाला होणारी काविळ.या समस्येला वैद्यकीय भाषेत Neonatal Hyperbilirubinemia असे म्हणतात.नवजात बाळाला होणारी काविळ ही एक सामान्य आरोग्य समस्या असून ती बाळाच्या जन्मानंतर दोन ते पाच दिवसांमध्ये बाळाला होऊ शकते.बाळाच्या शरीरामध्ये बिलूरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे त्याला काविळ होत असते.पण त्या व्यतिरिक्त देखील अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे बाळाला जन्मत:च काविळ होऊ शकते.यासाठी जाणून घ्या नवजात बाळाला होणार्या काविळीवर कसे उपचार केले जातात ?
पंचकुला येथील पारस ब्लीस हॉस्पिटलच्या Consultant Neonatology डॉ.मनू शर्मा यांच्यामते नवजात बाळाला होणा-या काविळी विषयी या ५ गोष्टी जरुर जाणून घ्या.
१.बाळ आईच्या गर्भात असताना आईच्या गर्भनाळेद्वारे त्याच्या शरीरातील सर्व बिलूरुबिन बाहेर टाकले जाते.त्यामुळे जन्मानंतर बाळाच्या शरीरातील बिलूरुबिन वाढू शकते.अंदाजे ६० टक्के पूर्ण विकसित नवजात बाळांना त्यांच्या जन्मानंतर दुस-या अथवा तिस-या दिवशी काविळ होते.जर बाळाला जन्मानंतर लगेच होणा-या काविळीवर त्वरीत उपचार केले गेले नाहीत तर बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.कधीकधी अशा स्थितीमध्ये बाळाच्या मेंदूचे नुकसान होऊ शकते.यासोबतच वाचा नवजात बाळाच्या खाण्याबाबतचे ‘७’ समज – गैरसमज !
२.ज्या बाळाला जन्मानंतर लगेच काविळ होते त्याची त्वचा पिवळसर दिसू लागते.नवजात बाळाच्या शरीरातील लाल रक्त पेशींचा जीवनकाळ हा प्रौढांपेक्षा तुलनेने कमी असतो.तसेच त्यांचे यकृत देखील बिलूरुबिनचा ताण झेपण्यासाठी पुरेसे परिपक्व नसते.त्यामुळे सहाजिकच बिलूरुबिनच्या निर्मितीमध्ये असतुंलन निर्माण होऊन बाळाला काविळ होते.तसेच वाचा हिपॅटायटीस सी पासून तुमच्या यकृताचा बचाव करण्यासाठी या खास टीप्स !
३.असे असले तरी याचा धोका पूर्ण विकसित बाळाला प्रिमॅच्युअर बाळापेक्षा कमी असतो.त्यांना जन्मानंतर अगदी सुरवातीच्या काळातच काविळ होऊ शकते.कारण या काळात त्यांचे अपरिपक्व यकृत बिलूरुबिनचे विघटन योग्य पद्धतीने करु शकत नाही व त्यांच्या आतड्यांमध्ये हे बिलुरुबिन शोषले जाते.
४.बरेच पालक नवजात बाळाला झालेल्या काविळ या समस्येला फार गंभीरतेने घेत नाहीत.पण लक्षात ठेवा या आजारामुळे बाळाला भविष्यात अांतरिक रक्तस्त्राव,यकृत समस्या,इनफेक्शन किंवा इतर आरोग्य समस्या होऊ शकतात.काविळ टाळण्याचा कोणताही खात्रीलायक मार्ग उपलब्ध नसला तरी वेळीच योग्य ती दक्षता घेऊन तुम्ही तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित करु शकता.
५.The American Academy of Pediatrics (AAP) च्या सल्लानूसार सर्व नवजात बाळांची त्यांच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी जाण्यापूर्वी व घरी गेल्यानंतर देखील काही दिवस(दर आठ ते दहा तासांनी)सतत आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock