Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि स्थूलता असल्यास बटाटे खाणे योग्य आहे का ?

$
0
0

वजन कमी करायचे असल्यास बटाटे न खाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच कोलेस्ट्रॉल, हृदयविकार असलेल्या पेशंटने बटाटे टाळावेत, असे सांगितले जाते. पण हा समज बरोबर आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही  Insta Sculpt चे वेट लॉस एक्स्पर्ट डॉ. मंजिरी पुराणिक यांच्याशी संवाद साधला.

तेलात, तुपात न तळण्यास किंवा क्रीम न घातला बटाटा खाल्यास एका बटाट्यामध्ये फक्त ११० कॅलरीज, व्हिटॅमिन्स आणि phytochemicals असतात. पालक, ब्रोकोली, कडधान्य यामध्ये असलेले phytochemicals बटाट्यामध्ये देखील आठळून येतात. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते. परंतु, तुम्ही बटाट्याचा पदार्थ कसा बनवता, यावर तो किती आरोग्यदायी आहे, हे ठरते. नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचा घरगुती उपाय !

बटाटा डीप फ्राय केल्यास त्यातील हेल्दी phytochemicals नष्ट होतात आणि फक्त स्टार्च, फॅट्स आणि काही मिनरल्स उरतात. कच्चे बटाटे मायक्रोवेव्ह मध्ये शिजवल्यास त्यातील अँटिऑक्सिडंट्स टिकून राहण्यास मदत होते, असे डॉक्टर म्हणाल्या.

बटाटे कोलेस्ट्रॉल-फ्री असून त्यात सॅच्युरेटेड फॅट्स नसतात. कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असलेले पदार्थ खाल्यास हृदयविकार होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. म्हणून जर तुम्हाला हृदयविकार असेल तर उकडलेल्या बटाट्याचे काही स्लाईस खाल्यास हृदयाला आवश्यक असलेले TLC मिळण्यास मदत होते. बटाटा खाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते.

  • बटाट्यात पोटॅशियम अधिक आणि सोडियम कमी प्रमाणात असते.

उच्च रक्तदाब असल्यास हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या म्हणजेच हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक उद्भवण्याचा धोका वाढतो. आहारात बदल केल्यास रक्तदाबाचा धोका कमी होण्यास आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी पोटॅशियम पुरेशा प्रमाणात घेण्याचा आणि सोडियमचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो. बटाटा यासाठी उत्तम पर्याय ठरतो. सालीसकट बटाटा खाल्यास त्यात केळ, पालक किंवा ब्रोकोली पेक्षा अधिक पोटॅशियम असतात आणि ते सोडियम फ्री देखील असतात. बटाटा अशाप्रकारे खाल्ल्यास नाही वाढणार तुमचं वजन !!

  • बटाटा- फायबरचा उत्तम स्त्रोत आहे.

एका मध्यम आकाराच्या सालीसहीत बटाट्यात २ gm फायबर्स असतात. Dietary fibre मुळे रक्तातील लिपिडची पातळी सुधारते, ब्लड ग्लुकोज सुरळीत होते आणि पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. बटाटा – वजन वाढवण्याचा नाही तर ‘घटवण्या’चा उपाय !

  • बटाटा- व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे.

व्हिटॅमिन सी मुळे कोलेस्ट्रॉलमुळे खराब होणाऱ्या रक्तवाहिन्या सुरक्षित राहतात. आणि बटाटा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे.

  • बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी६ चांगल्या प्रमाणात असतात.

हिमोग्लोबिन हा रेड ब्लड सेल्समधील महत्त्वाचा घटक आहे. हिमोग्लोबिनचे सिन्थेसिस होण्यासाठी व्हिटॅमिन बी६ ची आवश्यकता असते. तसंच त्यामुळे homocysteine ची पातळी कमी होण्यास मदत होते. कारण त्याच्या अति प्रमाणामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक होण्याची शक्यता असते.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>