“माझ्या डोळ्यांच्या पापण्या फार गडद दिसतात.मी माझ्या पापण्यांची निगा कशी ठेऊ? डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा नितळ व तजेलदार करण्यासाठी मी चेह-याप्रमाणे पापण्यांवर देखील फेस स्क्रब वापरु शकते का? कृपया याबाबत मार्गदर्शन करा.”
संपूर्ण चेह-यात डोळे हा फार नाजूक अवयव आहे.त्यात डोळ्यांच्या पापण्या हा तर अति संवेदनशील भाग आहे.त्यामुळे निरोगी रहाण्यासाठी व सौंदर्य टिकविण्यासाठी त्यांची डोळ्यांची योग्य निगा राखणे फार गरजेचे आहे.जर तुम्ही वारंवार मेक-अप करीत असाल तर शक्य असेल तेव्हा मेक-अप करणे टाळा.तसेच यासाठी वाचा खोबरेल तेल- त्वचा स्वच्छ करण्याचा आणि मेकअप काढण्याचा उत्तम उपाय.प्रत्येकवेळी मेक-अप केल्यावर तो एखाद्या चांगल्या क्लिनझरने काढून टाका.तसेच जाणून घ्या डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटण्यामागे नेमके कारण काय ?
दिल्लीच्या Star Salon n Spa चे मालक व ब्युटी एक्सपर्ट आश्मीन मुंजल यांच्यामते जाणून घेऊयात डोळ्यांच्या पापण्यांची निगा कशी राखावी.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांवर कधीही स्क्रब वापरु नका.कारण तुमच्या पापण्यांवरील अतिसंवेदनशील त्वचा व पापण्यांवरील केस यांवर अति सौदर्यप्रसाधनांचा वापर केल्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते,तसेच जाणून घ्या पापणी फडफडण्यामागील ही ’8′ कारणं .खरंतर पापण्यांना फार स्वच्छतेची गरज नसते व पापण्यांवर फेस स्क्रब तर मुळीच वापरु नयेत.तसेच जाणून घ्या डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय !
तसेच चेह-यासाठी वापरण्यात येणारे फेस स्क्रब डोळ्यांच्या पापण्यांसाठी योग्य नसतात.कारण ते पापण्यांच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरु शकतात.मात्र जर तुमच्या भुवयांच्या केसांमध्ये कोंडा असणे किंवा तुम्हाला पापण्यांजवळील त्वचा कोरडी असण्याची समस्या असेल तर तुम्ही अगदी सौम्य स्क्रब वापरु शकता.यासाठी अति दाणेदार अथवा खरखरीत नसलेले एखादे सौम्य अॅप्रिकॉट स्क्रब तुम्ही घेऊ शकता.या स्क्रबचा काही भाग घ्या व त्यामध्ये थोडे मॉर्श्चराझर मिसळून तुम्ही त्याचा हलक्या हाताने तुमच्या पापण्यांवर मसाज करु शकता.हा मसाज करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा मसाज क्लॉकवाइज करावा.तसेच वाचा डोळ्यातून येणाऱ्या सफेद स्त्रावामागचे नेमके कारण काय असावे ?
जर तुमच्या पापण्यांवरील केस पातळ व कमजोर असतील तर मात्र तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला कोणतेही सौदर्यप्रसाधने वापरु नका.जर तुमच्या पापण्यांवरील केस दाट असतील व तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर तुम्ही वर दिलेले मिश्रण वापरु शकता.डोळ्यांच्या पापण्यांवर कोरफडाचे जेल अथवा मास्क वापरणे योग्य ठरेल.जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य.