केसगळती ही सध्याची वाढती समस्या आहे. त्याची कारणे अनेक असू शकतील. पण सध्या स्त्रियांमध्ये वाढणारा हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे देखील केस गळू लागतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे केसवाढीस चालना देणारे हार्मोन्स म्हणजे oestrogen आणि progesterone कमी होतात. तर केसगळतीस कारणीभूत ठरणारे androgen आणि testosterone हार्मोनस वाढीस लागतात. हार्मोनल इम्बॅलन्स बरोबरच केसांची योग्य काळजी न घेणे, चुकीचा आहार या सगळ्यामुळे केस गळू लागतात. झोपेत केसांचे नुकसान होऊ शकते. त्यासाठी काही टिप्स झोपेत होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !
याचा परिणाम म्हणजे तुमचे केस telogen phase मध्ये जातात. यामध्ये केस मुळापासून निघतात आणि गाळून पडतात. हा फेज सात महिन्यांचा असतो. ज्यामध्ये तुम्हाला केस वाढलेले जाणवत नाहीत. केस पातळ होत जातात. केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा
- केस गळतीस कारणीभूत ठरणारे हार्मोन्स कसे नियंत्रित करावेत ?
केस गळतीचे कारण हार्मोनल इम्बॅलन्स हे असल्यास डॉक्टर progesterone सारखे हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी औषधे देतील. कलकत्ताच्या trichologist at Apex Laser Clinic चे Dr. Souvik Halder यांनी सांगितले की, औषधांमुळे तीन महिन्यात केस पुन्हा वाढू लागतात. केसगळतीवर गुणकारी जास्वंद
या सप्लिमेंट्स मध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड आणि adaptogens असते. त्यामुळे स्ट्रेस, इन्फ्लाम्मेशन यावर परिणाम होऊन हेयर फॉलिकल्स हेल्दी आणि मजबूत होण्यास चालना मिळते. तसंच नियमित व्यायाम आणि औषधांमुळे शरीर पूर्वस्थितीला येण्यास मदत होते. ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय
हार्मोनल इम्बॅलन्सच्या पहिल्या टप्प्यात नेमकं काय होत यावर केस पुन्हा वाढतील की नाही हे अवलंबून असतं. याची अयोग्य आहार, मेनोपॉज, जेनेटिक अशी अनेक कारणे दिसून येतात. काही वेळेस हॉर्मोनल इम्बॅलन्स वर उपचार केल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते. तर काही वेळेस हेयर रिस्टोरेशनची गरज भासते. या कारणांमुळे केस विरळ होण्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरत नाहीत !
- केसगळती रोखण्यासाठी खास टीप:
केसवाढीस चालना देण्यासाठी अॅक्युप्रेशर फायदेशीर ठरते. Balayam, या अॅक्युप्रेशर थेरपीने स्काल्फमधील रक्ताभिसरण सुधारून केसवाढीस चालना मिळते. यासाठी तुम्हाला पद्मासनात बसावे. हात एकमेकांकडे तोंड करून ठेवा. अंगठे बोटांपासून दूर ठेवा आणि नखं एकमेकांवर घासा. केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock