गेल्या दोन दशकांपासून सेलिब्रेटी टॅटू आर्टिस्ट विकास मलानी या क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्यामते काही गोष्टी अनेक वर्षांनंतर देखील बदलत नाहीत.त्यांनी आत्तापर्यंत रेमो डिसूझा,जॉन अब्राहम,आलोक नाथ,आमिर खान,अनुष्का शर्मा,प्रियंका चोप्रा,फरदिन खान,अनिल कपूर,महिंद्रसिंह धोनी व शाहरुख खान या सेलिब्रेटीज सोबत काम केले आहे.विकास मलानी यांच्यामते लोकांना केवळ टॅटू व टॅटू काढणे याबाबत गैरसमज असतात असे नाही तर टॅटू आर्टिस्ट बाबत देखील अनेक गैरसमज असू शकतात.अनेक जण टॅटू काढल्यावर काळजी घेत नाहीत व नंतर टॅटू आर्टिस्टला दोष देतात.खरंतर यासाठी तुम्ही टॅटू व टॅटू काढणा-या व्यक्तीला गृहीत धरु शकत नाही.जाणून घ्या वेदनारहित मार्गाने कसा मिटवाल शरीरावरील टॅटू !
Bodycanvas Tattoos व Piercings या प्रकारातील प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट विकास मलानी यांच्यामते अगदी कॉर्पोरेट प्रोफेशनल पासून ते हाऊसवाईफ पर्यंत व कॉलेजला जाणा-या तरुणांपासून अगदी आजी-आजोबांनी देखील टॅटू काढताना त्याआधी ही सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे.
१.तुम्ही अंगावर गोंदवलेला टॅटू तुमच्या शरीरावर आयुष्यभर असणार आहे.आश्चर्य म्हणजे अनेकांना ही साधी गोष्ट देखील माहित नसते.त्यामुळे लक्षात ठेवा टॅटू काढल्यावर तो तुमच्या शरीर व त्वचेचाच एक भाग होतो.यासाठी शरीरावर टॅटू गोंदवण्यापूर्वीच तो टॅटू,त्याची डिझाइन,त्याचा आकार व त्यामध्ये वापरण्यात येणारे रंग याची खात्री करुन घ्या.कारण टॅटू रिमुव्हर हे फार महागडे व अवजड असतात.तसेच वाचा टॅटू काढून टाकण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या !
२.तुमचा टॅटू १० किंवा २० किंवा ३० वर्षांनी तसाच दिसत नाही.कारण तुमची त्वचा लवचिक असून वयोमानानूसार त्यामध्ये अनेक बदल होत जातात.तसेच जाणून घ्या अंगावर टॅटू काढल्यानंतर रक्तदान करणं शक्य असते का ?
३.गोव्याच्या बीचवर टॅटू काढणारे आर्टिस्ट प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट पेक्षा स्वस्त दरात टॅटू काढत असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून टॅटू काढून घेता.पण अशा पार्लरमध्ये स्टरलाइज केलेली साधने वापरण्यात येत नाहीत.जर त्यांनी हलक्या दर्जाच्या सुया वापरल्या अथवा स्वत: योग्य ती स्वच्छता पाळली नाही किंवा त्यांनी टॅटूसाठी लागणारी शाई ऑर्गेनिक न वापरता केमिकल असलेली वापरली तर तुम्हाला त्यामुळे त्वचा विकार,बॅक्टेरियल इनफेक्शन,हिपॅटायटीस अथवा एचआयव्ही इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.
४.मद्यपान केल्यावर टॅटू गोंदवून घेऊ नये.कारण मद्यपान केल्यामुळे टॅटू काढताना होणा-या वेदना कमी होत नाहीत.
५.टॅटू काढणे हे एखाद्या कॉस्मेटिक सर्जरी प्रमाणे असते.ज्याप्रमाणे एखाद्या सर्जरी नंतर तुम्ही लवकर बरे होण्यासाठी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टॅटू आर्टिस्टच्या सूचना देखील पाळणे आवश्यक आहे.त्यामुळे टॅटू काढल्यावर काही नुकसान झाले तर त्यासाठी टॅटू आर्टिस्टला दोष न देता स्वत: कोणत्या सूचनांकडे दुर्लक्ष केले ते आधी पहा.तसेच वाचा या ’6′ भागांवर टॅटू काढताना कमी होतो त्रास !
६.गुप्तांग संवेदनशील असल्यामुळे त्यावर टॅटू काढणे धोकादायक ठरु शकते.बोटे व हातापायांच्या तळव्यांवर शाई नीट बसत नसल्यामुळे त्याभागात देखील टॅटू काढू नयेत.अशा ठिकाणी टॅटू काढून तुमचा वेळ,पैसा,प्रयत्न व धैर्य गमावू नका.यासाठी वाचा शरीराच्या या ’5′ भागांवर टॅटू टाळा !
७.टॅटूची डिझाइन अथवा खर्चाविषयीची माहिती फोनवरुन विचारु नका.कारण चांगले टॅटू आर्टिस्ट याबाबत त्यांच्या ग्राहकांना मोफत सल्ला देतात.टॅटू काढताना त्या आधी तुमची आवड व इतर गोष्टींबाबत व्यवस्थित चर्चा करणे गरजेचे आहे.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock