अनेकदा पुरूषांच्या शिश्नाला उग्र वास येतो. आणि याबाबत ते त्यांच्या साथीदाराशी स्पष्टपणे बोलत नाही. पण अशाप्रकारे शिश्नाला येणारा वास तुमच्या आरोग्याबाबत खरंच काही गंभीर संकेत देतात का? याबाबतचा खास सल्ला युरोलॉजिस्ट Dr R. Vania यांनी दिला आहे.
शिश्नाला उग्र वास का येतो ?
शिश्नाला येणारा उग्र वास हा तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे येतो. तुम्ही काय खाता त्याचा परिणाम तुमच्या घामावर होतो. लसूण, कांदा यासारखे उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यास घामालाही उग्र वास येतो.
दिवसभर घट्ट पॅन्ट, जिन्स घातल्यास त्वचेला पुरेशी खेळती हवा मिळत नाही. परिणामी शिश्नाला उग्र वास येऊ शकतो. घाम आणि मॉईश्चर त्वचेरील बॅक्टेरियांसोबत मिसळल्यास शरीराला वास येतो. पुरूषांच्या गुप्तांगाजवळ apocrine glands असतात. त्यांचा घामाशी संपर्क आल्यास उग्र वास येण्याची शक्यता असते.
शिश्नाला दुर्गंधी येत असताना सेक्स केल्यास साथीदाराला कोणते इंफेक्शन पसरण्याचा धोका असतो का ?
तुमच्या शिश्नाला दुर्गंधी येत असूनही तुम्ही सेक्सचा आनंद घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या साथीदाराच्या आरोग्यावर होणार नाही. यामुळे स्त्रियांना युरिनरी ट्रॅक इंफेक्श्न किंवा इतर कोणत्याही इंफेक्शनचा धोका नसतो.
शिश्नाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी काय कराल ?
शिश्नाला उग्र वास येत असेल तर तुम्हांला ब्लो जॉबचा आनंद घेता येणार नाही. तुम्हांला सेक्सचा आनंद अधिक खुलवायचा असेल तर सेक्सपूर्वी शिश्न स्वच्छ करणं, त्याचा उग्र वास कमी करणं गरजेचे आहे.
त्यासाठी या गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे.
- स्व्च्छता : तुमचे गुप्तांग नियमित स्वच्छ करा. केवळ नियमित साबणाने तेथील भाग पुसणं पुरेसा नाही. अॅन्टी बॅक्तेरियल साबणाने सारा भाग नीट स्वच्छ करा.
- त्वचा कोरडी करा - मॉईश्चर कमी म्हणजे शरीराला येणारा वास कमी. त्यामुळे नियमित शिश्नाला कोरडं करणं गरजेचे आहे. ब्लो ड्रायरचा वापर करूनही तेथील भाग स्वच्छ करू शकता. शिश्नाला कोरअॅडं करताना अंग पुसलेला, दमट टॉवेल वापरू नका. यामध्ये बॅक्टेरिया साचून राहण्याचा धोका अधिक वाढतो.
- हवा खेळती राहील असे कपडे घाला - सुती कापडाचा अधिक वापर करा. प्रामुख्याने उन्हाळ्यात येणारा घाम आणि त्याच्या उग्र वासापासून दूर राहण्यास मदत होते.
- प्युबिक हेअर ट्रिम करा - गुप्तांगामधील केसांमध्येही दुर्गंधी साचून राहते. ओलावा राहतो. त्यामुळे नियमित तेथील केसही ट्रिम करा. प्युबिक हेअरमुळे त्वचा कोरडी आणि फ्रेश राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock