मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)- तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसला तरी या आठवड्यामध्ये असलेल्या ग्रहांच्या दिशेमुळे काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.सावधता राखण्यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.ज्यांना अनियंत्रित रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी नियमित चेक-अप करावे.
वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-भविष्यामध्ये तुमच्या आरोग्य स्वास्थाला कोणताही धोका नाही.तुमचे आरोग्य निरोगी राहील.मात्र ज्यांना पचन समस्या आहेत त्यांना अॅसिडीटीची समस्या होऊ शकते.जर असा त्रास सतत होत असेल तर त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.तिखट खाणे टाळा.
मिथुन-(२२ मे ते २१ जून)-या आठवड्यामध्ये काही छोट्या आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे.मात्र त्या लगेच ब-या होणार असल्याने तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही.तुमच्या शारीरिक आरोग्याला भविष्यात कोणताही धोका नाही.सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांना वेदना सहन कराव्या लागतील.
कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-पन्नाशी गाठणा-या लोकांची जुनी दुखणी पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.योग्य औषधोपचारांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.दीर्घकाळ आराम मिळावा यासाठी पर्यायी औषधोपचार करा.शारीरिक प्रकृतीनुसार आहार घ्या.व्हिटॅमिन सप्लीमेंट घेणे फायद्याचे ठरेल.
सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-तुमच्या राशीमध्ये सुर्य व मंगळ राशीचा प्रवेश झाल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्याची शक्यता आहे.या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य सुधारेल व कोणतीही आरोग्य समस्या अथवा इनफेक्शन होणार नाही.जरी तुम्ही काही कारणात्सव आजारी पडलात तरी लवकर बरे व्हाल.
कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-या आठवड्यामध्ये काही अनपेक्षित आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.वेळीच औषध-उपचार करुन आजारपण दूर करता येऊ शकते.तीव्र सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांना आराम मिळण्याची शक्यता आहे.
तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी ग्रहदिशा प्रतिकुल अाहे.ताण-तणावापासून दूर रहा.निरोगी रहाण्यासाठी नियमित चेक-अप करा.पचनशक्ती मंदावल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.रात्री जड जेवण घेणे टाळा व स्वत:ला हलक्या व्यायामांसाठी प्रवृत्त करा.
वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-राशीतील बृहस्पतिच्या सकारात्मक स्थानामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल.तुमच्या आरोग्याला कोणताही धोका नाही.जरी एखादी आरोग्य समस्या झाली तरी त्यातून तुम्ही लवकर बरे व्हाल.दीर्घकाळापासून आजारी असलेल्या लोकांना आराम मिळण्याची शक्यता आहे.
धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल तर एखादा प्रभावी बाम वापरुन वेदनेपासून परावृत्त व्हा.लवकर बरे होण्यासाठी कॅलशियमयुक्त भाज्या व फळे खा.ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी औषधे बदलण्याची गरज आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-पचनसंस्था मंदावणे व सतत होणा-या अॅसिडिटीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.त्वरीत बरे वाटण्यासाठी अॅन्टीसिड घ्या व भरपूर पाणी प्या.यासाठी जाणून घ्या अॅन्टासिड घेतल्यावर शरीरात काय होते ?रात्री उशीरा जेवणे व तिखट पदार्थ खाणे टाळा.स्ट्रेचिंग एक्सरसाइजचा चांगला फायदा होऊ शकतो.इतरांसाठी हा आठवडा आरोग्य-स्वास्थाचा असेल.
कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-तुमच्या आरोग्याला कोणताही धोका नाही.या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्साही वाटेल.फक्त ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांना अपचनामुळे अस्वस्थ वाटेल.यासाठी चांगल्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार नियमित औषध-उपचार करा.स्ट्रेचिंग एक्सरसाइज चा चांगला फायदा होईल.
मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-या आठवड्यामध्ये तुमची ग्रहदिशा चांगली असल्यामुळे तुम्हाला आरोग्य-स्वास्थ लाभेल.मात्र जर तुम्हाला आधीच रक्तदाबाची समस्या असेल तर मात्र तुम्हाला त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.आहाराबाबत योग्य काळजी घ्या व नियमित व्यायाम करा.चिंता काळजी पासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा.यासाठी जाणून घ्या अचानक रक्तदाब कशामुळे वाढतो ?