ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.ऑलिव्ह ऑईल एक सर्वोत्तम खाद्यतेल असल्यामुळे अनेक जण आहारामध्ये त्याचा वापर करतात.ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात.या तेलामुळे ह्रदय निरोगी रहाते,रक्तातील साखर नियंत्रित रहाते.तसेच या तेलामध्ये अनेक व्हिटॅमिन व अॅन्टीऑक्सिडंट असल्यामुळे निरोगी जीवनासाठी या तेलाचा वापर स्वयंपाकात करणे फायदेशीर ठरते.तसेच यासोबत वाचा हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात करा या खाद्यतेलांचा समावेश
Borges India चे एम.डी.Mr. Rajneesh Bhasin यांच्यामते ऑलिव्ह ऑइल बाबत असलेल्या अज्ञानामुळे आज या तेलाबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झालेले आढळतात.जेव्हा तुम्ही बाजारात हे तेल विकत घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला ऑलिव्ह ऑइलचे प्युअर व एक्स्ट्रा व्हर्जिन असे प्रकार दिसून येतात.त्यामुळे यापेकी नेमके कोणते ऑलिव्ह तेल योग्य आहे हा प्रश्न मनात निर्माण होतो.तसेच यामध्ये असलेल्या कोल्ड प्रेस या प्रकाराला खरंच काही अर्थ आहे का असे देखील तुम्हाला वाटू लागते.खरंतर सर्वच एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल हे कोल्ड प्रेस असतात.
यासाठी जाणून घेऊयात ऑलिव्ह ऑइलबाबत असलेले समज-गैरसमज
१.ऑलिव्ह ऑइल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे गोठले तर ते चांगल्या दर्जाचे असे समजावे.
ऑलिव्ह ऑइलची रेफ्रीजेरेटर टेस्ट घेण्यासाठी व ते घट्ट होते का ते पहाण्यासाठी एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलची बॉटल फ्रीजमध्ये ठेवण्यात येते.ते तेल पातळच राहील्यास तर ते भेसळयुक्त असल्याचे समजण्यात येते.
सत्य-ऑलिव्ह ऑईलची शुद्धता तपासण्यासाठी घरी करावी अशी कोणतीही टेस्ट उपलब्ध नाही.फ्रीजमध्ये काही तेल गोठतात तर काही गोठत नाहीत.त्यामुळे या तेलाची गुणवत्ता ही त्याच्या गंध व चवीनूसार तपासण्यात येते व त्याची शुद्धता एखाद्या मानांकित व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा लॅबमध्ये तपासली जाऊ शकते.जाणून घ्या नियमित आहारात किती चमचे तेल वापरावे ?
२.ऑलिव्ह ऑइलच्या हिरवट रंगावरुन त्याची गुणवत्ता दिसून येते.
सत्य-ऑलिव्ह ऑइलचा रंग त्याची गुणवत्ता ठरवत असतो.चांगल्या गुणवत्तेचे ऑलिव्ह ऑइल हे जेनेरिक उत्पादन नाही.ऑलिव्ह ऑइलचा रंग हा त्यासाठी वापरण्यात आलेल्या ऑलिव्हची विविधता,त्यांच्या वाढण्याची स्थिती व ते कोणत्या देशात तयार झालेले आहेत या घटकांवर ठरत असतो.तसेच त्या तेलासाठी वापरण्यात आलेले ऑलिव्ह पिवळ्या रंगाचे आहेत की गडद हिरव्या रंगाचे आहेत व ते तेल फ्रीजमध्ये गोठते की पातळ रहाते यावर अवलबूंन असते.जाणून घ्या हेल्दी तेलाचे ’7′ पर्याय !
३.ऑलिव्ह ऑइल गरम केल्यामुळे त्याच्यातील चांगले गुणधर्म नष्ट होतात त्यामुळे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल कच्चे वापरावे.
सत्य-गरम केल्यामुळे ऑलिव्ह ऑइलचा फ्लेवर बदलत असला तरी त्याच्यामधील हेल्ही गुणधर्म बदलत नाहीत.त्यामुळे स्वयंपाकासाठी तुम्ही सर्व प्रकारचे ऑलिव्ह ऑइल वापरु शकता.तसेच वाचा तीळाच्या तेलाचे ’9′ आरोग्यवर्धक फायदे !
४.फक्त एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मध्येच MUFA (Mono Unsaturated Fatty Acids), Antioxidants व Poly phenols असे निरोगी गुणधर्म असतात.
सत्य-प्रत्येक प्रकारच्या ऑलिव्ह ऑइलमध्ये Monounsaturated fat असतात जे ह्रदयासाठी लाभदायक असतात.त्यामुळे प्युअर व एक्स्ट्रा व्हर्जिन अशा सर्व प्रकारचे तेल आरोग्यासाठी पोषक असते.
५.वाईन प्रमाणे ऑलिव्ह तेल देखील जितके जुने तितके अधिक चांगले असते.
सत्य-इतर सर्व तेलांप्रमाणेच ऑलिव्ह ऑइल देखील खराब होते.त्यामुळे वाइन प्रमाणे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल जितके जुने तितके चांगले असे मुळीच नाही.त्यामुळे ऑलिव्ह ऑइल जितके ताजे तितकेच ते आरोग्यासाठी लाभदायक असते.असे असले तरी तेल काढल्यापासून तुम्ही ते दोन वर्षाच्या आत वापरु शकता.बाटलीचे सील काढल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांच्या आत ते तेल वापरा.तसेच त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी थंड व अंधार असलेल्या ठिकाणी तेल ठेवा.तसेच आहारामध्ये फॅटचा समावेश असण्याचे हे आरोग्यदायी फायदे जरुर वाचा
६.एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइलमध्ये कमी कॅलरीज असतात.
सत्य-प्रत्येक ऑलिव्ह ऑइलमध्ये समान कॅलरीज असतात.फक्त एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइलचा रंग व गंध सौम्य असतो.असे असले तरी हे ऑलिव्ह ऑइल हेल्दी असून त्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात.त्यामुळे स्वयंपाक करताना व ड्रेसींग करताना त्याचा नियंत्रित वापर करा.ऑलिव्ह ऑइल मध्ये प्युअर फॅट असतात म्हणजेच त्यातील सर्व कॅलरीज या फॅटमधून आलेल्या असतात.एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये १२४ कॅलरीज व १४ ग्रॅम फॅट्स असतात.या फॅटमध्ये ६.७ ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड व ४.६ ग्रॅम पोलीअनसॅच्युरेडेट फॅट असतात.सॅच्युरेटेड फॅट मधून देखील काही कॅलरीज मिळतात.
७.ऑलिव्ह ऑइलचा तळण्यासाठी,स्वयंपाकासाठी वापर करु नये.
सत्य-तुम्ही मोठ्या आचेवर ऑलिव्ह ऑइल वापरुन स्वयंपाक करु शकता.पण त्यासाठी ऑलिव्ह ऑइलच्या निरनिराळ्या ग्रेड समजणे गरजेचे आहे.भारतात ऑलिव्ह ऑइलच्या तीन ग्रेड आहेत.Extra Virgin, Classic/Pure, Extra Light व Pomace.या प्रत्येक प्रकारच्या तेलांचा चव,गंध व स्मोकींग पॉइंट निरनिराळा असतो.एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमधील ऑलिव्हचा फ्लेवर तीव्र असतो व कोल्ड प्रेस पद्धतीने ते तयार केल्यामुळे त्याचा स्मोकींग पॉइंट कमी असतो.प्युअर ऑलिव्ह ऑइल हे शुद्ध ऑलिव्ह पासून काढण्यात येते.त्यामुळे त्याचा स्मोकींग पॉइंट जास्त व तीव्र ऑलिव्ह फ्लेवर असला तरी तुम्ही पास्ता व भाज्या तयार करण्यासाठी त्याचा वापर करु शकता.एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइल मध्ये ऑलिव्ह फ्लेवर नसून ते तेल तुम्ही स्वयंपाक अथवा तळण्यासाठी वापरु शकता.नक्की वाचा मधूमेहींनी जेवणात तेलाऐवजी तूपाचा वापर का करावा ?
८.ऑलिव्ह ऑइलचा स्वयंपाकामध्ये वापर केल्यामुळे त्यातील पोषणमुल्ये निघून जातात.
निरनिराळ्या ऑलिव्ह ऑइलमध्ये निरनिराळे स्मोक पॉइंट असतात.जेव्हा तुम्ही तेल गरम करता तेव्हा त्याच्यातील स्मोक पॉइंट निघून जातो.या प्रक्रियेमध्ये त्याच्यांमधील पोषकमुल्ये निघून जातात व पुढे त्यामध्ये निर्माण होणा-या फ्री रेडीकल्स मुळे विविध आजार होतात.
सत्य-ऑलिव्ह ऑइल त्यातील पोषणमुल्ये कमी न होता गरम होते.अनेक संशोधनानूसार ऑलिव्ह ऑइल स्वयंपाकासाठी वापरल्यामुळे त्यामध्ये विशेष बदल होत नाहीत.त्यामुळे गरम केल्यावर देखील त्यातील पोषणमुल्ये तशीच रहातात.आश्चर्य म्हणजे त्याच्या स्मोकींग पॉइंट पेक्षा हे तेल अधिक गरम होत नाही.एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 405°F पर्यंत गरम होते.तसेच जाणून घ्या मधुमेहींनी जेवणात खोबरेल तेल वापरणे योग्य आहे का ?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock