गर्भारपणातील प्रत्येक दिवशी तुमचे बाळ हळूहळू मोठे होत असते,विकसित होत असते व गर्भामध्ये हालचाल करुन स्वत:च्या ते जन्मासाठी तयार होत असते.गर्भातील हालचालीमुळे प्रसूती जवळ आल्यावर बाळाचे डोके आईच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ येते व बाळाचा जन्म सुखकर होतो.नैसर्गिक प्रसूतीसाठी बाळ काही आठवडे आधीच या स्थितीमध्ये येते.त्यामुळे नैसर्गिक प्रसूतीच्या वेळी बाळाचे डोके प्रथम बाहेर येते व हळूहळू त्याचा जन्म होतो.मात्र काही वेळा बाळ पायाळू (Breech Baby) असेल तर जन्माच्या वेळी ते नैसर्गिक स्थितीत नसते.पायाळू स्थितीत बाळाचे डोके वरच्या दिशेने व पाय खालच्या दिशेला असतात किंवा कधी कधी जर बाळ आडवे असेल तरी देखील प्रसूती दरम्यान बाळाच्या जन्मासाठी वैदयकीय मदत घ्यावी लागते.यासाठी वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
गर्भामध्ये बाळ पायाळू (Breech) अथवा आडव्या स्थितीत (Transverse Position) असण्यामागे अनेक कारणे असू शकतात-
- बाळाचे डोके मोठे असणे व आईच्या ओटीपोटाची रुंदी अरुंद असणे.
- बाळाला हालचाल करण्यासाठी गर्भाशयातील गर्भजल(Amniotic Fluid)चे प्रमाण कमी असणे.
- बाळाचे वजन कमी असल्यास शारीरिक असक्षमतेमुळे बाळाची गर्भातील हालचाल कमी होणे.
- गर्भाची हालचाल व उत्तम आरोग्यासाठी आईने पुरेशी शारीरिक हालचाल न करणे.
लक्षात ठेवा गर्भाची हालचाल अथवा गर्भामधील इतर क्रिया तुम्ही नियंत्रित करु शकत नाही.मात्र असे असले तरी काही सुलभ व्यायाम व हालचाल तंत्राच्या सहाय्याने सुलभ प्रसूतीसाठी व बाळ नैसर्गिक स्थितीमध्ये येण्यासाठी मदत नक्कीच करु शकता.तसेच वाचा गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत
पायाळू अथवा आडव्या स्थितीतील बाळाला गर्भामध्ये नैसर्गिक स्थितीमध्ये(डोके खाली) येण्यासाठी करा हे सोपे उपाय-
१.चालणे-गरोदरपणामध्ये सहज करण्यासारखा एक चांगला व सोपा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे.त्यामुळे जर तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीपासून चालण्याचा व्यायाम केला नसेल व आता तुमची प्रसूती जवळ आल्यावर व तुमचे बाळ पायाळू असल्याचे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यावर आजपासूनच दररोज नियमित चालण्यास सुरुवात करा.गरोदरपणाच्या तिस-या तिमाहीमध्ये दिवसातून दोनदा २० ते २५ मिनीटे चालल्यामुळे तुमचे पायाळू बाळ डिलीव्हरीच्या वेळी नैसर्गिक स्थितीत येऊ शकते.कारण जेव्हा तुम्ही चालता तुमच्या बाळाच्या शरीरातील डोके हा भाग जड असल्यामुळे तो गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या दिशेला जातो.त्यामुळे नैसर्गिक व सुलभ प्रसूतीसाठी तुम्ही चालण्यासारखा साधा व्यायाम नक्कीच करु शकता.वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
२.रांगणे-जर तुमच्या प्रसूतीचा काळ जवळ आला असेल व तुमचे बाळ पायाळू अथवा आडव्या स्थितीमध्ये असेल तर तुम्ही सुलभ प्रसूतीसाठी रांगण्याचा व्यायाम करु शकता.नैसर्गिक प्रसूतीसाठी व बाळ नैसर्गिक स्थितीमध्ये येण्यासाठी दररोज १० मिनीटे बाळाप्रमाणे रांगण्याचा सराव करा.यासाठी गुडघ्यांवर बसा व खाली वाकून शरीराचा तोल दोन्ही हातांच्या तळव्यांवर घ्या या स्थितीमध्ये तुमची पाठ सरळ राहील याची काळजी घ्या.तुमच्या पोटाला त्रास होईल याची चिंता करु नका कारण जरी तुमचा नववा महिना सुरु असला तरी या स्थितीमध्ये तुमचे पोट जमिनीला टेकत नाही.या व्यायामामुळे तुमचे बाळ आपोआप नैसर्गिक स्थितीमध्ये येईल.तसेच वाचा प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत करा हे ५ व्यायाम
३.योगासने-गर्भारपणातील योगासने व व्यायाम यांना अनन्यसाधारण महत्व असले तरी तिस-या तिमाहीमध्ये कोणताही नवा व्यायाम प्रकार तज्ञांच्या मदतीशिवाय करु नये.पण जर तुम्ही गर्भारपणाच्या सुरुवातीपासून योगासने करीत असाल तर मात्र या काळात देखील तुम्ही खाली वाकण्याचे व रांगण्यासारखी योगासने करु शकता.मात्र योग्य ज्ञानाशिवाय कोणतेही आसन स्वत:च्या मनाने करु नका.कारण त्यामुळे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी वाचा सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !
४.स्विमींग-आई व बाळाच्या आरोग्यासाठी पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे.जर तुम्ही गरोदरपणी पोहण्याचा सराव करीत असाल तर प्रसूती जवळ आल्यावर ब्रेस्ट स्ट्रोकचा सराव करा.ज्यामुळे प्रसूतीआधी तुमचे बाळ नैसर्गिक स्थितीमध्ये येण्यास मदत होईल.तसेच गर्भारपणात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी करा घरच्या घरी सायकलिंग !
५.झोपणे-गरोदरपणात झोपण्याच्या महत्वाविषयी फार सांगितले जात नाही.पण लक्षात ठेवा गरोदरपणी आठ तास शांत झोप घेणे फार महत्वाचे आहे.तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा तुमच्या बाळाच्या हालचाल व स्थितीवर परिणाम होत असतो.यासाठी गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये डाव्या कुशीवर झोपावे व पोटाखाली उशीचा अाधार घ्यावा.तसेच बसताना देखील डाव्या बाजूला आधारासाठी उशी घ्या अशा बसण्याच्या स्थितीमुळे बाळ नैसर्गिक स्थितीमध्ये येते व प्रसूती सुलभ होते.यासाठी वाचा गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?
६.फ्लोअर एक्सरसाइजचा सराव करा-बॅक ब्रीज सारख्या फ्लोअर एक्सरसाइजमुळे बाळाची हालचाल सुधारुन नैसर्गिक स्थितीमध्ये येण्यास मदत होते.बॅक ब्रीजचा सराव करण्यासाठी पाठीवर झोपा व हात-पायांचे तळवे जमिनीवर टेकवा.डोके,खांदा व पाय जमिनीवर ठेऊन ओटीपोट वरच्या दिशेला उचला.मंद श्वास घ्या व हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या.प्रसूतीपर्यंत दररोज दोन मिनीटे या व्यायामाचा सराव करा.पायाळू व आडव्या स्थितीतील बाळाला नैसर्गिक स्थितीमध्ये आणण्यासाठी बॅक ब्रीज हा एक प्रभावी व्यायाम आहे.जाणून घ्या गरोदरपणात दुस-या अथवा तिस-या तिमाहीमध्ये वजन कमी होणे चिंतेची बाब आहे का ?
सूचना-जर तुमचे बाळ नैसर्गिक स्थितीमध्ये नसेल तर त्याला गर्भात योग्य स्थितीमध्ये आणण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.वर दिलेले व्यायाम व तंत्र तुम्हाला यासाठी एक तृतियांश मदत करु शकतात.कधीकधी अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय हस्तक्षेप करुन शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते.त्यामुळे निराश होऊ नका काही गोष्टी निसर्गाच्या हातात असतात व निसर्ग आपल्याला जे चांगले तेच देत असतो.यासाठी जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीची निवड कोणत्या कारणांमुळे करावी लागते ?
संदर्भ-
Garbhasanskar during pregnancy by Dr Vikram & Geetanjali Shah.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock