Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नैराश्यावर मात करण्यासाठी औषधांसोबतच फायदेशीर ठरतील हे होलिस्टिक उपचार !

$
0
0

भारतामध्ये वीस पैकी एक व्यक्ती नैराश्याने ग्रस्त आहे.नैराश्य ही समस्या चिंताजनक असून त्याचा अनेक गोष्टींवर प्रभाव पडत असतो.या आजारपणाची लक्षणे ओळखून काही महत्वाची पाऊले उचलल्यास तुम्ही नैराश्यावर उपचार करण्यासाठी अर्धी लढाई जिंकू शकता.महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी एखाद्या प्रोफेशनल,वैद्यकीय सल्लागार व्यक्ती अथवा कुटूंबियांची मदत घेण्यास मुळीच संकोच बाळगू नये.यासाठी वाचा नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी

आजकाल नैराश्यावर अनेक औषधोपचार व  प्रगत उपचार थेरपी उपलब्ध असल्या तरी नैराश्य दूर करण्यासाठी त्या पुरेश्या नाहीत.याउलट नैराश्य दूर करण्यासाठी नैसर्गिक उपचारांनी शरीर,मन व आत्मा याबाबत होलिस्टिक दृष्टीकोनातून उपचार करणे अधिक फायदेशीर ठरते.औषधांसोबतच पौष्टिक आहार,व्यायाम,चर्चा थेरपी अशा होलिस्टिक उपचार तंत्राचा चांगला फायदा होतो.तसेच जाणून घ्या डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !

मुलूंडच्या फोर्टीस हॉस्पिटलचे Psychiatrist Dr Parul Tank यांच्याकडून जाणून घेऊयात नैराश्य दूर करण्यासाठी मदत करणारे काही होलिस्टिक व प्रभावी उपचार तंत्र.

१.व्यायाम- दररोज स्वत:ला २० मिनीटे ब्रीस्क वॉक घेण्यासाठी वचनबद्ध करा. तसेच यासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा तुम्ही सालकलींग अथवा स्विमींग देखील करु शकता.अधिक प्रोत्साहनासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्यासोबत व्यायाम करण्यासाठी विनंती करु शकता.जास्त वेळ बसून न रहाता स्वत:ला शारीरिक दृष्या सक्रिय करा कारण सतत बसून राहील्याने तुमच्या मेंदूला कमी रक्तपूरवठा होतो.बसून काम करण्याची सवय असल्यास प्रत्येक अर्धा तासाला एक मिनीटासाठी तरी उठून उभे रहा.व्यायामामुळे ताण कमी होतो,मूड सुधारतो,आत्मसन्मान वाढतो व चांगली झोप देखील लागते.जाणून घ्या विपश्यना करण्याचे आरोग्यदायी फायदे !

२.झोप-नैराश्यामुळे कधीकधी लोकांना कमी अथवा जास्त झोप लागते.अनेकांना नैराश्यामध्ये या समस्येला सामोरे जावे लागते.यासाठी झोपेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जरी तुम्हाला नैराश्यामुळे झोप येत नसली तरी तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करा.सकाळी उठण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा व जाग आल्यावर बेडमधून लगेच बाहेर पडा.झोपण्यापूर्वी खाणे,वाचणे व टि.व्ही पहाणे अशा गोष्टी करणे टाळा.यासाठी रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

३.पौष्टिक खा-पौष्टिक अन्न खाणे जितके तुमच्या शरीरासाठी लाभदायक असते तितकेच ते तुमच्या मन:स्वास्थासाठी उत्तम असते.पौष्टिक आहार घेतल्याने नैराश्य कमी होत जाते व तुमची समस्या दूर होऊ शकते.यासाठी अति साखरेचे व प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.नैराश्यावर मात करण्यासाठी Mackerel,Sardines,अक्रोड,अळशी,हॅम्प सीड्स,चीया सीडस् असे ओमेगा ३ फॅटी अॅसीड असलेले पदार्थ खा.हे पदार्थ मूड सुधारण्यासाठी फायदेशीर असतात.नंतर खाऊ अशी सवय स्वत:ला कधीच लावू नका कारण ते तुमच्या मेंदूसाठी चांगले नाही.दिवसभरात अधून मधून फळेसुकामेवा खात रहा व डी-हायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.डीप्रेस मूड सुधारायला आहारात करा हे बदल !

४.दीर्घ श्वासाचा व्यायाम-नैराश्यामधून बाहेर पडण्यासाठी दीर्घ श्वास घेणे फार महत्वाचे आहे.विश्रांती घेत असलेल्या शरीराला हालचाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दीर्घ श्वसनाच्या सरावामुळे Parasympathetic Nervous System ला उत्तेजना मिळते.श्वसनामध्ये झालेल्या बदलामुळे शरीराकडून मनाला मिळणारा संदेश बदलतो व मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात.यासाठी जाणून घ्या अचानक Mood Swing होण्याची 6 कारणं

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>