माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे तो समाजामध्ये रहातो.माणसाला एकटे जगणे शक्य नसते.सहाजिकच माणसाला एकटेपणाची भिती वाटू लागते.एकटे जीवन कंठीत करणे अवघड व असह्य असू शकते या भितीतूनच मग काही चुका माणसाकडून घडत जातात.
एकटेपणाच्या भितीपोटी या चुका कधीच करु नका-
१.ढोंगी मित्रांशी मैत्री करणे-कधी कधी एकटेपणाच्या भितीतून आपण कोणत्याही व्यक्तीसोबत मैत्री करतो.अगदी काही तासांपूर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत देखील आपली मैत्री होऊ शकते.खरंतर मैत्री करण्याआधी ती व्यक्ती खरंच तुमच्या मैत्रीसाठी योग्य आहे का याची परिक्षा घेणे गरजेचे आहे.कारण भविष्यात अशा फसव्या मैत्रीतून दुखावले जाण्यापेक्षा एकटे रहाणे नेहमीच योग्य असू शकते.अधिक वाचा पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह स्वभावाच्या माणसांना कसे ओळखाल?
२.स्वत:ला दुखावून घेणे-तुम्ही ब-याचदा चुकीच्या व्यक्तीशी मैत्री करता व अशा लोकांना सतत आनंदी ठेवण्यासाठी धडपडत रहाता.असे करणे जरी चुकीचे नसले तरी त्यामध्ये तुमच्या जीवनातील महत्वाचा वेळ वाया जात असतो.तुम्हाला एकटेपणाची भिती वाटत असते म्हणून तुम्ही अशा लोकांचा त्रास सतत सहन करत रहाता.लक्षात ठेवा अशा लोकांसाठी स्वत:ला दु:ख देत बसण्यापेक्षा एकटे रहाणे नेहमीच चांगले.तसेच तुम्ही भावनाशुन्य व्यक्तीसोबत डेटींग करत असल्याचे हे ७ संकेत जरुर ओळखा.
३.खूप पैसे खर्च करणे-लोकांमध्ये मिसळण्यासाठी व सोशल लाईफ जगण्यासाठी तुम्ही कॅफे किंवा रेस्टॉरंट अशा ठिकाणी भरपूर पैसे खर्च करता.असे कधीतरी करण्यामध्ये काहीच वावगे नाही पण जर तुम्ही दररोज यासाठी स्वत:चे पैसे खर्च करीत असाल तर ते मुळीच योग्य नाही.लोकामध्ये मिसळण्यासाठी असा अनावश्यक खर्च करत बसणे मुर्खपणाचे आहे.त्यापेक्षा अश्या प्रकारच्या खर्चाला आवर घाला व साठवलेल्या पैश्यातून स्वत:साठी काहीतरी करा.
४.कोणासाठी देखील सहज उपलब्ध होणे-एकटेपणा येऊ नये यासाठी तुम्ही सतत मित्र-मैत्रिणी जोडता.त्यामुळे ब-याचदा तुम्ही तुम्हाला वेळ नसताना देखील अगदी कोणासाठीही कधीही उपलब्ध होता.तुमच्या अशा वागण्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुमच्या वेळेचा विचार करीत नाही.तुम्ही कधीही उपलब्ध होत असल्यामुळे लोक तुम्हाला जास्त महत्व देत नाहीत.
५.सतत सोशल मिडीयावर असता-सोशल मिडीया हा एकटेपणा दूर करण्याचा मार्ग मुळीच नाही.सतत इतरांचे प्रोफाइल पहाणे,दुस-यांच्या जीवनातील घडामोडी पहात बसणे यामुळे तुमच्यामधील एकटेपणाची भावना अधिक वाढते व तुम्ही अधिक दु:खी होता.यासाठी वाचा व्हॉट्सअॅपवरील या ’10′ चूका नात्यास ठरतात मारक !
६.कामाकडे कमी लक्ष देणे-कधी कधी तुम्ही तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील याचा निष्फळ विचार करीत बसता.लोकसंग्रह करण्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळे तुमचे तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होते.खरंतर जर तुम्ही कामात मन गुंतवले तर तुमचा एकटेपणा सहज दूर होऊ शकतो.
वाचा वृद्धांच्या या ‘१०’ भावनिक गरजा पूर्ण केल्यास त्यांना नैराश्य मात करण्यास मदत होईल !
एकटे रहाणे अथवा एकटेपणा सहन करणे आव्हानात्मक असू शकते पण तो तुम्ही प्रयत्नपूर्वक नक्कीच दूर करु शकता.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock