मधूमेहींना गोड खाण्याची इच्छा असेल तरीही नेमके काय खावे ? आणि किती प्रमाणात खावे ? याबाबत नेहमीच सजग रहावे लागते. कारण प्रमाणाच्या बाहेर किंवा चूकीच्या पद्धतीने आहारात गोड पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील साखर अचानकपणे वाढू शकते. आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणात अशाप्रकारे चढ -उतार होणं मधूमेहींच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
फळांचा नियमित आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. परंतू फळं नैसर्गिकरित्या गोड असतात. त्यामधील फ्रुटोज ही नैसर्गिक स्वरूपातील साखर आहे. त्यामुळे मधूमेहींनी नेमकी फळं कोणती यावरही अनेक बंधन असतात.
‘ मधूमेहींनी विशिष्ट फळंच खावीत. काही टाळावीत असा समज अनेक मधूमेहींना असतो. पण ज्यांची ब्लड शुगर ( रक्तातील साखरेचे प्रमाण) नियंत्रणात आहे, अशा मधूमेहींनी सारी फळं पण प्रमाणात खाणं फायदेशीर आहे. फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असली तरीही त्यासोबत व्हिटॅमिन, फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट घटकही असतात. जे मधूमेहींना अत्यंत फायदेशीर आहेत.’ असा सल्ला प्रसिद्ध डाएबेटॅलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे यांनी दिला आहे.
पपई हे अत्यंत आरोग्यदायी फळं आहे. त्यामधील पोषकतत्त्व पाहता, साखरेचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे कपभर पपईमध्ये केवळ 8.3 ग्रॅम इतके आहे. साखरेचे नैसर्गिकरित्या प्रमाण कमी असले तरीही पूर्णपणे पिकलेली पपई चवीला गोड असते. त्यामुळे मधूमेही आणि गोड खाण्याची इच्छा असलेले पपई खाऊ शकतात. यासोबतच पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर घटकही मुबलक असतात. व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडंट यांचा नैसर्गिकरित्या पुरवठा करणारी पपई मधूमेहींना असणारा हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासोबतच पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे देखील जाणून घ्या.
पपईमध्ये मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम घटक मुबलक असतात. काही अभ्यासाच्या अहवालानुसार, पपईच्या अर्काचा आहारात समावेश केल्यास टाईप 2 डाएबेटीस आटोक्यात येण्यास मदत होते. टाईप 2 डाएबेटीसमध्ये स्वादूपिंडाचे कार्य कमजोर झाल्याने इन्सुलीनची निर्मितीही कमी होते. या कार्याला चालना मिळण्यासाठी पपई फायदेशीर ठरतो. तर कच्चा पपई – चेहर्यावरील डागांपासून सुटका मिळवण्याचा जादूई उपाय आहे.
मधूमेहींसाठी खाणं हमखास फायदेशीर आहे. पण त्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तुमच्या मधूमेहाच्या प्रकारावर आणि स्वरूपावर फळं नेमके किती प्रमाणात खावे हे ठरते. म्हणूनच एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock