Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो का ?

$
0
0

स्वाईन फ्लूने अनेक बळी घेतल्यामुळे या आजाराची दहशत अजूनही आपल्या मनात आहे. परंतु, त्यावर योग्य ते उपचार वेळीच झाल्यास त्यातून बरं होण्याची  दाट शक्यता आहे. स्वाईन फ्लू च्या सुरवातीच्या टप्प्यात पुरेशी काळजी घेतल्यास आजार न वाढता बरा होण्यास मदत होते. स्वाइन फ्लू बळावतोय ! घाबरू नका , काळजी घ्या.

लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा परिणाम संपूर्ण इम्म्युनिटी सिस्टम आणि शरीरातील सगळ्या मुख्य अवयवांवर होतो. स्वाईन फ्लू मध्ये पेशंटची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि फक्त फुफ्फुसांच्या कार्यावर परिणाम होतो. म्हणून पेशंट बरा होणे हे व्हायरसचा फुफ्फुसांवर किती प्रमाणात परिमाण झाल्यास यावर अवलंबून असते, असे साऊथ मुंबईच्या Wockhardt Hospital च्या क्रिटिकल केयर युनिटचे डिरेक्टर Dr Prakash Jiandani, यांनी सांगितले. काही वेळेस स्वाईन फ्लू मुळे ब्रेन डॅमेज आणि cardiac arrest होऊ शकते. परंतु, बरेचदा श्वसन मार्गातील इन्फेकशनशी लढतानाच मृत्यू होतो. चिकन खाल्ल्याने स्वाईन फ्लू होतो का ?

  • ट्रीटमेंटस:

स्वाईन फ्लू मध्ये सर्वप्रथम अँटीव्हायरल थेरपी एकतर तोंडावाटे किंवा कॅप्सुलच्या स्वरूपात दिली जाते. तोंडावाटे देण्यात येणाऱ्या गोळ्या औषधांनी फरक न पडल्यास व्हेंटिलेशन सुरु करतात. स्वाईन फ्लू ची कमी अधिक प्रमाणात लक्षणे दिसताच व्हेंटिलेशन देण्यामागचे कारण की रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा वाढावा आणि फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत व्हावे. परंतु, याचा फायदा काही ठराविक मर्यादेपर्यंत होऊ शकतो. जर फुफ्फुसांना भरून न निघणारी हानी पोहचल्यास उत्तम काळजी घेऊन देखील त्याचा अधिक फायदा होऊ शकत नाही, असे Dr Jiandani म्हणाले. स्वाइन फ्लूच्या नेमक्या लक्षणांची तुम्हाला माहिती आहे का ?  

  • उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अधिक योग्य ठरेल.

या कारणामुळे स्वाईन फ्लू वर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अधिक योग्य ठरेल. स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि सुरवातीच्या काळातच आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही सर्दी आणि खोकला झाल्यावर लगेच स्वाईन फ्लू होईल. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय

त्यासाठी तुम्हाला योग्य त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. विशेषतः बीपी, मधुमेह असलेल्यांनी आणि वृद्ध लोकांनी लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करणे आवश्यक आहे, असे Dr Jiandani म्हणाले. व्हिडियो- ‘स्वाईन फ्लू’ व आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपचार – डॉ. बालाजी तांबे

लक्षणं दिसायला लागल्यानंतर ४८ तासांच्या आत उपचार केल्यास लवकर बरं होण्यास मदत होते. परंतु, त्यामुळे काही फरक न पडल्यास व्हेंटिलेशनने ऑक्सिजन थेरपी देण्याची गरज भासते. त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत होण्यास फायदा होतो. ‘High frequency ventilation किंवा extracorporeal membrane oxygenation (ECMO) यामुळे पेशंटला स्वाईन फ्लू च्या लक्षणांपासून रिकव्हर होण्यास मदत होते, असे Dr Jiandani यांनी सांगितले. स्वाइन फ्लूमध्ये आहाराबाबत काय काळजी घ्याल?

अधिक उशीर न करता वेळेवर औषधं आणि उपचार मिळाल्यास हेल्दी व्यक्तीला लक्षणांपासून आराम मिळण्यास सुमारे ४८-७५ तास आणि पूर्णपणे रिकव्हर ५-७ दिवस लागतील. थकवा आणि अशक्तपणा आठवडा-दोन आठवडे राहील. परंतु, योग्य ती काळजी, आहार घेतल्यास आणि आराम केल्यास तो निघून जाईल, असे Dr Jiandani यांनी सांगितले. स्वाइन फ्लू व्हिडियो: स्वाइन फ्लूची लक्षणं वेळीच जाणा आणि धोका टाळा

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>