1 जुलैपासून देशभरात एकच टॅक्स भरावा लागणार आहे. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे द्यावे लागणारे टॅक्स काढून आता देशभरात समान करप्रणाली सुरू करण्यात आली आहे. GST करप्रणालीमध्ये काही वस्तू या करमुक्त तर उर्वरीत वस्तूंवर 5%,12%,18%आणि 28% अशा विविध टॅक्स स्लॅबमध्ये विभागले आहेत. यामुळे महागाई नियंत्रणात येईल. पण आरोग्यक्षेत्राला GST चा फटका बसणार की आरोग्यक्षेत्रातील सोयीसुविधा स्वस्त होणार हे वेळीच घेण्यासाठी पहा हा खास सल्ला !!
- GST करमुक्त -
काही जीवनावश्यक गोष्टींना GST पासून दूर ठेवण्यात आले आहे. यामध्ये ताजे दूध, दही, ताक यांचा समावेश आहे. सोबतच सिरिएल्स, ताज्या भाज्या, ताजी फळं, मासे यांना करमुक्त केले आहे. मीठावरदेखील कोणत्याही स्वरूपाचा कर नाही. नुकतेच आझाद मैदानात 6 दिवस उपोषण केल्यानंतर महिला बचतगटात बनवलेले सॅनिटरी नॅपकीनदेखील पुर्णतः करमुक्त करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. औषधं आणि वैद्यकीय सेवांचा विचार करता, कॉन्डोम, कॉन्ट्रासेप्टीव्ह, हिएरिंग एड यांच्या किंमती पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्या आहेत.
- 5% GST
स्वयंपाकघरातील वस्तूंपैकी पॅकेज्ड पनीर, फ्रोझन भाज्या, फ्रोझन फ्रुट्स, गूळ, व्हेजिटल फॅक्ट्स आणि तेल यांना 5% GST मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हेल्थकेअर पाहता, हेपिटायटिससाठी डायनोस्टिक किट्स, व्हॅक्सिन, ओआरएस (oral rehydration salts), वैद्यकीय चाचण्या यांनादेखील 5% GST मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हृद्यरोगींसाठी वरदान ठरणारी Coronary stents,coronary stent systems, cardiac catheters, कृत्रिम किडनी यांना 5% GST मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सोबतच व्हीलचेअर, वॉकिंग फ्रेम्स, आर्टिफिशिएल लिम्बस यांवरही 5% GST लागणार आहे.
- 12 % GST
दुधापासून बनवलेले फॅट्स, तूप, बटर, तेल, चीझ स्प्रेड हे महाग होण्याची शक्यता आहे. यासोबतच सुकामेवादेखील महागणार आहे. अॅनिमल फॅक्ट्स, ऑईल, बर्फ, सोया मिल्क ड्रिंक्स, फ्रुट पल्प, फ्रुट ज्युस यांचा समावेश 12% GSTच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.
- नवजात मुलांना दूध पाजण्यासाठी फिडिंग बॉटल्स,निपल्स
- चष्म्याच्या लेन्स
- कॉन्टॅक्ट लेन्स
- ग्लुकोमीटर यांवर 12% GST आकारण्यात आला आहे.
ऑर्थोपेडीक अप्लायनेस, वॉकिंग स्टिक्स, सर्जिकल बेल्ट्स, फ्रॅक्चरसाठी लागणारे सामान, आर्टिफिशिएल बॉडी पार्ट्स यांचा समावेश करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी टॉवेल्स, टॅम्पन, डायपर यावर पूर्वी 14.5% टॅक्स होता आता 12% करण्यात आला आहे. यासोबतच आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार यांचा समावेश 12% GST मध्ये करण्यात आला आहे.
- 18% GST
रिफाईंड शुगर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, वॅफेल्स (चॉकलेटशिवाय) , पेस्ट्री, केक, जॅम,जेली, कन्डेंस मिल्क, सॉस, सूप्स,ब्रोथ यांचा समावेश GST च्या 18% स्लॅब मध्ये करण्यात आला आहे.
खाण्याच्या काही चटकदार पदार्थांसोबतच साबण, इसेन्शिएल ऑईल, हेअर ऑईल, टॉयलेट पेपर यावरदेखील 18 % GST आकारण्यात येईल. पूर्वी मेडिकल इन्शुरंस वर 15% टॅक्स होता मात्र आता त्यामध्ये वाढ करून तो देखील 18% करण्यात येईल.
- 28% GST
तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थ यांचा GST च्या अंतिम म्हणजेच 28% स्लॅब मध्ये समावेश करण्यात आला आहे. च्युईंग गम, पानमसाला, व्हाईट चॉकलेट, कोको बटर, कार्बोनेटेड ड्रिंक्स , ब्युटी प्रोडक्ट्स,डेन्टल हायजिन, डिओड्रन्ट, शेव्हिंग क्रीम यांच्यावर 28% GST आकारण्यात आला आहे.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock