Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कारल्याचा रस पिण्याचे होऊ शकतात हे ’5′गंभीर परिणाम !

$
0
0

दिवसाची सुरवात चहा- कॉफी सारख्या उत्तेजक पेयांनी करण्यापेक्षा फळांच्या किंवा भाज्यांच्या हेल्दी ड्रिंक्सने करण्याचा सल्ला अनेकांनी ऐकला असेल, वाचला असेल.(नक्की वाचा : दिवसाची सुरवात करा या ’7′ आरोग्यदायी पेयांनी !) प्रामुख्याने अनेक मधूमेही रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात रहावे याकरिता दिवसाची सुरवात कारल्याच्या रसाने करतात. पण अशाप्रकारचे घरगुती उपाय करणं खरंच फायदेशीर आहे का ? कारल्याच्या रसाने दूर ठेवा या ’8′ समस्या पण तरीही अति तेथे माती या नियमानुसार कारल्याचा आहारात अति समावेश करणं या काही कारणांसाठी त्रासदायकच ठरू शकते.

1.अ‍ॅन्टी डाएबेटिक ड्रग्सचा प्रभाव बिघडतो -

तुमच्या औषधांमध्ये अ‍ॅन्टी डाएबेटीक ड्रग्सचा समावेश असेल तर कारल्याचा रस दूर ठेवा. कारण कारल्यामध्येही अ‍ॅन्टी डाएबेटिक क्षमता असते. त्यामुळे औषधांसोबत कारल्याचा रसही प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी अधिक खालावू शकते. हे प्राणघातक ठरू शकते.

2. हायपोग्लासमिक कोमा ची परिस्थिती उद्भवू शकते -

हायपोग्लास्मिक कोमा ही परिस्थितीदेखील गंभीर ठरू शकते. या परिस्थितीमध्येही रक्तातील साखरेची पातळी अगदी खालावू शकते. कारल्याचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. त्यामुळे अनेकदा शुद्ध हरपण्याची शक्यता असते. काही मुलांमध्ये कारल्याचा काढा प्यायल्यानंतर त्यांना hypoglycemia coma चा त्रास झाल्याची घटना घडली आहे.

3. हृद्याच्या ठोकांमध्ये अनियमितता –  

हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत atrial fibrillation म्हणतात. ही समस्या फारशी त्रासदायक वाटत नसली तरीही यामुळे हार्ट बंद पडण्याची, स्ट्रोकचा त्रास वाढण्याची शक्यता असते. कारल्याचा रस प्यायल्यानंतर एका 22 वर्षीय मुलाच्या हृद्याची धडधड वाढल्याचे दिसून आले होते. त्या मुलाला कोणताही त्रास नसताना हे आढळून आल्याचे डॉक्टारांनी स्पष्ट केले आहे.

4. गर्भपाताचा धोका -

गरोदरपणाच्या काळात स्त्रियांनी कारल्याचा आहारात समावेश करताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारल्याच्या अति सेवनाने गर्भपाताचा धोका असतो. 2010 साली गरोदर उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार, पूर्णपणे न पिकलेले  फळ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे संशोधकांच्या सल्ल्यानुसार गरोदरपणात आहारात कारल्याचा समावेश प्रमाणातच करावा. मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?

5.पोट बिघडते -

कारल्याचा रस प्यायल्यानंतर अनेकांचे पोट बिघडत असल्याचे आढळून येते. डायरिया, पोटदुखी हा त्रास कारल्याचा रस प्यायल्यानंतर दिसून येणं सामान्य आहे. त्यामुळे हा त्रास होत असल्यास ताबडतोब कारल्याचा रस पिणं बंद करा.

म्हणूनच कारल्याचा रस पिण्याचा घरगुती उपाय निवडण्यापूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पहा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय निवडू नका. कडू कारल्याचे ’10′ स्वादिष्ट प्रकार !

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>