Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘बाबा’होण्यापूर्वी जाणून घ्या या 9 गोष्टी !

$
0
0

पत्नी गरोदर असताना पुरुषांना देखील तिला मदत करावी असे वाटत असते पण अशा वेळी नेमके काय करावे हे त्यांना समजत नाही.सर्वजण भावी मातेला  सल्ले देत असतात पण भावी पित्याकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते.अज्ञानामुळे किंवा काय करावे हे समजत नसल्यामुळे पुरुष आपल्या गरोदर पत्नीची काळजी घेण्यात कमी पडतात.जर तुमची पत्नी गरोदर असेल व तुम्हाला तिला मदत करण्याची इच्छा असूनही काय करावे हे समजत नसेल तर हे मार्गदर्शन तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल.तसेच वाचा गरोदर स्त्रीयांनी बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या पतीसोबत या ७ गोष्टींबाबत जरुर चर्चा करावी.

१.गरोदरपण व प्रसूतीबाबत पुस्तके वाचा-जरी तुम्हाला प्रसूतीवेदना सहन कराव्या लागणार नसल्या तरी या माहितीमुळे तुम्ही तुमच्या पत्नीला प्रसूतीदरम्यान होणारा त्रास नक्कीच समजून घेऊ शकता.यामुळे तुमच्या मनात तिच्याबद्दल सहानूभूती निर्माण होईल व तुम्ही तिला अपेक्षित असणारा आधार देऊ शकाल.जाणून घ्या पुरूषांचे ‘बाबा’ होण्याचे योग्य वय काय असावे ?

२.प्रसूतीपूर्व क्लासला जा-तुमच्यासोबत अशा क्लासमध्ये गेल्यामुळे केवळ तुमची पत्नी खूश होईल असे नाही तर तुम्हाला देखील चांगले पिता होण्याचे मार्गदर्शन मिळेल.बाळाच्या जन्मानंतर करायच्या अनेक गोष्टी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवण्यात येतील.बाळाचे डायपर बदलणे,बाळाला ढेकर देणे अशा अनेक गोष्टी नंतर तुम्हाला कराव्या लागतील.त्यामुळे आधीच या सर्व गोष्टींबद्दल अचूक ज्ञान मिळवणे तुमच्या फायद्याचे ठरेल.नवजात बाळाला भेटण्यापूर्वी या ’6′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

३.सतत तिच्या जवळ रहा.(कमीतकमी फोनवरुन तरी)-गरोदरपणामध्ये स्त्रीयांचा मूड सतत बदलत असतो,अशा काळात स्त्री प्रचंड भावनिक होते किंवा तिला एखादा पदार्थ खाण्याचे डोहाळे लागू शकतात.त्यामुळे अशा काळात तुम्ही तिच्या सतत जवळ असणे गरजेचे आहे.तुम्हाला सतत तिच्याजवळ  थांबणे शक्य नसले तर कमीतकमी फोनवरुन तरी तिच्या संपर्कात रहा.जरी तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी असाल तरी गरज असेल तेव्हा तुम्ही तिच्याबरोबर स्काइप,व्हाट्स अॅप व व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून  बोलू शकता.याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

४.प्रेगन्सी जर्नल मध्ये नोंद करा-तुमच्या दृष्टीकोनातून तिच्यामध्ये दिसणारे गरोदरपणातील सर्व बदल नोंद करा.डिलीव्हरीनंतर या दिवसांची गोड आठवण म्हणून हे प्रेगन्सी जर्नल तुम्ही तुमच्या पत्नीला भेट स्वरुपात देऊ शकता.जाणून घ्या बेबी किक्स बाबत या ६ इंटरेस्टिंग गोष्टी

५.तिला डॉक्टरकडे तपासणी करण्यास जाण्याची आठवण करुन द्या-डॉक्टरांच्या विझिटचा दिवस लक्षात ठेऊन त्या दिवशी तिला फुले अथवा चॉकलेट पाठवून स्मरण करुन द्या.अर्थातच तिला याची आठवण असेलच पण तुम्ही तिची घेत असलेली काळजी तिला आनंदी ठेवण्यास आणखी मदत करेल.हे स्मरण आणखी रोमॅन्टीक करण्यासाठी तुम्ही तिला या भेटवस्तूंसोबत एखादा सुंदर संदेश हाताने लिहून देऊ शकता.गायनेकॉलॉजीस्टची निवड करताना या गोष्टींचे भान ठेवा.

६.सोनोग्राफी रिपोर्ट समजून घ्या व तिला देखील तो वाचून दाखवा-खरेतर सोनोग्राफी रिपोर्ट तुम्हाला अथवा तुमच्या पत्नीला समजणे कठीण आहे.पण ते रिपोर्ट पहाणे व तुमच्या होणा-या बाळाबद्दल बोलणे फारच रोमांचक असू शकेल.त्यामुळे तुमची जरी इच्छा नसली तरी देखील तुमच्या पत्नीसोबत बसून पुन्हा पुन्हा सोनोग्राफीचे रिपोर्ट पहा.कारण हा काळ पुन्हा पुन्हा येणार नाही.

७.डॉक्टरांसोबत बोला व तुमच्या शंकाचे निरसन करा-जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या व बाळाच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर त्याबाबत तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा व तुमच्या मनातील शंकाचे निरसन करा.तिला मी तुझ्यासाठी काय करु? असे विचारण्यापेक्षा तिच्या गरोदरपणातील लक्षणांचे निरिक्षण करा व त्याबाबत तुमच्या डॉक्टरांना प्रश्न विचारा.जर तुम्ही तिला या काळात यासाठी हवी तशी मदत करु शकलात तर तुम्ही तिच्यासाठी तिचे सर्वस्व व्हाल.

८.तिच्यासाठी Maternity कपडे आणा-शॉपिंग हे प्रत्येक महिलेला फार आवडते.त्यामुळे या काळात तिला आरामदायक असलेले कपडे तिच्यासाठी खरेदी करा.तिचे गरोदरपण अधिक सुंदर दिसण्यासाठी हे कपडे निवडण्यासाठी तिला मदत करा.ती हे स्वत:साठी खरेदी करु शकते पण जर तुम्ही तिच्यासाठी खरेदी केलीत तर तिला जास्त आनंद मिळेल.

९.तिला  बरे वाटेल असे वागा-तिला बरे वाटेल किंवा तिला ज्यातून आनंद मिळेल असे वागा.कारण सर्वात महत्वाचे आहे तिने या काळामध्ये आनंदी व प्रसन्न रहाणे.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>