योगाचे असंख्य फायदे आहेत. पण योगसाधना निसर्गाच्या सानिध्यात केल्यास अधिकच उत्तम. योगा म्हणजे फक्त आसन नाहीत तर प्राणायाम, ध्यान याचा देखील त्यात समावेश आहे. योगसाधना हा एक प्रवास आहे. ज्यात तुमचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक विकास होतो. लहान मुलांप्रमाणे आपण बाहेर खेळू शकत नाही. पण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने नक्कीच प्रसन्न वाटते आणि योगाने रिलॅक्स होतो. या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या तर त्याचे फायदे नक्कीच द्विगुणित होतील. योगिनी, TEDTalk speaker आणि a social media influencer, Natasha Noel, यांनी आऊटडोअर योगाचे महत्त्व सांगितले.
- संवेदना जागृत होतात: मातीचा किंवा फुलाचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. पक्षांची किलबिल ऐकत हिरवळीवर चालण्याचा आनंद निराळाच असतो. निळसर आकाश आणि हिरवळ नेत्रसुखद असते. या सगळ्यामुळे तुमच्या संवेदना जागृत होतात. तसंच तुम्ही अधिक प्रसन्न आणि सकारात्मक होता.
- अंतर्मनातील आवाज ऐकू लागता: जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असता तेव्हा गर्दी, गाड्या, प्रदूषण यापासून लांब असता. त्यामुळे स्वाभाविक तुम्ही शांत होता आणि अंतर्मनातील आवाज, विचार ऐकू लागता. तुम्हाला काय हवंय, हे तुम्हाला कळू लागते आणि स्वतःची नवी ओळख तुम्हाला होते.
- बॅलन्सिंग सुधारतं: योगा किंवा ध्यान करण्यासाठी बाहेर योग्य जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीत तुम्ही आसन करता. खडबडीत जागेत योगा करताना निश्चितच तुमचं शारीरिक बॅलन्सिंग सुधारतं. पायांची आणि कोर मसल्सची स्ट्रेंथ वाढते.
- ऊर्जा मिळते: तुम्हाला माहीत आहे का ? निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नैसर्गिक वातावरणात मेंदूच्या संवेदना जागृत होतात आणि शरीर नैसर्गिक स्थितीत येते. परिणामी तुमची जागरूकता वाढते. यातून तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते.
- तुम्ही स्ट्रेस फ्री होता: योगामुळे ताण दूर होतोच. पण जेव्हा योगसाधना निसर्गाच्या सानिध्यात केली जाते तेव्हा मानसिक शांतता मिळते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतात ते शहरात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत ताण तणावापासून मुक्त असतात. निसर्गाच्या सानिध्यात रहा आणि ताण, नैराश्यावर मात करा !
- श्वसन सुधारते: हे अत्यंत नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्ही फ्रेश हवेत श्वास घेता तेव्हा तुम्हाला पुरेसं ऑक्सिजन आणि शुद्ध हवा फुफ्फुसात जाते. परिणामी श्वसन सुधारते. या 3 श्वसन व्यायामांनी कमी करा वाढवा तुमचा आत्मविश्वास !
- व्हिटॅमिन डी मिळतं: आपण नैसर्गिक प्राणी आहोत आणि कायम राहू. म्हणून आपलं निसर्गाशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. तसंच कोवळ्या उन्हातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल.
Read this in English
Translated By –Darshana Pawar