Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हेयर ट्रांसप्लांटेशनबद्दलचे ‘५’समज-गैरसमज !

$
0
0

आजकाल हेयर ट्रांसप्लांटेशन सामान्य झाले आहे. परंतु, त्यासंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहे. हेयर ट्रांसप्लांटेशन करणे हा टक्कल दूर करण्याचा कायमस्वरूपी उपाय आहे. या कारणांमुळे केस विरळ होण्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरत नाहीत !

Alvi Armani India च्या मेडिकल डिरेक्टर आणि चीफ हेयर ट्रान्सप्लांट सर्जन Dr Arihant Surana, यांनी हेयर ट्रांसप्लांटेशनबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी खास मार्गदर्शन केले. हेअर ट्रान्सप्लांटेशनचा विचार करताय? मग या एक्स्पर्ट टीप्स नक्की लक्षात ठेवा.

गैरसमज १: हेयर ट्रांसप्लांटेशनमुळे मेंदू, डोकं आणि डोळे यांच्या समस्या उद्भवतात.

सत्य: हेयर ट्रांसप्लांटेशन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचा मेंदू, डोकं आणि डोळ्यांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. कारण आपल्या टाळूचे एकूण ५ थर असतात. त्यापैकी फक्त वरच्या थरावर हेयर ट्रांसप्लांटेशनची प्रक्रीया होते. त्याचा आतील अवयवांशी काही संबंध येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही किंवा आतील अवयवांना हानी पोहचत नाही.

गैरसमज २:  हेयर ट्रांसप्लांटेशन केल्यानंतर केस वाढत नाहीत. कारण ते कृत्रिम केस असतात.

सत्य:  हेयर ट्रांसप्लांटेशनच्या प्रक्रीयेत पेशंटच्या खऱ्या केसांचे एक्सट्रॅकशन करून केस नसलेल्या भागात ट्रांसप्लांट केले जाते. एक्सट्रॅकशन केलेल्या केसात केसवाढीचे गुणधर्म केसात असतात. त्यामुळे ते दुसऱ्या जागी अरेन्ज केले तरी त्याची वाढ होते.

गैरसमज ३: हेयर ट्रांसप्लांटेशन आणि एक्सट्रॅकशन खूप त्रासदायक असते.

सत्य: प्रक्रीया सुरु करण्यापूर्वी टाळूवर लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो. त्यामुळे हेयर ट्रांसप्लांटेशन आणि एक्सट्रॅकशन करताना होणारा त्रास जाणवत नाही.

गैरसमज ४: ट्रांसप्लांटेड केस आणि नैसर्गिक केसांमधला फरक दिसून येतो.

सत्य: हेयर ट्रांसप्लांटेशन करण्यापूर्वी केसांचा रंग, टेक्सचर, दिशा, अँगल याचा खोलवर व काळजीपूर्वक विचार केला जातो. त्यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येतात. चांगल्या हेयर प्लांट सर्जनकडे कौशल्य असल्याने हेयर ट्रांसप्लांटेशन दरम्यान येणारे डाग ते कमी वेळात घालवतात. एकदा ते डाग गेल्यानंतर नैसर्गिक केस आणि ट्रांसप्लांटेड केसांमधला फरक ओळखणे कठीण होते.

गैरसमज ५: हेयर ट्रांसप्लांटेशन कायमस्वरूपी टिकत नाही.

सत्य: ट्रांसप्लांटेशन प्रक्रीयेदरम्यान loss resistant follicles ट्रान्सप्लांट केले जातात. सामान्यपणे होणाऱ्या केसगळतीचा या फॉलिकल्सवर परिणाम होत नाही. ट्रांसप्लांटेशन केस सर्जरीनंतर ३-४ आठवड्यात वाढू लागतात. हे नैसर्गिक प्रक्रीया आहे. परंतु, ट्रान्सप्लांट केलेले फॉलिकल्स ६-७ आठवड्यात वाढण्यास सुरवात होते आणि ते कायमस्वरूपी असते.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>