Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पेस्टकंट्रोलऐवजी या ’5′नैसर्गिक उपायांनी दूर करा घरातील किड्या-मुंग्या !

$
0
0

येत्या काही दिवसांत दिवाळीच्या फराळासोबतच घराच्या साफसफाईलादेखील सुरवात होईल. अनेकदा स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये किड्या-मुंग्या होऊ नयेत म्हणून काही पेस्टीसाईड्स किंवा केमिकल्सयुक्त औषधांचा फवारा मारला जातो. पण यामुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. काहींना यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास संभवू शकतो. म्हणूनच यापासून बचावण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा वापर करा आणि घरासोबतच तुमचे आरोग्यही सांभाळा.

  • मच्छरपासून बचावासाठी लसूण

स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा. मच्छर दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे देखील नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

  • मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर -  

ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

  • झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर  - 

घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्‍यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास  मदत होते. झुरळांमुळे होते अन्नविषबाधा ! मग त्यापासून बचावण्याचे 8 उपाय नक्की आजमवा.

  • सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात - 

कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्‍यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे,दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.

  • कापूरामुळे माश्या दूर राहतील -

कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर  होतो. घरातील कोपर्‍यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे मश्या दूर होतात.

मग साफसफाई  करून झाल्यानंतर पेस्टकंट्रोल करून त्रास वाढवण्यापेक्षा हे नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  5 natural ways to keep your home pest-free this season!

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>