Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिंग –लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !

$
0
0

लहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या सर्रास आढळते. अशावेळी अचानक मुलं रडायला लागतात. या वेदना तीव्र  असल्याने मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. ( नक्की वाचा : मुलांच्या आहारातील या ’10′ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा)

पोटदुखीची ही समस्या धोकादायक नसली तरीही या दरम्यान लहान मुलांना त्रास होतो. अशावेळी या वेदना कमी करण्याचा एक पारंपारिक मार्ग म्हणजे पोटावर केलेला हिंगाच्या पाण्याचा मसाज .

का आहे हिंग फायदेशीर ? 

स्वयंपाकघरात वापरले जाणारे हिंग हे पावडर स्वरूपात आढळते.  फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास  मदत होते. लहान मुलांना थेट हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते. (नक्की  वाचा : मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !)

कसा कराल हा उपाय  ? 

  • अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
  • पोटाजवळ  हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
  • मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
  • पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
  • पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.
  • पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.
  • पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे  गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.
  • त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.

हिंग बाळाच्या पोटाला लावून पचनाचा त्रास कमी करण्याचा हा पर्याय त्रासदायक नसल्याने तो आवश्यक असल्यास तुम्ही बिनदिक्कत करू शकता. मात्र या उपायाने त्रास कमी न झाल्यास तसेच बाळाचे रडणे कमी न झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित दुवे - 

बाळाला दात येताना होणारा त्रास सुसह्य करणार्‍या 5 टिप्स !

बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय

बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’ गोष्टींची काळजी घ्या !

 


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - the Indian remedy for tummy ache in babies 

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>