Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Thyroid Day: Hypothyroidism नियंत्रणात ठेवण्यासाठी 9 डाएट टीप्स !

$
0
0

Hypothyroidism या समस्येमध्ये थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय झाल्यामुळे थायरॉईड हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते परिणाम शरीराच्या कार्यामध्ये काही बिघाड होण्यास सुरवात होते.  हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मूड स्वींग,डिप्रेशन,बद्धकोष्ठता,वजन वाढणे व इतर आरोग्याच्या  समस्या देखील निर्माण होतात.या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी औषधे परिणामकारक असतातच पण आहाराबाबत या काही चांगल्या सवयींचा देखील या समस्येला आटोक्यात ठेवण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.तसेच जाणून घ्या Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?

हायपोथायरॉडीझमला नियंत्रणात ठेवण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी या ९ आहाराच्या चांगल्या सवयी स्वत:ला जरुर लावा.

१.लो-फॅट आहार घ्या-हायपोथायरॉडीझम तुमच्या मेटाबॉलिझमला कमी करते याचाच अर्थ फॅटयुक्त आहार तुमची समस्या अधिक वाढवू शकतो.फॅट्सयुक्त आहार थायरॉईडच्या कार्यात अडथळा आणून तुमच्या स्थितीला अधिक गंभीर करु शकते.यासाठीच मुंबईच्या स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट व डायटिशन दीपशिखा अग्रवाल यांच्यामते हायपोथायरॉडीझम असलेल्या लोकांनी जाणिवपूर्वक व सावधपणे लो-फॅट आहार घ्यावा.तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ,रेड मीट,साखरेचे पदार्थ,तळलेले पदार्थ,मेयॉनीज,लोणी व दूध खाणे टाळावे.तसेच जाणून घ्या थायरॉईडच्या समस्येवर व्यायामाने फायदा होईल का?

२.योग्य भाज्या निवडा- हायपोथायरॉडीझम असलेल्या लोकांनी हाय मेटाबॉलिक रेट असलेल्या भाज्या खाव्या.यासाठी अशा रुग्णांनी दुधी भोपळा,कारले,शिराळ,फरसबी व इतर शेंगासारख्या कॅलरी कमी असलेल्या व भरपूर फायबर असलेल्या भाज्या आहारामध्ये समाविष्ट कराव्या.या भाज्या पचनास हलक्या असल्यामुळे यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो.मात्र अशा लोकांनी कोबी,फ्लॉवर व ब्रोकोली सारख्या खाणे टाळावे कारणे यामुळे त्यांच्या आयोडीन शोषून घेण्याची क्षमतेत अडथळा येऊन हॉर्मोन्सच्या पातळीमध्ये असतुंलन निर्माण होऊ शकते.

३. ग्रीन टी घ्या- मेटाबॉलिझम कमी होणे या समस्येला दूर करण्यासाठी ग्रीन टी चा चांगला फायदा होतो.दीपशिखा यांच्यामते दोन कप ग्रीन टी घेतल्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते व वजन आटोक्यात रहाते.मात्र ग्रीन टीमध्ये फ्लोराइड असते ज्यामुळे आयोडीनचे शोषण कमी होऊ शकते यासाठी ग्रीन टी मर्यदित प्रमाणात घ्या.

४.भरपूर प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थ खा-अकार्यक्षम मेटाबॉलिझम मुळे शरीरात ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस व फ्री रेडीकल्सची निर्मिती वाढते.यासाठी अशा रुग्णांना अॅन्टी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थ खाणे गरजेचे असते.यासाठी टोमॅटो,लाल व पिवळी भोपळी मिरची,गाजर व वांगे अशा रंगीत पदार्थांना आहारात समाविष्ट  करा ज्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट मिळेल.

५.हेल्दी नाश्ता करा- वेळेवर जेवण न घेतल्यास इन्सुलीनच्या पातळीमध्ये चढ-उतार निर्माण होतात जे हायपोथायरॉडीझम असलेल्या रुग्णासाठी प्राणघातक असू शकते.लो इन्सुलीनसह थायरॉईडची पातळी कमी झाल्यामुळे अशक्तपणा,फुफ्फुसे व मेंदूच्या कार्यात अडथळा अशा आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.यासाठी अशा रुग्णांनी वेळेवर जेवण करावे व नास्ता करणे विसरु नये.असे असले तरी नास्ता करताना भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाऊ नका.थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी अंंड्यातील पांढरा भाग ,कडधान्य ,कॉर्नफ्लेक्स असे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये समाविष्ट करा

६.भरपूर फळे खा-फळे न खाल्ल्यास तुम्हाला पुरेशा प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट मिळू शकत नाहीत.यासाठी विविध रंग व आकाराची सर्व फळे खा.फळांमधील व्हिटॅमिन व मिनरल्स मुळे तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत होते.फळांमुळे डिटॉक्सिफीकेशन चांगले होते व तुमच्यामधील ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस देखील कमी होतो.दीपशिका यांच्या मते या स्थितीतील रुग्णांसाठी डाळिंब हे फळ उत्तम असू शकते.

७.आहारात भरपूर दूधाचे पदार्थ समाविष्ट करा-२०११ मध्ये थायरॉईड जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार थायरॉडीझम व व्हिटॅमिन डी चा अभाव या समस्यांचा परस्परांशी सबंध असतो.लो फॅट दूधामधून व्हिटॅमिन डी,कॅलशियम,प्रोटीन व आयोडीन  मिळत असते.ज्यांची तुम्हाला हायपोथायरॉडीझम समस्या कमी करण्यास मदत होते.यासाठी एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरु शकते.

८.भरपूर सुकामेवा खा-मुठभर सुकामेवा खाण्याने तुम्हाला प्रोटीन व भरपूर प्रमाणात सेलेनियम मिळू शकते ज्यामुळे थायरॉईडचे कार्य सुरळीत चालते.मात्र सुकामेवा मर्यादित प्रमाणातच खा कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स व कॅलरीज देखील असतात.

९.भरपूर मासे खा-जर तुम्ही मांसाहारी असाल तर आठवड्यातून तीनदा मासे खा.फीशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते जे थायरॉईड हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे वाढण्याची शक्यता असते.फीशमुळे शरीरातील दाह कमी होतो व रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.

तसेच Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन ! देखील जरुर करा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>