Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात तोंडाचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे का ?

$
0
0

गरोदर असताना दातांचे आरोग्य तपासून बघावे का ? हा प्रत्येक गरोदर स्त्री ला पडणारा प्रश्न आहे. स्त्री रोग तज्ज्ञांकडे नियमित चेक अप्स केल्यानंतर फार कमी स्त्रिया डेन्स्टिस्टकडून दातांचे आरोग्य तपासून बघतात किंवा गरोदरपणी तोंडाचे आरोग्य जपतात. MobiDent चे Veteran Dentist and Chief Medical Officer  Dr. Devaiah Mapangada, यांनी सांगितले की गरोदरपणात प्रत्येक गरोदर स्त्री ने दातांचे चेकअप्स नियमित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे दातांच्या समस्या समजतात. त्यावर वेळीच उपचार करता येतात. तसंच गरोदरपणासंबंधित काही दातांच्या समस्या, लक्षणे असतील तर त्याचे निदान होण्यास देखील मदत होते.

गरोदरपणाचे पहिले तीन महिने फार गंभीर असतात. कारण याच टप्प्यात गर्भाला अवयव विकसित होत असतात. म्हणून एखाद्या फॉरेन बॉडीचे अस्तित्व शरीरात असल्यास nauseating reflex ला चालना मिळते. त्यामुळे मळमळणे, उलटी होणे असे त्रास होतात आणि हे गरोदरपणाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे आहेत.

तसंच गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे हिरड्यांचे विकार किंवा इन्फेकशन होण्याचा धोका असतो. त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो.  blood-brain barrier यांसारख्या कोणतेही इन्फेकशन झाल्यास त्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात गरोदर स्त्री ने इन्फेकशनपासून दूर रहावे. विशेषतः ब्लड इन्फेकशन झाल्यास त्याचा परिणाम  blood-brain barrier वर होऊ शकतो. blood-brain barrier मधून पास होणाऱ्या tetracycline आणि thalidomide या औषधांपासून देखील दूर रहा. तोंडाचे आरोग्य जपा या ‘५’ खास टीप्सने !

डेंटिस्टने टेस्ट किंवा काही उपचार करण्याचा सल्ला दिला तर ते गरोदरपणाच्या तीन महिन्यानंतर करा. कारण डेंटल सर्जरीसाठी तो टप्पा तुलनेने सुरक्षित असतो. गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यात हार्मोन्स बदलतात, त्यामुळे इन्फेकशनचा धोका अधिक वाढतो. तसंच, हिरड्यातून रक्त, पू येणे किंवा हिरड्यांचे इतर विकार यांचा धोका वाढतो. दातांच्या आरोग्याबाबत या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

हा त्रास टाळण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचे आहे. फ्लॉस करा आणि सौम्य माऊथवॉश वापरा. डेंटल इन्फेकशनला आळा घालण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करू शकता.  या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !

परंतु, तुमच्या दातांचे आरोग्य तपासून, त्याचा समस्या जाणून घेऊन त्यावर कोणते उपचार करायचे हे डेंटिस्ट अधिक योग्य पद्धतीने सांगू शकतात. म्हणून दातांची कोणतीही समस्या जाणवल्यास लगेच डेंटिस्टची भेट घ्या. कारण त्यामुळे तोंडाच्या समस्यांचा गर्भावर होणारा परिणाम आपण रोखू शकतो. तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>