उत्साहाच्या भरात अनेकदा अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू काढले जातात. काहीजण आपल्या साथीदारचे नाव टॅटूमध्ये बनवतात. पण कालांतराने नात्यात दूरावा आल्यानंतर तेच नाव नकोसे वाटते. अशावेळेस टॅटू काढून टाकण्यासाठी नेमके काय करावे? ही प्रक्रिया त्रासदायक असते का ? याबाबतचा खास सल्ला डरमॅटोलॉजिस्ट डॉ. के खतुजा यांनी दिला आहे.
टॅटू क्रिम परिणामकारक नसतात – टॅटू निघुन जाण्यासाठी क्रिम्स किंवा बाम यांचा वापर करण फायदेशीर नाही. कोणत्याच घरगुती उपायांनी किंवा क्रीम लावल्याने टॅटूपासून सुटका मिळत नाही.
लाल किंवा पिवळ्या रंगाचे टॅटू कायमचे जाणं कठीण आहे – प्रत्येक रंग शोषून घेण्यासाठी काही विशिष्ट व्हेवलेन्थ काम करतात. त्यामुळे एकाच वेव्हलेन्थमुळे सारेच रंग जाणं कठीण असते. अनेकजण काळी आणि निळी घालवणारे लेझर वापरतात. त्याचाच वापर करून लाल किंवा पिवळा रंग जाणं मुश्कील आहे.
लेझर ट्रीटमेंटदरम्यान बर्निंग स्मेल येतो – टॅटू काढताना तुम्हांला काही जाणवत नसले तरीही वास येतो. यादरम्यान त्वचेवर लेझरची किरणं जेव्हा त्वचेत जातात तेव्हा laser plume घटक वातावरणात मिसळल्यानंतर बर्निंग स्मेल येतो.
लेझर त्रासदायक ठरत नाहीत – लेझर ट्रीटमेंटपूर्वी त्वचेवर काही सोल्युशन लावून तेथील भागातील संवेदनशीलता कमी केली जाते. त्यामुळे काही सेकंद तुम्हांला त्रास जाणवतो. लेझर किरणांमुळे वातावरणातील उष्णता अधिक वाढते. म्हणूनच उपचारांदरम्यान आयवेअर दिली जातात. म्हणजे तुम्हांला काहीच दिसत नाही.
हात, पाय, घोट्यावरील टॅटू काढणं कठीण आहे – लोअर बॅकच्या भागापेक्षा बोटाच्या सांध्याजवळील टॅटू काढणं कठीण असतं. शरीरात रक्तवाहिन्यांजवळील भागातील टॅटू काढणं अधिक सुकर आहे. पाय, घोटा किंवा हात याभागावरील टॅटू काढणं कठीण आहे.
अनेक लेझर सेशन्स लागतात – टॅटू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी सुमारे 10-15 सेशन्स लागतात. त्वचेला पुन्हा पूर्ववत होण्यासाठीदेखील वेळ द्यावा लागतो.
टॅटूच्या खुणा राहतात – टॅटू पूर्णपणे काढला तरीही त्याच्या थोड्याफार खुणा राहतात. टॅटू काढला तरीही तो कोणत्या भागावर होता हे तुमचे मित्र नक्कीच ओळखू शकतात.
काही काळ दुर्गंधीचा त्रास होईल – स्कार / डाग पडू नये, त्वचा पूर्ववत व्हावी याकरिता काही जेलचा वापर करा. पण अॅन्स्थेशियाचा प्रभाव जसा कमी होतो तसा काही दिवस त्रास जाणवतो.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock