Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केमोथेरपीला प्रतिसाद न देणार्‍या कॅन्सरवर कसे केले जातात उपचार ?

$
0
0

कॅन्सरवर उपचार करायचा म्हणजे पहिली डोळ्यासमोर येणारी गोष्ट म्हणजे केमोथेरपी. पण प्रत्येक कॅन्सर केमोथेरपीला प्रतिसाद देतोच असे नाही. यकृताचा कॅन्सर किंवा त्वचेचा कॅन्सर केमोथेरपीला प्रतिसाद देत नाही. या कॅन्सरला प्रतिसाद देण्यासाठी काही वेगळ्या उपचारांची गरज असते. फोर्टीस हॉस्पिटल्स मुलुंडचे कन्ससल्टंट ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तेजेंदर सिंग यांच्या सल्ल्यानुसार केमोथेरपीला प्रतिसाद न देणार्‍या कॅन्सरवर कोणती उपचार पद्धती वापरावी?

कॅन्सरवर उपचार करताना शस्त्रक्रिया, रेडिशन किंवा केमोथेरपी यांचा मिलाफ केला जातो. सामान्यतः काही ट्युमर्स  हे संवेदनशील असल्याने केमोथेरपीशिवाय इतर काही उपाचारांची मदत घ्यावी लागते. लिव्हर कॅन्सर / यकृताचा कॅन्सर किंवा melanoma सारख्या समस्यांमध्ये केमोथेरपीला प्रतिसाद मिळत नाही. कसा ओळखाल त्वचेच्या कॅन्सरचा धोका !

एखाद्या व्यक्तीला लिव्हर कॅन्सरचा त्रास असेल तर त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. क्वचित प्रसंगी रेडिशन थेरपीची मदत घेतली जाते. लिव्हर कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यासाठी chemoembolization या थेरपीची मदत घेतली जाते.  chemoembolization हा नॉन सर्जिकल पर्याय आहे. यामध्ये केमोथेरपी ड्रग्ज आणि embolic agents यांचा एकत्र वापर केला जातो. हे एजंट्स रक्तवाहिन्यांमध्ये जातात. तेथील कॅन्सरस ट्युमरचा रक्तपुरवठा बंद करतात आणि केमोथेरपी ड्रग्ज्सच्या माध्यमातून तेथे उपचार केले जातात. केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार

केवळ Chemoembolization किंवा शस्त्रक्रिया आणि रेडिएशनच्या मदतीने कॅन्सरवर उपचार केले जातात. त्यामुळे लिव्हर कॅन्सरला आटोक्यात ठेवण्यासाठी  शस्त्रक्रिया आणि Chemoembolization या दोन उपचारपद्धतींची मदत घेतली जाते. तर त्वचेच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया हा केवळ एकच उपचार आहे. क्वचित प्रसंगी केमोथेरपीला प्रतिसाद न मिळाल्यास रेडिशनची मदत घेतली जाते.

कॅन्सर केमोथेरपीला प्रतिसाद देत नसेल तर  रेडिशन, टार्गेटेड थेरपीज किंवा  chemoembolization नंतर शस्त्रक्रियेचा पर्याय निवडावा लागतो. लिव्हर किंवा त्वचेच्या कॅन्सरमध्ये केमोथेरपीला प्रतिसाद न मिळाल्यास टार्गेटेड थेरपीने उपचार सुरू केले जातात. पण अंतिम  निर्णय हा ऑन्कोलॉजिस्ट आणि कॅन्सरच्या प्रकारावर अवलंबून असतो.स्कीन कॅन्सर विषयी या ६ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

 

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles