तुम्ही किडनी, हृद्य किंवा यकृताचं प्रत्यारोपण याबद्दल ऐकलं असेल पण गर्भाशयाचे प्रत्यारोपणदेखील होते हे तुम्हांला माहित आहे का ? नुकतेच भारतात पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्युटमध्ये दोन महिलांमध्ये यशस्वीरित्या गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतातील पहिल्या यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेबाबतची ’5′ खास वैशिष्ट्य !
जन्मतः गर्भाशय नसलेल्या, काही आजारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेल्या महिलांना मातृत्त्वाचे सुख मिळवण्यासाठी गर्भाशय प्रत्यारोपणाची प्रक्रिया नवा आशेचा किरण ठरणार आहे. पण जन्मतः गर्भाशय नसलेल्या मुलींना कोणकोणत्या शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते? गर्भाशय नसल्याने मुलीच्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो ? तिला मासिकपाळी येते का ? या आणि अशा अनेक प्रश्नांबाबत Indian Society of Assisted Reproduction (ISAR) and Scientific Director of Gynaecworld and the Gynaecworld Assisted Fertility Center, Mumbai च्या प्रेसिडंट डॉ. धुरू शहा यांनी काही समज गैरसमज दूर करण्यासाठी या गोष्टी नक्की वाचा.
1. जगभरात जन्मतः गर्भाशय नसलेल्या स्त्रिया / मुली जन्माला येण्याचं प्रमाण सुमारे 5000 आहे. मात्र नेमके भारतात अशाप्रकारे जन्म होणार्या मुलींचे प्रमाण किती आहे याबाबत काही माहिती उपलब्ध नाही. फारच क्वचित अशा मुली जन्माला येतात.
2. जन्मतः गर्भाशय नसणं ही समस्या अनुवंशिक असते असादेखिल काहींचा समज आहे. पण हे प्रत्येकीसोबतच होईल असे नाही. हा दोष स्त्री गरोदर असताना गर्भाची वाढ होण्याच्या दरम्यान निर्माण होतो.
3. काही वेळेच अशाप्रकारे गर्भाची वाढ होणं धोकादायक ठरू शकते. पर्यावरणातील घातक घटक आणि अति औषधांचा परिणाम गरोदर स्त्रियांवर होऊ शकतो. काही वेळेस फर्टीलाईझेशन मध्ये दोष असल्यास हा त्रास उद्भवतो. आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?
4. ज्या मुलींमध्ये गर्भाशय जन्मतः नसते त्यांना मासिकपाळीदेखील येत नाही. मात्र अशा मुलींमध्ये पूर्णतः कार्यक्षम असलेल्या ओव्हरीज असू शकतात. ओव्हरीज म्हणजेच अंडाशय हे वेगळ्या पेशींपासून बनलेले असते. गर्भाची वाढ होत असताना योनिमार्गाचा वरचा भाग आणि गर्भाशय हा सारख्याच पेशींपासून बनलेला असतो.त्यामुळे योनिमार्गदेखील अशा स्त्रियांमध्ये नसण्याची शक्यता दाट असते. योनिमार्ग आर्टिफिशली बनवून तो स्त्री शरीरात बसवला जातो.
5. ज्या मुलींमध्ये गर्भाशय नाही पण पूर्णतः कार्यक्षम ओव्हरीज आहेत अशा स्त्रियांच्या शरीरात स्तनांची पूर्ण वाढ होणं, त्याजवळ केसांची वाढ होणं, हार्मोन्सचं नियंत्रण राहणं योग्य असतं. ओव्हरीजमध्ये oestrogen आणि progesterone या हार्मोन्सची निर्मिती होते.
6. गर्भाशय नाही म्हणजे गरोदर राहण्याची शक्यतादेखील नाही. अशा स्त्रियांना नैसर्गिकरित्या आई होण्यासाठी गर्भाशय प्रत्यारोपण हा एकच उपाय राहतो. सरोगसीच्या माध्यमातूनदेखील अशा स्त्रिया आई होऊ शकतात. फर्टिलिटी बाबतचे ’9′ समज-गैरसमज ! आजच दूर करा.
7. अंडाशय कार्यक्षम असेल तर स्त्रिया सेक्श्युअलरित्या अॅक्टिव्ह असतात. योनिमार्ग आणि कार्यक्षम अंडाशय असलेल्या स्त्रियांमध्ये सेक्श्युअली काही त्रास नसतात.
8. फेलोपिअन ट्युबमध्ये काहीवेळेस अंड फलित होऊ शकते. गर्भाशय नसल्याने अंड आणि शुक्राणुंचे मिलन फेलोपिअन ट्युबमध्ये होऊ शकते.
9. ज्या स्त्रियांच्या शरीरामध्ये ओव्हरीज, योनिमार्ग किंवा गर्भाशय नसते त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल आढळून येऊ शकतात. अंडाशयाच्या अपुर्या कार्यक्षमतेमुळे हार्मोन्सच्या कार्यातही अडथळा येतो. परिणामी स्त्रिया लवकर वृद्धत्त्वाकडे वळतात. हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हाडं ठिसुळ होतात, हृद्यविकारांचा धोका वाढतो. अशावेळेस हार्मोन थेरपीद्वारा स्त्रियांवर वयाच्या 50-52 पर्यंत उपचार केले जातात.
ज्या स्त्रियांमध्ये ओव्हरीज नाही मात्र कार्यक्षम गर्भाशय आणि योनिमार्ग असेल तर एखाद्या दात्याकडून अंड्याची मदत घेऊन फर्टीलाईज करून ते गर्भाशयात वाढवले जाऊ शकते. मात्र यामध्ये आईचे आनि बाळाचे जिन्स सारखे नसतात. ती केवळ बायोलॉजिकल मदर होते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock