Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

औषधं घेताना नेमके किती पाणी प्यावे ?

$
0
0

मुळातच औषधे घेणे हे अतिशय कंटाळवाणे काम आहे. कशीबशी ती पोटात उतरवली जातात. परंतु, औषधे घेताना महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. औषधे घेताना तुम्ही पुरेसं पाणी पिता की नाही, याबद्दल तुम्हाला काही माहित आहे? गोळ्या, कॅप्सूल्स घेताना ग्लासभर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण आपल्यापैकी कितीजण हा सल्ला पाळतात? मुंबईच्या फोर्टीज हॉस्पिटलचे एचओडी डॉ. प्रदीप शहा यांनी यासंदर्भात काही टीप्स दिल्या.

  • औषधं घेताना पाणी का प्यावे?

गोळ्या पाण्यासोबत पोटात जातात. पाण्यामुळे त्यांचा मार्ग सोपा होतो. तसंच अनेक गोळ्या पाण्यात विरघळणाऱ्या असतात, असे डॉ. शहा म्हणाले. पाण्यामुळे गोळ्यांचा तोंड ते पोट हा मार्ग सोपा होतो. त्या मधेच अडकून रहात नाहीत. औषधंं सुरक्षितपणे साठवण्याच्या खास टीप्स

  • औषधे घेताना पुरेसे पाणी न प्यायल्यास काय होईल?
  1. काही लोकांना पाणी न पिता नुसत्या गोळ्या घेण्याची सवय असते. ही सवय तीन गोष्टींसाठी चुकीची आहे. अंकोटेड टॅब्लेट्स या chalky texture च्या असून जीभ किंवा घशाला चिकटतात. अशा गोळ्या जिभेवर घासल्या गेल्यास त्याची उग्र चव तोंडभर पसरते. अशा प्रकारच्या गोळ्या घशात अडकण्याची शक्यता असते. ताप गेल्यानंतर औषधे घेणे बंद करावे का ?
  2. जर तुम्ही पाण्याशिवाय गोळी घेतलीत तर ती नीट विरघळणारं नाही. गोळी न विरघळता पचनसंस्थेतून पुढे जाईल. पण ती विरघळणार नाही. काही वेळेस (दुर्मिळ वेळा) पूर्ण गोळी निरूपयोगी पदार्थांमधून बाहेर टाकली जाते, असे डॉ. प्रदीप म्हणाले. गोळी शरीरात गेल्यावर न विरघळल्यास त्याचे फायदे शरीराला मिळत नाहीत. जरूर वाचा: प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?
  3. ibuprofen यांसारख्या काही non-steroidal anti-inflammatory औषधांसोबत पुरेसे पाणी न प्यायल्यास त्या औषधांचा संबंध पाचक रसातील (digestive juices) मधील हायड्रोक्लोरिक अॅसिडशी येतो आणि पोटाला त्रास होतो. Expiry Date उलटून गेल्यानंतर गोळ्या घेतल्यास काय होईल ?

खरंतर तुम्ही औषधांसोबत ग्लासभर पाणी प्यायला हवे. अति थंड किंवा अति गरम पाणी पिणे टाळा. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर औषध घेताना किती पाणी प्यायला हवे याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. नक्की वाचा: परदेशी फिरायला जाताना ही औषधे नक्की सोबत ठेवा!

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>