भारतामध्ये योगा शास्त्राचे मूळ आहे. हळूहळू त्याचं महत्त्व आज जगभर पसरलं आहे. पाश्चात्य देशांमध्येही योगा एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून पाहिली जाते. नियमित योगाअभ्यासाने केवळ आजारावर मात करणं शक्य नाही तर सोबतच प्रजननक्षमता सुधारण्यासाठीदेखील त्याची मदत होते.
रिप्रोडक्टीव्ह सिस्टम म्हणजेच प्रजनन संस्थेमध्ये काही बिघाड, दोष असल्यास गर्भधारणा यशस्वीरित्या होत नाही. म्हणूनच औषधोपचारांसोबत तुम्हांला काही योगाभ्यास, मुद्रा केल्याने हे दोष कमी करण्यास मदत होते. मुद्रा अभ्यास केल्याने शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ करण्यास मदत होते. गर्भधारणेमधील दोष कमी करण्यास उपयुक्त ठरणारी एक मुद्रा म्हणजे योनी मुद्रा. यशस्वी गर्भधारणेसाठी आहारात हे बदल कराच
मुद्रा अभ्यास करणं अगदी सोप्प आहे. मुद्रा कोणीही, कुठेही आणि केव्हाही करू शकतो. त्यासाठी विशिष्ट वेळ किंवा मांडी घालून बसण्याची गरज नसते. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा आणि तुम्ही आरामदायी स्थितीत असाल तेव्हा योनि मुद्रा तुम्ही करू शकता असा सल्ला योगा एक्सपर्ट रमण मिश्रा यांनी दिला आहे. या आयुर्वेदीक उपायांनी गर्भधारणेतील अडथळे होतील दूर
पहा कशी कराल ही योनि मुद्रा -
- सैलसर कपडे घालून एखाद्या शांत ठिकाणी आरामदायी स्थितीमध्ये बसा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यावेळी तुमचे लक्ष श्वासावर ठेवा.
- दोन्ही हाताचे तळवे एकमेकांसमोर ठेवा.
- दोन्ही हातांची तर्जनी आणि अंगठा एकमेकांना चिकटून ठेवा.
- उरलेली तिन्ही बोटं एकमेकांमेकांमध्ये इंटरलॉक करा.
- या मुद्रेमधील हात पोटाजवळ सरळरेषेत ठेवा.
- त्यानंतर अंगठा आकाशाच्या दिशेला आणि तर्जनी जमिनीकडे म्हणजे खालच्या दिशेला राहील अशा स्थितीत ठेवा.
- नियमित ही मुद्रा 3-6 मिनिटं करणं आरोग्यदायी ठरते.
योनि मुद्रेमुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास कशी मदत होते ?
योनि मुद्रेमुळे ब्लॉक्ड एनर्जी चक्र खुली होण्यास मदत होते. तसेच जननेद्रियांचे कार्य सुधारण्यास मदत होते. योनि मुद्रेमुळे पेल्व्हिक भागाजवळ अधिक उर्जा मिळण्यास मदत होते. आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?
योनि मुद्रेचे इतर फायदे कोणते ?
- ताणताणावामुळे मनात नकारात्मक विचार, मानसिक अस्वस्थता वाढते तेव्हा बाहेरच्या जगापासून थोडे दूर रहा आणि मनात सकारात्मक भावना वाढविण्यासाठी योनि मुद्रा फायदेशीर ठरते.
- योनि मुद्रेचा नियमित सराव केल्याने नर्व्हस सिस्टीम शांत राहण्यास मदत होते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock