Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शिश्नाची लांबी अधिकअसणार्‍या पुरूषांनी अंडरवेअरची निवड कशी करावी ?

$
0
0

शिश्नाचा आकार, लांबी याबाबत पुरूषांच्या मनात अनेक शंका असतात. लहान शिश्न असल्यास स्त्रियांना पुरेसे लैंगिक सुख देत नाही अशी भीती काही पुरूषांच्या मनात असते. शिश्न (पेनिज) ची लांबी वाढवता येते का ? असा प्रश्नही तुमच्या मनात येऊन गेला असेल पण ज्यांच्या शिश्नाची लांबी नैसर्गिकरित्या अधिक असते त्यांनादेखील काही गोष्टींबाबत शंका आणि त्रासदेखिल असतातच.. त्यापैकी एक म्हणजे मोठ्या लांबीचे शिश्न असणार्‍यांनी अंडरवेअर कशी निवडावी ? तुमच्या मनातील याच खास प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मेन्स वेअर डिझायनर आणि स्टाईलिस्ट Abishek Jalewa यांनी दिलेल्या या खास गोष्टी लक्षात ठेवा.

  • पाऊच पाहूनच निवड करा –

मोठ्या लांबीच्या शिश्नाला पुरेशी जागा मिळेल अशी अंडरवेअर निवडा.सार्‍याच ब्रॅन्डच्या अंडरवेअरमध्ये ती खुली जागा असेलच असे नाही. त्यामुळे पाऊच असणारी आणि तुमच्या आकारानुसार योग्य अंडरवेअर निवडा. शिश्नाबाबतच्या या ’4′ गोष्टी तुम्हांलाही चकीत करतील !

 

  • Briefs  पॅटर्नच्या अंडरवेअरची निवड करा –

काहीवेळेस पाऊच डिझाईन्सदेखील मोठ्या शिश्नाला आरामदायी किंवा पुरेशी जागा देऊ शकत नाही. Briefs  पॅटर्नची अंडरवेअर नेहमीच्या वापरासाठी तसेच खेळाडूंसाठीही फायदेशीर आहे.  low rise briefs वापरल्याने ती लो वेस्ट आणि तुमच्या संपूर्ण हिप्सला कव्हर करणारी असेल. अशा  briefs अंडरपॅन्ट्ससाठी Jockey सारखे ब्रॅन्ड उत्तम आहेत.

  • बॉक्सरचा वापर करा –

शिश्नाच्या लांबीप्रमाणेच मांड्याच्या भागालाही पुरेशी जागा देण्यासाठी बॉक्सरचा वापर करू शकता. बॉक्सर इतर अंडरपॅन्टप्रमाणे जननेंद्रियांना आधार देऊ शकत शकत नसली तरीही खूप मोकळी जागा देऊ शकते. यामुळे शिश्नाला पुरेसा खुलेपणा मिळतो. त्याचा वापर शॉर्ट्स किंवा पायजमा मध्ये करणे फायदेशीर आहे.

  • स्ट्रेचेबल फॅब्रिक्सचा वापर करा –

स्ट्रेचेबल तरीही आरामदायी अंडरवेअरचा वापर करा. याकरिता Calvin Klein च्या अंडरवेअर उपयुक्त आहे. हा केवळ ब्रॅन्ड म्हणून नाही तर त्याचे उत्तम मटेरियलही फायदेशीर आहे. त्यामुळे मोठया आकाराचे शिश्नदेखील कॅन्फ़रटेबल राहण्यासाठी मदत होते. स्वस्तातील अंडरवेअरची निवड करून इतर गोष्टींमध्ये तडजोड करू नका.ते अधिक त्रासदायक ठरू शकते. पुरूषांच्या शिश्नाबाबत तुम्हांला या आश्चर्यकारक गोष्टी ठाऊक आहेत का ?


Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>