मी सॉफ्टवेयर इंजिनियर असून माझे वय ४० वर्षे आहे. मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि मी त्यासाठी औषधे घेतो. म्हणून माझे ब्लड प्रेशर नियंत्रित आहे. परंतु, माझ्या वाचनात असे आले आहे की, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. तसंच, त्यामुळे छातीत देखील दुखते. हे खरे आहे का? मला खूप काळजी वाटते. कृपया याबद्दल माहिती द्या.
या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या अशियन हार्ट इन्स्टिटयूटच्या Cardiac Electro Physiologist Dr. Santosh Kumar Dora, यांनी दिले.
कोरोनरी आर्टरी मध्ये फॅट जमा झाल्याने कोरोनरी आर्टरीचे आजार होतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. परिणामी हृदयावर ताण येतो आणि छातीत दुखू लागते. कालांतराने आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस होतात. परिणामी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. परंतु, बऱ्याच लोकांना असे वाटते की उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखत नाही किंवा हार्ट अटॅकचा धोका निर्माण होत नाही. हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात
पण हे खरे नाही. कारण मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे कोरोनरी हार्ट आजारांचा धोका वाढतो. कोरोनरी आर्टरी मध्ये फॅट जमा होण्याचं हे एक कारण आहे व कालांतराने हार्ट अटॅकचा धोका असतो. लिंबू – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा उत्तम घरगुती उपाय !
उच्च रक्तदाबाबरोबर कोलेस्ट्रॉलचे किंवा ग्लुकोजचे अति प्रमाण यामुळे धोक्याचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला खूप काळापासून उच्च रक्तदाब असेल तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जर रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असेल तर कोरोनरी आर्टरीला होणारा रक्ताचा पुरवठा स्थगित होतो व त्यामुळे आर्टरी आकुंचित होते.
उच्च रक्तदाब असल्याने परिस्थिती अधिक बिकट होते. जर ब्लॉकेजेस ७०% पेक्षा अधिक असतील तर हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. अशा वेळी डॉक्टर तुम्हाला ब्लॉकेजेस तपासण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. म्हणजे त्यानुसार ट्रीटमेंट करता येते. अतिरिक्त फॅट जमा झाल्यामुळे किंवा ब्लड क्लॉट झाल्यामुळे आर्टरी आकुंचित होते व त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येऊन छातीत दुखू लागते. आवळ्याचा रस – रक्तदाब आटोक्यात ठेवणारा नैसर्गिक उपाय
म्हणजेच उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखते व हार्ट अटॅकचा धोका वाढतो. परंतु, जर तुम्ही तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवले, औषधे वेळेवर घेतली, नियमित व्यायाम केला आणि संतुलित आहार घेतल्यास हार्ट अटॅक आणि इतर हृद्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबासंबंधीचे हे ’10′ गैरसमज आजच दूर करा
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock