Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Gastroenteritis किंवा स्टमक फ्लूची 6 लक्षणं !

$
0
0

उन्हाची काहिली कमी करण्यासाठी अनेकांना बर्फाचा गोळा खाणे फार आवडते.पण सध्या मुंबईत बर्फाचा गोळा खाल्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोचा त्रास झाल्याचे आढळून आले आहे.बर्फाच्या गोळ्यातील दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.यासाठी उन्हाळ्यातही आरोग्य जपण्यासाठी आहारात हे काही बदल जरुर करा.

गॅस्ट्रो हा एक संसर्गजन्य विकार आहे.या विकारातील काही बॅक्टेरिया,व्हायरस व प्रोटोझोअा यामुळे पोटाच्या अातील अस्तर व आतड्यामध्ये दाह होतो.हे जिवाणू सामान्यत: दूषित अन्न व पाणी किंवा गॅस्ट्रोचे इनफेक्शन झालेल्या संक्रमित रुग्णाच्या संपर्कातून पसरतात.काही केमिकल्स व औषधे यामुळे देखील हा दाह होऊ शकतो.Gastroenteritis ची लक्षणे इतर गॅस्ट्रोइनटेस्टीनल समस्येप्रमाणेच असल्यामुळे गोंधळ होऊन गॅस्ट्रोचे अचूक निदान करणे कठीण जाते.तसेच या समस्येसाठी नेमके कोणते बॅक्टेरिया,व्हायरस अथवा इतर जिवाणू कारणीभूत आहेत यावर देखील काही लक्षणे अवलंबून असू शकतात.तसेच जाणून घ्या स्वयंपाकघरातील या ’6′ गोष्टींमुळे बिघडू शकते तुमचं आरोग्य !

यासाठीच सर्वप्रकारच्या Gastroenteritis समस्येवरील ही काही सामान्य लक्षणे जरुर जाणून घ्या-

१.डायरिया-Gastroenteritis या समस्येचे डायरिया हे एक प्रमुख लक्षण असते.जेव्हा बॅक्टेरिया अथवा व्हायरस आतड्यांच्या अस्तरावर आक्रमण करतात तेव्हा आतड्याच्या द्रवपदार्थ साठवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो.ज्यामुळे विष्टेच्या माध्यमातून आतड्यामधील सर्व द्रवपदार्थ बाहेर टाकले जातात व शौचाला पातळ किंवा पाण्यासारखे होते.तीव्र गॅस्ट्रोचा त्रास होणा-या रुग्णाला दिवसभरात २ ते ३ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शौचाला होते.तीव्र गॅस्ट्रोत सतत होणा-या अतिसारामुळे रुग्ण सहज डिहायड्रेट होऊ शकतो.बॅक्टेरियल Gastroenteritis मुळे शौचातून रक्त देखील पडू शकते.

२.उलटी होणे-जर डायरियासह उलटी देखील होत असेल तर रुग्णाला गंभीर डिहायड्रेशचा त्रास होऊ शकतो.अशा परिस्थितीत रुग्णाला सुरुवातील २ ते ३ वेळा उलटी होते.मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात उलट्या होत असतील रुग्णाला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते.

३.कारण नसताना वजन कमी होणे-गॅस्ट्रोच्या समस्येमुळे डिहायड्रेशन झालेल्या रुग्णांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.पोटातील पाणी कमी झाल्यामुळे व भूक मंदावल्यामुळे रुग्णाचे अचानक वजन कमी होते.योग्य वेळी या समस्येचे अचुक निदान होऊन त्यावर त्वरीत उपचार झाल्यास या समस्येपासून रुग्णाला नक्कीच संरक्षण मिळू शकते.यासाठी कसा असावा उन्हाळ्यातील आहार जरुर जाणून घ्या.

४.पोटात क्रॅम्प येणे-गॅस्ट्रोच्या समस्येमध्ये येणारे स्टमक क्रॅम्प फारच वेदनादायक असतात.या स्थितीत रुग्णाच्या पोटात टोचल्यासारख्या वेदना होतात ज्या पोटाच्या नेमक्या कोणत्या भागातून येत आहेत हे समजत नाही कारण त्या पोटाच्या सर्वच भागातून जाणवत असतात.कधीकधी या वेदना पोटाच्या एकाच भागात होतात व हळूहळू सगळीकडे पसरत जातात.Bloating आणि पोटात गॅस वाढण्याच्या समस्येमागील ’10′ कारणं अवश्य वाचा.

५.ताप-गॅस्ट्रो समस्येतील व्हायरस अथवा बॅक्टेरियाच्या विरोधात शरीरातील रोग प्रतिकार शक्तीला करावा लागणा-या संघर्षामुळे शरीराचे तापमान वाढू लागते.या समस्येमुळे शरीराचे तापमान १०० ते १०२ डिग्री एफ.पर्यंत वाढू शकते.(३८ ते ३९ डिग्री से.)तसेच ताप वाढण्यामागील ही ’10′ कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?

६.मळमळ व डोकेदुखी-तीव्र ताप व डायरियासह रुग्णाला मळमळ व डोकेदुखी देखील जाणवते.ब-याचदा विशेषत: व्हायरल गॅस्ट्रोइन्टेरायसीस च्या केसेस मध्ये जाणवणारी लक्षणे आपोआप बरी होतात.पण काही गंभीर स्थितीमध्ये मात्र या लक्षणांवर त्वरीत डॉक्टरांकडून उपचार करणे गरजेचे असते.उलटी व मळमळच्या त्रास वाढण्यामागील ही १२ कारणंं जरुर वाचा.

संदर्भ-

Diseases and Disorders, Volume 2 by Marshall Cavendish Corporation

Bacterial gastroenteritis (http://www.ncbi.nlm.nih.gov/)

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>