WHO या जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार, सुमारे 5 करोड लोकं नैराश्याच्या गर्तेमध्ये आहेत. त्यामुळे भारतात आत्महत्या होण्याचं प्रमाण अ धिक आहे. ‘Depression and Other Common Mental Disorders-Global Health Estimates’ या अहवालानुसार,जगभरात होणार्या आत्महत्यांपैकी ⅔ आत्महत्या या आर्थिकदृष्ट्या दुबळ्या देशात होतात. पण म्हणून आत्महत्या हा विषय केवळ प्रौढ लोकांमध्ये नाही तर तरूण आणि लहानग्यांमध्येही हा त्रास वाढत आहे.कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?
आजकाल तरूणांमध्येही नैराश्य वाढते आहे. भारतात त्याचे वाढणारे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. असे Health and Wellness च्या डॉ. भावी मोदी सांगतात. ऐन विशीतली मुलंदेखील आजकाल आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अनेकदा त्यामागे नैराश्य हेच कारण असते. त्यामुळे पालकांनी त्याच्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. मुलांच्या वागण्या बोलण्यात झालेल्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. असा सल्ला डॉ. मोदी देतात. डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !
1. आवडीच्या कामातही लक्ष न लागणं
टीनएज मुलांमध्ये हे लक्षण प्रकर्षाने आढळते. आवडीच्या कामामध्येही लक्ष न लागणं किंवा ते करण्याची इच्छा सतत्याने कमी होणं याकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी
2. झोपेचं चक्र बिघडणं
अति झोप किंवा कमी झोप ही दोन्ही लक्षणं धोकादायक आहेत. नेहमीच्या सवयीमध्ये बदल करून जर तुमचा मुलगा किंवा मुलगी अति झोपत असेल किंवा कमी झोपत असेल तर हे नैराश्याचं लक्षण आहे.जाणून घ्या झोप कमी येण्याची ही काही कारणे
3. सोशल इंटरॅक्शन कमी होणं
तुमचं मुलं इन्ट्रोवर्ट म्हणजेच फारसं लोकांमध्ये रमणारं नसेल तरीही ते इतरांसोबत हसून खेळून असते. पण एरवी लोकांशी बोलणारी, मज्जामस्ती करणारी मुलंदेखील शांत आणि लोकांपासून दूर राहत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढत असते.
4. बोलण्यात अनेकदा आत्महत्येशी निगडीत विषय येणं
मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या सबळ असणारी मुलं आत्महत्येबाबत फारसं काही बोलत नाही. मात्र बोलण्यात, वाचण्यात सतत आत्महत्येशी निगडीत काही विषय येत असेल तर त्याकडे पालकांनी मूळीच दुर्लक्ष करू नये. त्यांच्याशी बोलून या विषयापासून त्यांना दूर करण्यासाठी वेळीच प्रयत्न करणं गरजेचे आहे. या ’10′ कारणांमुळे मनात येतात आत्महत्येचे विचार !
5. खाण्याच्या सवयीत बदल होणं
माणसाच्या खाण्याच्या सवयींमधून त्यांच्या मानसिक स्वास्थ्य बाबत अनेक संकेत मिळतात. मुलंदेखील अचानक खूप खात असतील किंवा कमी खात असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. भूकेमध्ये होणारे बदल नक्कीच त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यामध्ये समन्वय नसल्याचे संकेत देतात.
6. अभ्यासात अधोगती
अभ्यासात गती कमी जास्त असणं हा एक वेगळा भाग आहे. मात्र परिक्षेत नापास होणं, सोबत खाण्याच्या सवयी, झोपेचं चक्र बिघडणं हे त्यांची मानसिकता स्थिर नसल्याचे संकेत देतात. यामध्ये अनेकदा त्यांच्यात नैराश्य वाढत असल्याचे संकेत देतात. ( नक्की वाचा - ‘आत्महत्या’ करण्याचा विचार करण्यापूर्वी एकदा हा फोन नंबर फिरवा )
7. अधिक संवेदनशील होणं
नैराश्याची भावना वाढत असलेल्या मुलांमध्ये अनेकदा संवेदनशीलतादेखील वाढते. लहान सहान गोष्टींवरूनदेखील मुलांना चटकन रडू येते. भावना दुखावल्या जातात किंवा राग येतो. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
8. मूड स्विंग
अचानक खूप वाईट वाटणं, अचानक हायपर अॅक्टिव्ह होणं, एकटं वाटणं किंवा कोणीच जवळ नकोसं वाटाणं असे मूड्समध्ये होणारे बदल दुर्लक्षित करू नका. अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock