जेवण कमी पडू नये किंवा अनाहूत आलेला पाहुणादेखील उपाशी पोटी जाऊ नये म्हणून आपल्याकडे थोडे जास्त जेवण बनवण्याची पद्धत आहे. पण प्रत्येक आईला असणारी ही सवय कालांतराने त्रासदायक ठरू शकते. कारण अनेक स्त्रिया / आई यांना उरलेले अन्न फेकून देण्यापेक्षा ते खाण्याची सवय असते. पण रोजच उरलेलं अन्न खाण्याची सवय वाढत्या वयानुसार अनेक आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण देते. म्हणूनच शिळे अन्न खाण्याची सवय प्रत्येक स्त्रिने का सोडली पाहिजे याकरिता BLK Super Speciality Hospital च्या चिफ डाएटिशन सुनिता रॉय चौधरी यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या. शिळं अन्न खाणं का टाळावं ?
- बॅक्टेरियांची वाढ होते - शिजवलेलं अन्न आपण थेट फ्रीज मध्ये ठेवत नाही. ते थोडं थंड करूनच फ्रीजमध्ये ठेवले जाते. पण यादरम्यान अन्नामध्ये अनेक मायक्रोऑर्गॅनिझम्सची वाढ होते. यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता दाट असते.
- अन्नविषबाधेची शक्यता - अन्नात अतिप्रमाणात बॅक्टेरियांची वाढ झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवल्यास ते आतमधील इतर पदार्थांनादेखील खराब करू शकते. त्यामुळे दुषित अन्न खाण्याची शक्यता वाढते. परिणामी नकळत तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आरोग्यदेखील धोक्यात येते.या ६ गोष्टी देतात अन्न खराब झाल्याचे संकेत!
- पोषणद्रव्यांची कमतरता - अनेक पदार्थ गॅसच्या मोठ्या आचेवर शिजवले जातात. त्यामुळे पदार्थामधील अनेक पोषकघटक नष्ट होतात. त्यातही ते फ्रीजमध्ये साठवल्यास उरलेले पोषक घटकही कमी होतात. असे शिळे अन्न खाणे शरीराला कोणतीच आरोग्यदायी मदत करत नाही. त्यामुळे ताजे अन्न बनवून नियमित खाण्याची सवय ठेवा. अन्न दुषित होण्याची ही ’5′ कारणं तुम्हाला ठाऊक आहेत का ?
शिळं अन्न खाल्ल्याने स्त्रीच्या शरीरावर होणारे परिणाम
वाढत्या वयानुसार स्त्रियांची हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे स्त्रियांचा आहार चौकस असणं गरजेचे आहे. त्यांच्या आहारात आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक असणं गरजेचे आहे.अन्न जसे शिळे होते तसे त्यामधील हे आवश्यक घटक कमी होत जातात. त्यामुळे अनेक स्त्रियांच्या शरीरात कॅल्शियमची,आयर्नची कमतरता निर्माण होते. परिणामी हिमोग्लोबिनची पातळीदेखील खालावते. तिशी पार केलेल्या अनेक स्त्रियांची हाडं ठिसूळ होतात त्यामुळे ऑस्टोपोरायसिस, आर्थ्राईटिसचा धोका बळावतो. उरलेलं अन्न खाण्याच्या सवयीमुळे पोटं भरत असले तरीही शरीराची झीज भरून काढण्यास, आवश्यक पोषकघटकांची कमतरता वाढत जाते. यामुळे कमजोरी, मसल्स पूल अप्स, चिडचिडणेपणा वाढणं, मासिकपाळीचे त्रास तसेच मोनोपॉजच्या टप्प्यावरही अनेक समस्या वाढतात. या टप्प्यावर स्त्रियांमध्ये हृद्यविकार वाढण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच अॅन्टिऑक्सिडंट युक्त पदार्थ, आरोग्यदायी फॅट्स आणि पोषकद्रव्य मिळतील असा चौकस आहार असावा. मेनोपॉजच्या टप्प्यावर स्त्रियांमध्ये वाढतो या 5 गोष्टींमुळे ह्रदयविकाराचा धोका
नेमका आहार कसा असावा ?
जेवण केवळ पोटभरीसाठी नसावे तर त्यामधून शरीराला पुरेशी पोषकतादेखील मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे केवळ अन्नघटकांचा आहारात समावेश करू नका तर सोबत त्याचे अॅब्झोप्शनदेखील होणं गरजेचे आहे.
- शाकाहारींच्या आहारात काय असावे ?
चणे, मोड आलेली कडधान्य, दूध, ऋतूमानानुसार ताजी फळं, भाज्या, नट्स, दही यांचा हमखास आहारात समावेश करा. वाढत्या वयानुसार अधिक फीट राहण्यासाठी स्त्रियांनी नियमित सुमारे ७१५ ते ८०० ग्रॅम ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करणं गरजेचे आहे. महिलांच्या शारिरीक व्याधी दूर करतील या ’5′ पालेभाज्या !
- मांसाहारींच्या आहारात काय असावे ?
शाकाहार्यांप्रमाणे मांसाहारीदेखील व्होल ग्रेन, नट्स, दूध- दूग्धजन्य पदार्थ यासोबत अंड आणि मासे यांचा आहारात समावेश करू शकतात. शक्य असल्यास आठवड्यातून चार वेळेस अंड्यांचा आहारात समावेश करा. दर आठवड्याला 8 अंडी तर 200-250 ग्रॅम्स व्हाईट मीट ( विविध मासे) यांचा आहारात समावेश करा. छायाचित्र सौजन्य – Shutterstock