तुम्हाला भात खूप आवडतो का ? मग तर तुम्ही पुलाव, बिर्याणीवर ताव मारत असाल. पण रोज ते खाणे शक्य नाही आणि आरोग्यदायी देखील नाही. मग यासाठी एक वेगळा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. तो म्हणजे पुदिना भात. बनवायला सोपा आणि खायला मस्त असा हा भात नक्की करून बघा. मग जाणून घेऊया हा भात कसा करायचा ते. नक्की वाचा : भातातून केवळ कॅलरीज नाही, तर हे आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात !
साहित्य:
- १ कप पुदिना
- १ १/२ कप शिजवलेला भात
- १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- २-३ बारीक चिरलेल्या मिरच्या
- मूठभर काजू
- आलं
- लसूण
- १ बारीक चिरलेला कांदा
- २-३ चमचे तेल/तूप
- मीठ (चवीनुसार)
- १ तमालपत्र
- १/२ चमचा जिरं
- ४ लवंग
- १ दालचिनीची काडी
- २ वेलची
कृती :
१. ग्राइंडरमध्ये पुदिन्याची पाने, कोथिंबीर. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मीठ घाला. त्यात थोडं पाणी घालून त्याची मऊ पेस्ट बनवा.
२. पॅनमध्ये २-३ चमचे तेल किंवा तूप घेऊन त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, वेलची घाला. नंतर जिरं घाला. हे सगळं तडतडल्यानंतर त्यात काजू घाला. मग कांदा घालून नीट मिक्स करा. गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित शिजवा. जाणून घ्या: भाताची पेज रोज पिण्याची ’5′ हेल्दी कारणं
३. मग पुदिन्याची पेस्ट घालून मंद आचेवर शिजवा. २-३ मिनिटं सतत हलवत रहा. त्यात थोडं मीठ घाला आणि नीट मिक्स करा. लाल तांदूळ की ब्राउन राईस कोणता अधिक पौष्टिक आहे?
४. शिजवलेला भात घालून सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. २-३ मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करा. सजवण्यासाठी वरून कोथिंबीर घाला आणि रायता, कोशिंबीर सोबत गरमागरम खा. हेल्दी आणि टेस्टी नारळी भात !
भात आवडतो म्हणून तुम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घ्याल. पण मधुमेहींचे काय? यासाठी जाणून घ्या: मधूमेहींनी पांंढर्याऐवजी लाल तांदूळ का खावा ?
यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर, मटार घालू शकता. तसंच हा पुदिना भात तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता. हा भात बिर्याणी सारखा जड नसून हलका असतो आणि त्यामुळे पोट भरलेलं राहतं. भात खाण्याबद्दल अनेक गैरसमज जनमानसात प्रचलित आहेत. म्हणून जरूर वाचा: या आरोग्यदायी कारणांसाठी जरूर कराच आहारात भाताचा समावेश !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock