आंबा हा फळांचा राजा आहे. आणि केवळ उन्हाळयातच आंबा उपलब्ध असल्याने कितीही कडाक्याचे ऊन असले तरीही सारेच या ऋतूची वाट बघत असतात. त्यामुळे आंब्यावर ताव मारण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. आमरस,आंबा पोळी, बर्फी किंवा जेवणासोबत आंबा हे पदार्थ अनेकांच्या आहारात हमखास असतात. पण मधूमेहींच्या आहारात अनेक पथ्यपाणी असल्याने त्यांनी तो खावा की नाही ? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
आंब्याबाबत अशा अनेक समज गैरसमजांना दूर सारण्यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर हिने नुकताच एक फेसबुक लाईव्ह करून त्याबाबत माहिती दिली आहे.
ऋजुताच्या मते, मधूमेहींनी आंबा खाण्यास काहीच हरकत नाही. केवळ उन्हाळ्यात उपलब्ध असणारे आंबा हे फळं जितकं स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यदायी देखील आहे. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म दडले आहे. आंब्याचे ’7′ आरोग्यदायी फायदे !
मधूमेहींनी आंबा खाणं कसे फायादेशीर आहे ?
ऋजुता दिवेकरच्या मते, मधूमेहाचा आणि आंब्याच्या सेवनाचा एकमेकांशी कोणताचा थेट संबंध नाही. मेयो क्लिनिक आणि अमेरिकन डाएबिटीक असोसिएशनही मधूमेहींच्या आहारात आंबा असावा असा सल्ला देते.
- आंब्यामध्ये फायबर घटक,अॅन्टीऑक्सिडंट तसेच पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच आंब्याचा ग्ल्यायस्मिक इंडेक्स कमी असतो.
- आंब्याच्या सेवनामुळे इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारण्यास मदत होते.
- रक्तातील साखरेचे प्रमाण सुरळीत ठेवण्यास आंबा फायदेशीर ठरतो.
- आंब्यातून मिळणार्या कॅलरीज या शरीराला आवश्यक असणार्या पोषकघटकांसोबत येतात त्यामुळे आहारात त्याचा नक्कीच समावेश करा. आंब्याप्रमाणेच मधूमेहींच्या आहारात ही ’7′ फळं ठरतात फायदेशीर !
मधूमेहींनी आंबा खावा की खाऊ नये याप्रमाणेच हे काही समज गैरसमजही आजच दूर करा
- वजन वाढते – आंब्यामुळे वजन वाढत नाही. वजन वाढण्यामागे तुम्ही व्यायाम न करणं हे एक कारण आहे.याउलट आंब्यामध्ये अनेक फॅट बर्निग घटक असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती अधिक सुरळीत करायला मदत होते. वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !
- आंब्यामुळे उष्णता वाढते – आंब्यातील उष्णतेचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये असे तुम्हांला वाटत असेल तर खाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी आंबा पाण्यात बुडवून ठेवा.यामुळे त्यामधील फायाटिक अॅसिड निघुन जाते. परिणामी आंबा त्रासदायक ठरत नाही.
किती आंबा खाणं सुरक्षित आहे ?
आंबा किती खावा हे तुमचं पोटचं तुम्हांला सांगेल. आंब्यामुळे लेप्टन सेन्सिटीव्हिटी सुधारते. लेप्टन या हार्मोन्समुळे तुम्ही किती खावं, पोटं भरले आहे का ? याचे संकेत मेंदूला दिले जातात. त्यामुळे एकूण तुमच्या शरीराला आवश्यक असेल तितकेच खाण्याची सवय आंब्यामुळे सुधारते. केवळ आंबाच नाही तर सारे जेवण तुम्ही प्रमाणात खाता. आंब्यासोबतच ‘कोय’ही टेस्टी अन हेल्दी !
मग आंब्याबाबतचे तुमचे मनातील सारेच गैरसमज आता दूर झाले असतील .. मग वाट कसली बघताय ? यंदा बिनधास्त आंब्यावर ताव मारा पण कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखण्याच्या स्मार्ट क्लुप्त्या