Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कोलेस्ट्रॉलची औषधे घेणे राहून गेल्यास काय होईल ?

रोज औषधे घेणे अगदी कंटाळवाणे काम आहे. काहींना आपल्या व्यस्त कामाच्या स्वरूपामुळे वेळ मिळत नाही तर काहीजण औषधे घेण्याचा आळस करतात. खरंतर उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना डॉक्टर वेळेवर औषधे घेण्याचा, ती मध्येच बंद न करण्याचा सल्ला देतात. आजारावर उपचार करण्यासाठी औषधांत सातत्य आणि नियमितता असणे गरजेचे आहे. परंतु, काही वेळा गोळ्या घेणे राहून जाते. तुळस – मधूमेह आणि कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण मिळवण्याचा घरगुती उपाय

हाय ब्लड कोलेस्ट्रॉल ही अशी समसया आहे की त्यासाठी न चुकता रोज औषधे घेणे गरजेचे आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात. यामुळे हायपरटेन्शन, स्ट्रोक्स, हार्ट अटॅक आणि angina यांसारखे आजार होतात. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात नसल्यास या ’5′ समस्यांंचा धोका वाढतो‍ !

  • कोलेस्ट्रॉलची औषधे कशाप्रकारे काम करतात?

मुंबईच्या फोर्टीज हॉस्पिटलचे  HOD आणि General Medicine Specialist डॉ. प्रदीप शहा यांनी याबद्दल मार्गदर्शन केले.

लिव्हर मध्ये कोलेस्ट्रॉलची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरणारे एन्झाईम HMG-CoA reductase याची निर्मिती औषधांमुळे थांबते, असे डॉ. म्हणाले. त्या औषधांमुळे एन्झाईम तयार होणारा लिव्हरमधील भाग ब्लॉक होतो. तसेच त्याला उत्तेजीत करणाऱ्या मॉलिक्युल्सला आळा बसतो. औषधांमुळे शरीरातील लिपिडची पातळी कमी होऊन शरीरात कोलेस्ट्रॉल परत शोषलं जातं. औषधांच्या या परिणामांमुळे स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि anginas चा धोका कमी होतो. फक्त आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते का ?

  • कोलेस्ट्रॉलच्या औषधांचा डोस घेणे राहून गेल्यास त्याचा काय परिणाम होईल?

डॉ. शहा यांच्या सल्ल्यानुसार औषधं टाळणे किंवा चुकून घेणे राहून जाणे, हे आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही. एखादं दुसरा डोस चुकणे यात काही गंभीर समस्या नाही. परंतु, त्यापेक्षा अधिक डोस राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. कारण त्यामुळे रक्तातील लिपिडची पातळी नियंत्रणात राहणार नाही परिणामी रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढेल . ही समस्या  स्ट्रोक्स, हार्ट अटॅकसाठी शरीर गंभीर ठरू शकते, असे डॉ. शहा म्हणाले. औषधे घेणे राहून गेल्यास तुम्ही काय कराल? लक्षात येताच राहून गेलेला डोस लगेच घेऊन टाका. पण एक डोस राहून गेला म्हणून त्याऐवजी डबल डोस घेऊ नका.अननसाने ठेवा कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>