राणा दग्गुबती हा एक हॉट लूक हिरो आहे.बाहुबली २ चित्रपटामधून हा टॉल,डार्क अॅन्ड हॅन्डसम साऊथ इंडीयन हिरो पुन्हा आपल्या समोर येतोय.बाहुबली चित्रपटामध्ये त्याने बल्लाल देवा ही भुमिका साकारली आहे.
तुम्ही बाहुबली २ मधील बल्लाल देवा या पात्राचा नवा लूक बघीतला आहे का?
राणाने त्याचे शरीरसौष्टव प्रदर्शित करणारा त्याचा बिनशर्टाचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.या फोटोमध्ये दिसणा-या त्याच्या नव्या लूकमधून तुम्हाला नक्कीच कल्पना येईल की त्याने चित्रपटातील बल्लाल देवा हे पात्र रंगविण्यासाठी किती प्रचंड मेहनत घेतली असेल.तसेच जाणून घ्या सिक्स पॅक अॅब्स बनवायला मदत करतील या एक्सपर्ट डाएट टीप्स !
बाहूबली चित्रपटासाठी:
सुरुवातीला या भुमिकेसाठी राणा दग्गुबतीने स्वत:ला मार्शल आर्ट प्रशिक्षणाने प्रशिक्षित केले तसेच एका यौद्धाचा लूक मिळवण्यासाठी त्याने कठीण वर्कआऊट देखील केले.त्याची ही मेहनत नक्कीच वाया गेलेली नाही कारण या चित्रपटातील दृष्ट राजाच्या भुमिकेसाठी त्याची समिक्षाच केली जात आहे.बाहूबलीच्या पहिल्या भागातील खलनायकाची भुमिका त्याने कशी निभावली होती हे तुमच्या चांगलच लक्षात असेल.पण यावेळेस मात्र त्याने त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.बाहुबली २ मध्ये त्याचा लूक प्रचंड व दमदार असा असणार आहे.या लूकसाठी त्याने सतत पाच महिने मेहनत घेतली असून यासाठी तो दररोज अडीच तास ट्रेनिंग घेत असे.बाहुबली २ साठी कमावलेल्या शरीरसौष्टवाबाबत सांगताना राणाने IANS न्युज एजन्सीला दिलेल्या माहितीनूसार वयस्कर बल्लाल हा अधिक स्ट्रॉंग आहे.वयस्कर बल्लाल रंगविण्यासाठी राणाला दोन्ही चित्रपटांमधील काही भागांसाठी त्याचे वजन १०८ ते ११० किलो पर्यंत वाढवावे लागले.तसेच त्याची तरुणपणाची भुमिका देखील स्ट्रान्गच आहे पण तो त्यामध्ये वयानूसार थोडा बारीक दिसावा यासाठी त्याला त्याचे वजन काही किलोंनी कमी देखील करावे लागले.तरुण भुमिकेसाठी राणाने त्याचे वजन ९२ ते ९३ किलोपर्यंत कमी केले.यासाठी व्यायाम आणि जीम बाबत हे ’9′ समज -गैरसमज दूर कराच !
या अभिनेत्याचा पर्सनल ट्रेनर कुणाल गीर याने राणाच्या आहाराबाबत दक्षता घेतली असून या भुमिकेसाठी राणाचा आहार कार्बोहायड्रेट व प्रोटीन युक्त असेल याची विशेष काळजी घेण्यात आली.याबाबत राणा सांगतो की त्याला यासाठी कार्डिओ व वेट ट्रेनिंग देण्यात आले.या दरम्यान तो दर अडीच तासांनी न्यूट्रीशनिस्टच्या सल्लानूसार खात असे.तसेच तो योग्य ट्रॅक वर आहे हे तपासण्यासाठी नियमित चेकअप देखील करण्यात येत असे.
ही माहिती वाचल्यावर तुमची चित्रपट पाहण्याची उत्सुकता निश्चितच वाढली असेल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य: RanaDaggubati/Facebook,