Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डान्स क्लास बंद झाल्यानंतर वजन वाढतं का ?

$
0
0

अनेक मुली लहानपणापासून अभ्यासासोबतच भरतनाट्यम,कथ्थक यासारख्या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतात. 7-8 वर्षाच्या मेहनतीनंतर अरंगेत्रमही पूर्ण होते. पण पुढे लग्न झाल्यानंतर, नृत्याव्यतिरिक्त करिअरच्या वेढ्यात अडकल्यानंतर अनेकजणींना पूर्णवेळ नृत्यावर लक्ष देणं जमत नाही. रियाझ थांबतो, सादरीकरणं थांबते. आणि मग वजन वाढणं, शरीर सुटणं यासारख्या समस्या वाढतात. या गोष्टी नेमक्या कशामुळे होतात ? डान्स बंद झाला तरीही फीटनेसच्या दृष्टीने स्वतःचे वजन आणि शरीर कसे सांभाळावे ? याबाबतचा खास सल्ला Fly High aerial art ची संस्थापिका, इंटरनॅशनल स्टर्टिफाईड एरिअल आर्ट इन्स्ट्रक्टर आणि मल्लाखांब या खेळासाठी शिव छत्रपती पुरस्कार विजेती आदिती देशपांडे यांनी दिला आहे.

  • डान्स करणं बंद झाल्यानंतर खरंच वजन वाढतं का ?

अनेक वर्षापासून तुम्ही नियमित एखादे नृत्य  करत असाल तर शरीराला त्याची सवय झालेली असते. नृत्य ही देखील जिमप्रमाणेच एक फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटी आहे. नृत्याच्या सरावादरम्यान शरीराची हालचाल होते आणि त्याद्वारा कॅलरीज बर्न होत असतात. त्यामुळे शरीराचे, वजनाचे चक्रही त्यानुसार आरोग्यावर परिणाम करत असते. जर ही फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटी बंद झाली तर सहाजिकच त्याचा परिणाम शरीरावर दिसू शकतो. वजन वाढू शकते. पण नृत्याच्या एका प्रकारातून दुसर्‍या प्रकारात गेल्यानंतर तितकासा वजनावर परिणाम दिसत नाही. या नृत्य प्रकारामुळे तासाभरात घटवा किमान 200 कॅलरीज !

  • डान्स क्लास बंद झाल्यानंतर काय करावे ?

अनेकींचे करिअर कालांतराने नृत्यापेक्षा वेगळे होते. अशावेळेस लग्नानंतर किंवा गरोदरपणाच्या काळात नृत्याचा सराव करणं शक्य नसते. अशावेळेस नृत्याऐवजी अन्य कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटी कटाक्षाने करावी. यामध्ये किमान नियमित वॉकिंग, रनिंग, सायकलिंग करावी. यासोबतच आहारात बदल करणं आवश्यक आहे. पूर्वी तुम्ही खूप गोड खाऊनही वजनावर त्याचा फारसा परिणाम दिसत नसेल पण तुम्ही कोणताच व्यायाम (फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटी) न करता  तितक्याच प्रमाणात गोड खाणंही चालू ठेवले तर सहाजिकच वजनदेखील वाढते. वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !

  • डाएटमध्ये काय बदल करावेत ?

खाणं आणि व्यायाम याचा योग्य समतोल राखता आला तर वजन आटोक्यात राहतेच पण त्याहीपेक्षा तुमचा एकूण फीटनेस जपण्यासाठी मदत होते. याकरिता तुमच्या शरीरानुसार तुमचा डाएट ठरवा. त्यासाठी तज्ञांची मदत घ्या. तुमच्या जीवनशैलीत बदल करा.गोड पदार्थ, कार्ब्सयुक्त पदार्थ कमी करा. फळांचा, भाज्यांचा आणि प्रोटीन्सचा आहारातील समावेश वाढवायला हवा. सतत गोड खाण्याच्या इच्छेवर मात करा या ’7′ उपायांच्या संगे !

  • डान्स क्लास बंद झाल्यानंतर फीटनेस वाढवण्यासाठी घरच्या घरी काय करता येऊ शकते ? 

डान्स बंद झाला तरीही तुमचा फीटनेस जपण्यासाठी घरच्या घरी प्लॅन्क, क्रॅन्चेस करावेत. ऑनलाईन मदत घेऊन काही अ‍ॅरोबिक्सचे प्रकारही करता येऊ शकतात. यासोबतच अगदी सोपा आणि कोणीही करू शकेल असा पर्याय म्हणजे नियमित किमान 12 सूर्यनमस्कार आणी अर्धा तास चालणं हा व्यायम अगदीच फायदेशीर आहे. सूर्यनमस्कार करण्याआधी आणि केल्यानंतर या गोष्टी टाळू नका!

 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>