Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Bariatric सर्जरी करण्यापूर्वी या ५ गोष्टींचे भान नक्की ठेवा

$
0
0

अनेकांना असे वाटत असते की वेटलॉस सर्जरी अथवा बॅरीअॅट्रीक सर्जरी हा शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचा एक साधा व सोपा मार्ग आहे.मात्र लक्षात ठेवा इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच या सर्जरीचे देखील काही फायदे व तोटे आहेत.त्यामुळे Bariatric सर्जरी करण्यापूर्वी तुम्ही या शस्त्रक्रियेसाठी पात्र आहात का हे जरुर तपासा व त्याचबरोबर या सर्जरी दरम्यान नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात याची देखील पुरेशी माहिती घ्या.मुंबईच्या Wockhardt hospital चे Bariatric सर्जरी डायरेक्टर डॉ.रमण गोएल यांच्यामते Bariatric सर्जरी करण्यापूर्वी या पाच गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात.

१.तुम्ही या शस्त्रक्रियेसाठी खरेच पात्र आहात का ?-

Bariatric शस्त्रक्रियेमध्ये औषधांचे पथ्य काटेकोरपणे सांभाळावे लागत असल्यामुळे प्रथम तुम्ही या शस्त्रक्रियेसाठी योग्य आहात का याची पडताळणी जरुर करा.एखाद्या व्यक्तीला आरोग्य समस्या अथवा आजार असल्यास त्याचा बीएमआय (बेसिक मेटाबॉलिझम इंडेक्स) कमीतकमी ३२.५ एवढा असणे आवश्यक असते.तर ज्याला कोणतीही वैद्यकीय समस्या नाही अशा व्यक्तीचा बीएमआय हा ३७.५ इतका असणे आवश्यक आहे.

मात्र कधीकधी काहीजण हा बीएमआय समजून घेण्यास चुक करतात.सामान्यत: एखाद्या व्यक्तीचे अतिरिक्त वजन २५ किलो असेल तर त्याला या शस्त्रक्रियेसाठी गृहीत धरण्यात येते.

उदा.एखाद्याचे आदर्श वजन हे ६५ किलो असायला हवे पण त्याचे प्रत्यक्षात वजन ९० किलो असेल तर ती व्यक्ती या शस्त्रक्रियेसाठी पात्र असू शकते.असे असले तरी काही केसेस मध्ये एखाद्या व्यक्तीचे अतिवजन असू शकते व त्याला अनियंत्रित मधूमेह यासारखा विकार देखील असू शकतो.तसेच कधीकधी एखादी व्यक्ती अतिलठ्ठ नसते पण तिचा मधूमेह अनियंत्रित असतो त्यामुळे ती व्यक्ती  या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरते.अशा स्थितीत त्या व्यक्तीचे २५ किलो ऐवजी १५ किलो अतिरिक्त वजन कमी करण्यात येते.जाणून घ्या कसे जिममध्ये न जाता, या मुलीने ‘८’ महिन्यांत घटवले 23 किलो वजन !

२.चांगल्या डॉक्टरांची निवड करा-

शस्त्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी चांगल्या डॉक्टरांची निवड करा.कारण प्रत्येक अतिवजन असलेल्या माणसाला या शस्त्रक्रियेची गरज असेलच असे नाही.जर तुम्ही ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पक्का केला असेल तर त्यासाठी तुम्हाला या श्रेत्रातील तज्ञ सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.यासाठी  Bariatric शस्त्रक्रियेचा चांगला अनुभव असलेल्या तज्ञ सर्जनचीच निवड करा.

३.शस्त्रक्रियेसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या नामांकित हॉस्पिटलची निवड करा-

शस्त्रक्रियेसाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नामांकित हॉस्पिटलचीच निवड करा कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अतिलठ्ठ माणसांची काळजी घेण्यासाठी लागणा-या  सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही.अतिलठठ माणसांना ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे टेबल,ट्रॉली,बेड,सीटीस्कॅन मशिन आणि आयसीयु विभाग हे त्यांच्यासाठी योग्य असणे गरजेचे अाहे.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते हॉस्पिटल इंटरनॅशनल संस्था किंवा सर्जिकल री विव्हू कॉर्पोरेशन द्वारे नामांकीत असावे.कारण ज्या हॉस्पिटलची गुणवत्ता चांगली असते त्यांनाच नामांकन देण्यात येते.

४.फक्त सर्जनच नव्हे तर त्यांची पूर्ण टीम तज्ञ असावी-

Bariatric सर्जरीनंतर रुग्णाची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असते.त्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान व नंतर ती व्यक्ती केवळ तज्ञांच्याच देखरेखी खाली असणे गरजेचे आहे.त्याचसोबत अशा वेळी रुग्णाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमधून चांगले डाएटीशन,फिजीशन व पॅथॉलॉजीस्ट यांची सेवा देखील पुरवण्यात येणे आवश्यक आहे.त्यासाठी शस्त्रक्रिये आधीच हॉस्पिटलमधून अशा तज्ञांची व्यवस्था पुरवण्यात येणार असल्याची खात्री करुन घ्या.

५.तुमच्या सर्जन सोबत तुमची शस्त्रक्रिया व त्याचा परिणाम याविषयी सखोल चर्चा करा-

तुमचे डॉक्टर तुम्हाला या शस्त्रक्रियेचे फायदे व तोटे जरुर सांगतील पण तरीही त्यांच्या सोबत तुमची शस्त्रक्रिया व त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम याविषयी व्यवस्थित चर्चा करा.कधीकधी तुमचे सर्जन तुम्हाला यासाठी निरनिराळ्या सर्जरीचे प्रकार सांगू शकतात.त्यामुळे तुमच्यासाठी bariatric शस्त्रक्रियेच्या संपुर्ण श्रेणीची निवड करा व त्याचा एकूण खर्च किती येणार याची देखील चौकशी करा.तसेच तुमच्या डॉक्टरांना या शस्त्रक्रियेमधील समस्या व मृत्यु दर याविषयी देखील माहिती देण्यास सांगा.जाणून घ्या कसे सर्जरी किंवा आधुनिक तंत्राने नव्हे तर या सच्च्या प्रयत्नांनी घटवले अनंत अंबानीने परिणामकारक वजन !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles