Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नृत्याचा छंंद जपत केली स्लीप डिस्कच्या समस्येवर मात !

$
0
0

३१ वर्षीय तनूश्री ढौंडियालला  डान्सरच व्हायचे होते.ती टीनएजमध्ये असतानाच टीव्हीवर बघून “एक दो तीन…” ”छैया छैया..” या गाण्यांच्या डान्सस्टेप्स वर थिरकत असे.लहानपणी अतिउत्साही व अॅथेलेटिक असल्याने तिला नेहमी असे वाटायचे की डान्स हे तिच्यामधील उर्जेचे नैसर्गिक उगमस्थान आहे.कॉलेजमध्ये असताना देखील तिने अनेक डान्स स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली होती.पण डान्स तिचे पॅशन असूनही तिने कधी डान्सचे योग्य प्रशिक्षण घेतले नाही.

तनूश्री ढौंडियाल याबाबत सांगते की, “ मी स्वत:च्या मनानेच उत्तम डान्स करु शकत असल्याने कधी डान्स क्लासमध्ये जाऊन नृत्याचे योग्य तंत्र शिकावे असे मला वाटले नाही.मी माझ्या कॉलेजमध्ये तासनतास नृत्याचा सराव करीत असे व दिवसाच्या अखेरीला अक्षरश: थकून जात असते.” 

तिला झालेली स्लिप डिस्क समस्या-

पण या सर्व थकव्याचा परिणाम तिच्या शरीरावर लवकरच दिसू लागला.वयाच्या २१ व्या वर्षी तिला भयंकर पाठदुखी होऊ लागली.तिला त्रास व वेदना असह्य झाल्यामुळे तिने यासाठी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला.स्पोर्टस डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी तिचे एमआरआय स्कॅनींग केले व तिला स्लिप डिस्क झाल्याचे निदान केले.सहाजिकच याचे कारण तिचे नृत्य करणे हेच होते.यासाठी वाचा कसे योगसाधनेतून करा पाठदुखीला अलविदा !

ती याबाबत सांगते की, “नृत्य करताना मी कोणत्याही नृत्य प्रकाराकडे अथवा त्याच्या विशिष्ट तंत्राकडे लक्ष दिले नाही.कारण मला केवळ नृत्य करण्यामध्येच फार आनंद मिळत असे.”

त्यानंतर तिच्या फिजिओथेरपिस्टने तिला दीड महिना केवळ सक्तीचा आराम करण्यास सांगितले.या काळात तिला तिचा रक्तपुरवठा सुधारण्यासाठी अल्ट्रासाउंड उपचार देण्यात आले.दीड महिन्यांनी तिचे फिजिओथेरपी सेशन सुरु करण्यात आले.त्यातील ब-याच एक्सरसाइज तिला योगासनांसारख्या असल्याचे आढळले.तसेच जाणून घ्या‘झुंबा’- वयाच, व्याधींच बंधन झुगारून फीटनेस राखण्याचा मजेशीर प्रकार !

स्लिप डिस्क बरा करण्यासाठी योगासने व डान्सचा झालेला फायदा-

तिला यातून बरे होण्यासाठी तिला योगा बॅले टिचर Soraya Franco यांची फार मदत झाली.याबाबत ती सांगते, “दुखापतीनंतर जेव्हा जवळजवळ दीड महिन्यांनी मी त्यांच्याकडे गेले.तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की मी वेदनेमुळे पुढे वाकणे जवळजवळ बंदच केले आहे.पण त्यांनी दिलेला सल्ला माझ्यासाठी फार मोलाचा ठरला.त्यांनी मला सांगितले की कितीही वेदना होत असली तरी एखाद्या स्थितीत जाणे पुर्णपणे बंद करणे अयोग्य आहे.त्यामुळे त्यांनी मला या वेदनेकडे उपचारात्मक दृष्टीने बघण्यास सांगितले.प्रथम त्यांनी मला या भागात ही समस्या का निर्माण झाली आहे ते समजावून सांगितले.त्यानंतर या वेदनेला कसे कमी करायचे हे ठरविण्यात आले.माझ्या मानेच्या मणक्याला खरेतर खाली वाकणे,मागे वाकणे,कमरेत वळणे,कडेला वळणे या सर्व हालचाली करण्याची गरज होती.मी नृत्यातील हालचाली करताना माझी पाठ लवचिक व मजबूत न ठेवल्यामुळे खरेतर मला ही दुखापत झाली होती.आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी पुढे वळत असतो मागे वळत नाही.आता योगासने व बॅले नृत्यामुळे मला या सर्व हालचाली सहज करता येतात.”

त्यानंतर तनुश्री योगासनांसह बॅले डान्सचा सराव करु लागली.तिने या हालचाली कशा कराव्या व कशा करु नये याबाबत तिला तिच्या प्रशिक्षकांनी सराव देण्यास सुरुवात केली.बॅले मधील हालचाली या तुमच्या संपुर्ण शरीर,पाय व नितंबांना मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात.यातून तिच्या असे लक्षात आले की नृत्य म्हणजे केवळ काही स्टेप्स अथवा हातपाय हलवणे नसून नृत्यातील प्रत्येक हालचाल करण्यासाठी एक विशिष्ट तंत्र असते.यासाठी नृत्य करण्यापूर्वी काही पुरक व पोषक हालचाली करणे गरजेचे असते ज्यामुळे तुम्ही नृत्यातील कठीण व आव्हानात्मक हालचाली देखील सहजतेने करु शकता व त्या करताना तुम्हाला त्रास  देखील होत नाही.थोडक्यात नृत्यामुळे तुम्हाला होलिस्टीक वर्कआउट मिळतो.तसेच यामुळे तुमच्या पाठदुखी,सांधेदुखी किंवा स्लिप डिक्स सारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात.

डान्स टिचर होण्याचा प्रवास-

डान्स शिकवण्याच्या कल्पनेतून तनूश्रीने २००९ साली Rahul D’lima याच्यासह TR Dance Company सुरु केली.या माध्यमातून Contemporary,Jazz,Ballet हे नृत्यप्रकार व त्यामधील निरनिराळे प्रकार ती शिकवू लागले.तनूश्रीच्या मते यातील त्याचे प्रमुख उद्दीष्ट यातून शरीरामध्ये लवचिकता व मजबूती निर्माण करणे हे अाहे.यासाठी ते संपूर्ण शरीराच्या व पायाच्या व्यायामवर भर देतात.बॅलेसाठी बॅरेवर ४० मिनीटे वर्म अप करावे लागते.कंटेम्पररी यासाठी  ते coccyx बॅलन्स व फ्लोअर एक्सरसाइज करुन घेतात.ते नेहमी प्रत्येक वर्गाच्या आधी कोब्रा स्ट्रेज आवर्जून करुन घेतात.कारण यामुळे तुमचे शरीर नृत्यासाठी तयार होते व नृत्य करताना तुमचे सर्व स्नायु सुस्थितीत राहतात.तुम्ही नृत्य करताना जेव्हा जंप करता तेव्हा पोटाच्या स्नायुंची तुम्हाला मदत मिळते व स्प्लीट करताना देखील हॅमस्ट्रींग्स तयार असणे गरजेचे असते.यासाठी अधिक जाणून घ्या डाएट, जिम नाही तर अमृताच्या फीटनेसचे रहस्य दडलयं या ‘छंदा’मध्ये !

तनुश्रीचा काय आहार घेते-

तनुश्री आठवड्यातून तीन दिवस बॅले,चार दिवस जॅझ व चार दिवस कंटेम्परी करते.ती दिवसभरात चार तास नृत्यासाठी देते.तसेच पोषक,साधा पण संपुर्ण आहार घेतला जाईल याची आवर्जून दक्षता घेते.

तिचा आहार-

प्री-ब्रेकफास्ट-नारळाचे पाणी.

ब्रेकफास्ट-२ अंडी,दुध व फळांसह ऑरगॅनिक मुसली(साखर किंवा मधाशिवाय)

लंच-२ पोळ्या,डाळ व भाजी.

दुपारी-एक ग्लास ताक अथवा कलिंगडाचा रस.

क्लासमध्ये-चणे व मनुका

डिनर- २ पोळ्या,डाळ,रायता व भाजी.

आठवड्यातून दोनदा-चिकन बिर्याणी,राजमा-भात,मटण किंवा चिकन करी व भात

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>