Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दीपिका पादूकोणप्रमाणे कसा बांधाल पफ पोनिटेल !

$
0
0

अभिनेत्री दिपिका पादुकोणच्या अभिनयाची जशी जादू तरूणांमध्ये आहे तशीच तिची स्टाईल स्टेटमेंटदेखील तरूणांवर भूरळ पाडते. तिच्या कपड्यांपासून हेअर स्टाईलच्या बाबतीत तरुणींमध्ये विशेष आकर्षण आहे. पफ पोनिटल ही दिपिकाची हेअरस्टाईल अगदीच सोपी आणि कोणत्याही आऊटफीटवर अगदी खुलून दिसणारी आहे.

फक्त आऊटिंगसाठी बाहेर पडताना असो किंवा पार्टीवेअरवर तयार होताना पफ पोनिटल अगदीच काही वेळात सहज बांधणं शक्य आहे. मग पहा दिपिका प्रमाणेच तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट कशाप्रकारे बांधाल पफ पोनिटेल. फिश टेल ( खजूर वेणी ) : उन्हाळ्यातील झटपट हेअर स्टाईल

 

पफ पोनिटेलसाठी तुमच्या कडे काय हवे ?

  • बारीक दातांची फणी
  • व्हॉल्युमायझिंग स्प्रे
  • बॉबी पिन्स
  • काही केस बांधण्यासाठी क्लिप्स

कसा बांधाल पफ पोनिटेल

  1. पफ पोनिटेल बांधण्यापूर्वी केस धुतले असतील तर त्या दमट केसांवर हा पोनिटेल बांधणं कठीण आहे. त्यामुळे नुकतेच केस धुतले नसतील तर पफ पोनिटेल अधिक खुलून दिसतो.  पण केस धुतले असतील तर ब्लो ड्राय नक्की करा आणि त्यानंतर हा पोनिटेल बांधा.
  2. कानाच्या रेषेतून सरळ डोक्याच्या वरच्या भागापर्यंत काही केस आणि खालच्या बाजूला उरलेले केस  असे दोन भागात विभाजन करा. त्यांना दोन  वेगवेगळ्या क्लिप्समध्ये बांधा.
  3. डोक्याच्या वरच्या भागातील केसांचा क्लिप काढा. त्यांना उलट्या बाजूने विंचरा म्हणजेच बॅककॉम्बिंग करा. तुमच्या केसांना पुरेसा व्हॉल्युम मिळावा म्हणून हेअर स्प्रे करा. थोडा वेळ केस सुकू द्यावेत. उरलेल्या भागावरही स्प्रे करून केसांना फणीने नीट विंचरा. (उरलेल्या केसांचे बॅककॉम्बिंग करू नका)
  4. बॅककोम्बिंग केलेले केस मोकळे सोडा. पण डोक्याच्या वरच्या बाजूला फुगवटा आला असेल तो तसाच राहू द्या. बारीक दाताच्या फणीने बाहेर आलेले केस तो फुगवटा न विस्कटता हलकेच विंचरा. यामुळे ते नीट आणि एका जागी व्यवस्थित बसतील. तसेच बारीक दातांची फणी वापरल्याने केसांच्या आतल्या भागापर्यंत ती पोहचणार नाही.
  5. डोक्यावरचा बॅक कोम्ब केलेला भाग आणि उरलेले केस एकत्र करून एकच पोनिटेल बांधा. डोक्यावरील पफ नीट टिकून रहावा असं वाटत असेल तर त्यांना बॉबी पिन्सने लॉक करा. यामुळे पफ हलणार नाही.
  6. तुम्हांला थोडा मेसी लूक हवा असेल तर कानाजवळील केस थोडे बाहेर काढून रोल करा.

तुम्हीही अशाप्रकारे पफ पोनिटेल बांधण्याचा घरी प्रयत्न करा. आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हांला नक्की सांगा कशी वाटतेय ही नवी हेअरस्टाईल.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>