Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Immunization Week: लसीकरणाविषयी या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

$
0
0

२४ ते ३० एप्रिल –  जागतिक लसीकरण सप्ताह 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननूसार दरवर्षी जवळजवळ ३ दशलक्ष लोक लसीकरण अभावी मृत्युमुखी पडतात.तसेच लहान बाळांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना इनफेक्शनचा धोका टाळण्यासाठी वेळेवर आवश्यक लसीकरण करणे फार गरजेचे अाहे. याबाबत लसीकरणाविषयी ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

बीसीजी लस-

Bacillus Calmette-Guerin बीसीजी लसीच्या एका डोसमुळे तुम्हाला क्षयरोगापासून संरक्षण मिळते.भारतामध्ये ही लस लहान बाळाच्या जन्मानंतर त्वरीत देण्यात येते.काहीवेळा लसीकरणानंतर त्या जागी एक लालसर लहान गाठ येते पण काही दिवसांनी ती कमी होते व त्या जागी फक्त लहानसा व्रण उरतो.क्षयरोगाचा धोका कमी करण्यासाठी या ’10′ गोष्टी वेळीच जाणून घ्या !

तोंडावाटे देण्यात येणारा पोलिओ डोस-

लहान मुलांचे पोलिओ पासून संरक्षण करण्यासाठी पोलिओचा डोस देणे फार गरजेचे असते.हा थेट मज्जासंस्थेवर हल्ला करणारा एक संसर्जजन्य आजार आहे.काही वेळा या इनफेक्शनमुळे पाय कायमस्वरुपी लुळे पडू शकतात.यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या लहान बाळाला पोलिओ डोस घेणे अनिवार्य आहे.यासाठी पहिल्या वर्षी बाळाला याचे पाच डोस देण्यात येतात व त्यानंतर दुस-या व पाचव्या वर्षी बुस्टर डोस देण्यात येतो.

जरी मुलांना नियमित पोलिओ डोस दिले गेलेले असले तरी देखील राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत पाच वर्षांच्या खालील सर्व मुलांना तोंडावाटे पोलिओ लसीचे दोन अधिक डोस देण्यात येतात. जर मुलांना डोस घेतल्यानंतर श्वास घेण्यास समस्या,आवाजामध्ये बदल,चक्कर अथवा हार्टबिट्स वाढण्याची समस्या दिसू लागली तर त्वरीत त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा कारण हे कदाचित अॅलर्जीचे लक्षण असू शकते.

DPT डीपीटी लस-

एक वर्षापर्यंतच्या मुलांना DPT डीपीटी लस(diphtheria, pertussis किंवा whooping cough व tetanus) चे तीन डोस देण्यात येतात.तसेच या लसीचे बुस्टर डोस दुस-या व पाचव्या वर्षी मुलांना देण्यात येतात.

धुळ,माती,चिखल यामध्ये सामान्यत: धर्नुवाताचे बॅक्टेरीया आढळतात.तुमच्या मुलांना जखमेतून हे इनफेक्शन होऊ नये यासाठी ही लस वेळीच देण्याचा सल्ला देण्यात येतो.काही वेळा या इंजेक्शनमुळे ताप येणे,गिळताना त्रास होणे,लस दिलेल्या जागेवर वेदना व लालसरपणा देखील होऊ शकतो.या लक्षणांना कमी करण्यासाठी डॉक्टर पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला देतात.पण जर ही लक्षणे लसीकरणांनंतर दोन किंवा अधिक दिवस जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

Measles (गोवर) लस-

Measles हा लहान मुलांमध्ये आढळणारा एक संसर्गजन्य विकार आहे.हा विकार बरा होत नसल्यामुळे काही वेळा यामुळे मृत्यु देखील येऊ शकतो.या विकारापासून वाचण्यासाठी फक्त एकमेव पर्याय असतो तो म्हणजे बाळाला नवव्या महिन्यामध्ये गोवरची लस देणे.

आजकाल एमएमआर लस देऊन गोवर तसेच गालगुंड व रुबेलापासून संरक्षण करता येते.ही एक लस या तीन रोगांपासून वाचण्यासाठी बाळाला आयुष्यभर रोगप्रतिकारशक्ती पुरवते.या लसीचे दोन डोस देण्यात येतात.यापैकी पहिला डोस बाळाला १२ ते १५ महिन्यांच्या काळात व दुसरा डोस ४ ते ६ वर्षांपर्यंत देण्यात येतो.या विकारांच्या स्वतंत्र लस उपलब्ध असल्या तरी पुन्हा पुन्हा इंजेक्शन देणे टाळण्यासाठी या लसींचे कॉम्बिनेशन बाळाला देण्यात येते.

पर्यायी लस-

वर दिलेल्या सर्वच लस घेणे फार आवश्यक आहे.पण खाली दिलेल्या काही लसी देखील काही ठराविक आजारांपासून वाचण्यासाठी गरजेच्या असू शकतात.मात्र त्या फार खर्चिक असल्यामुळे ठराविक लोकच त्या घेतात.

हिपॅटायटीस बी लस-

ही एक लस पर्यायी लस आहे.मात्र या आरोग्य स्थितीमुळे ८० टक्के यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते यासाठी भारतीय आरोग्य मंत्रालयाने या लसीकरणाला राष्ट्रीय लसीकरणाचा एक भाग करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी बाळाच्या जन्मानंतर त्वरीत या लसीचा पहिला डोस बाळाला देण्यात येतो व त्यानंतर बाळ सहा,दहा व चौदा आठवड्यांचे असताना त्याला उर्वरित डोस देण्यात येतात.यासाठी वाचा हिपॅटायटिस – कारणे, लक्षणं आणि निदान !

कांजण्यांवरील लस-

हा विकार प्राणघातक नसल्याने अनेक लोक यावर लस घेत नाहीत.तसेच हा विकार झाल्यावर किंवा याचे इनफेक्शन झाल्यावर शरीर त्या विरोधात स्वत:ची एक नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती विकसित करते.ज्या महिलांना लहानपणी कांजण्या येत नाहीत त्यांना गरोदरपणी कांजण्या येण्याची शक्यता असल्याने डॉक्टर ही लस घेण्याचा सल्ला देतात.तसेच वाचा कांजण्या आल्यावर आंघोळ का टाळावी ?

Hib(एचआयबी)लस-

हैमोफिलस इन्फ्लूएंझा टाईप बी इनफेक्शन पासून संरक्षण करण्यासाठी ही लस देण्यात येते.या इनफेक्शनमुळे लहानपणी न्यूमोनिया,bacterial meningitis आणि septicemia हे विकार होऊ शकतात.भारतात एचआयबी लस ही डीटीपी व हिपॅटायटीस बी या लसीच्या कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहे.या लसीच्या एका डोसमुळे पाच विकारांपासून बचाव करता येतो.ही लस बाळाया ला ६,१० व १४ आठवड्यांनी देण्यात येते.

प्रौढांसाठी लस-

लसीकरण सामान्यत: लहान मुलांना देण्यात येते पण काही विकारांपासून बचाव करण्यासाठी प्रौढांना देखील लसीकरणाची  तितकीच गरज असते.

प्रौढांना देण्यात येणा-या लस-

  • प्रौढांना धर्नुवात बुस्टर डोस व यकृताचा कॅन्सर टाळण्यासाठी हिपॅटायटीस बी लस देण्यात येते.यासाठी जाणून घ्या गरोदरपणात धर्नुवात प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असते का ?

  • प्रत्येक मुलीने ११ ते १२ व्या वर्षी मासिक पाळी सुरु झाल्यावर गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस घ्यावी.

  • अस्थमा अथवा गंभीर फुफ्फुसांचा विकार,रोग प्रतिकारशक्ती कमी असलेली वृद्धमाणसे,मधुमेही,केमोथरपी घेणारे रुग्ण व एचआयव्ही बाधित रुग्णांना स्वाइन फ्लू पासून बचाव करण्यासाठी Pneumococcal vaccine दिले जाते.

लसीकरणामुळे काही काळ वेदना होतात पण ते तात्पुरते असते.लसीकरणामुळे गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढत असते.यासाठी स्वत:च्या  व प्रियजनांच्या निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या लसी अवश्य घ्या.

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>