सामान्यत: टीनएज मधील मुलामुलींना अॅक्नेची समस्या तीव्रतेने जाणवते.यावर सहसा लेझर व लाईट बेस ट्रिटमेंट करण्यात येत असल्या तरी आता डर्माटॉलॉजी क्षेत्रात यासाठी अनेक प्रगत अॅक्ने ट्रिटमेंटचा शोध लावण्यात आला आहे.या उपचारांमध्ये अगदी काही मिनीटांमध्ये लेझर लाईटच्या सहाय्याने अॅक्नेमधील बॅक्टेरिया नष्ट करुन त्वचेमध्ये होणारी अतिरिक्त तेलाची निर्मिती कमी करण्यात येते.
वर्ल्ड कॉग्रेस ऑफ कॉस्टमेटीक डर्माटॉलॉजीस्टच्या १२ व्या एडीशनचे प्रेसीडंट प्रसिद्ध Dermatologist Dr.Venkataram Mysore यांच्याकडून जाणून घेऊयात या आधुनिक अॅक्ने उपचारांचे महत्व ज्या उपचारांना लंच-टाइम प्रोसिजर असे देखील म्हटले जाते.
अॅक्ने उपचारांची आधुनिक प्रगती-
अॅक्नेवर Antibiotics किंवा Retinoids घटक असलेल्या लोकल क्रीमने उपचार करता येऊ शकतात.काही विशेष प्रकरणांमध्ये यासाठी Antiandrogens आणि Oestrogen चे कॉम्बिनेशन वापरण्यात येते.अनेक लोकांना अॅक्नेची समस्या तीव्र झाल्यावरच ही एक गंभीर समस्या आहे हे लक्षात येते.त्यामुळे यातील काही लोक त्यानंतर स्टिरॉइड बेस क्रीम वापरतात ज्यामुळे अॅक्ने तात्काळ दाबून टाकल्या जातात.पण या लोकांच्या हे लक्षात येत नाही की हा या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे.यामुळे पुढे त्यांना भयंकर दुष्परिणाम व अॅक्ने पुन्हा तीव्रतेने येण्याची शक्यता असते.सातत्याने या क्रीमचा वापर केल्यामुळे इनफेक्शन होऊ शकते.विशेषत: यामुळे फंगल इनफेक्शन,चेह-यावर केस येणे किंवा त्वचा संवेदनशील झाल्यामुळे चेहरा लाल होण्याची देखील शक्यता देखील असते.टीन एजमधील मुले-मुली ब-याचदा स्वत:च्याच मनाने अशा क्रीमचा वापर करतात व त्वचा समस्या अधिक गंभीर झाल्यामुळे डिप्रेशन मध्ये जातात.यासाठी या उपायांंनी अॅक्नेच्या समस्येपासून मिळवा कायमची सुटका
झेनोने पिम्पल्सना नष्ट करणे-
पिम्पल्स कमी करण्यासाठी ओवर-दी-काउंटर उपचारांमध्ये दाखल झालेले झेनो हे एक नवीन साधन आहे.यातील छोट्या इलेक्ट्रॉनिक पिंम्पल झॅपरने अॅक्ने नष्ट केल्या जातात.हे साधन एका मोठ्या सिगारेट लाइटर प्रमाणे दिसते.तसेच या साधनामुळे कमीतकमी २ ते ३ मिनीटे मर्यादित उष्णतेचा पुरवठा थेट अॅक्नेवर करता येतो.ज्यामुळे पिम्पल्स आपोआप स्वत:हून कमी होतात.पण अॅक्ने लहान स्वरुपात असतील तरच याचा फायदा होऊ शकतो.पिम्पल्सचा तीव्र दाह होत असल्यास याचा काहीही फायदा होऊ शकत नाही.हे उपचार फक्त सौम्य अॅक्ने समस्या असलेल्या लोकांना व चेहरा नितळ करण्या-यांसाठीच उपयोगी पडतात.यासाठी चेहर्यावर पिंपल येण्याच्या जागेवरून ओळखा त्यामागील कारण
Isotretinoin चा उपयोग-
Isotretinoin हे व्हिटॅमिन ए घटक असलेले एक औषध आहे.हे औषध अॅक्नेसाठी कारणीभूत असलेल्या Sebaceous glands या ग्रंथीचे कार्य कमी करते.याचा फायदा असा होतो की तुम्ही अगदी हे औषध घेणे बंद केल्यावर देखील पिंपल्सपासून दीर्घ काळासाठी संरक्षण मिळू शकते.हे एकमेव असे औषध आहे ज्यामुळे औषध बंद केल्यावर देखील त्याच्या परिणामांमुळे तुम्हाला २ ते ३ वर्ष पिंपल येत नाही.यासाठी जाणून घ्या त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे
Fractora ट्रिटमेंट-
ही एक कायस्वरुपी,कमी खर्चिक व सर्व प्रकारच्या त्वचा रंगावर उपयोगी अशी ट्रिटमेंट आहे.या उपचारांसाठी कमीत कमी चार सिटींग ची गरज असते कारण यात रेडीओ फ्रिक्वेसी द्वारे अॅक्ने येणे कमी करण्यासाठी व त्याच्या डागांवर देखील एकाचवेळी उपचार केले जातात.डाग,पिम्पल व अॅक्नेवर उपचार करण्यासाठी रेडीओ फ्रिक्वेन्सीचा वापर करण्यात येतो.या उपचारामुळे खरेतर अॅक्ने निर्माण करणा-या तुमच्या तैलग्रंथी बंद केल्या जातात ज्यामुळे तुमची अॅक्नेची समस्या देखील कमी होतेत.तसेच याचा तुमच्या कोलेजनच्या उत्तेजनासाठी देखील चांगला फायदा होतो.
फंक्शनल लेझर थेरपी-
हे उपचार तुमच्या त्वचेमधील मायक्रो-इन्जुरी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करतात व तुमची त्वचा आतून बरी करतात.यीस्टरइयर ट्रिटमेंट प्रमाणे यामुळे तुमच्या त्वचेचा पृष्टभाग नष्ट केला जातो.फ्रॅक्शल हा एक पिक्सलेटेड-टाइप डिस्ट्रक्शनसारखाच प्रकार आहे. फ्रॅक्शल थेरपीमुळे मायक्रो-थर्मल झोन निर्माण होतो ज्यामुळे नवीन कोलेजन निर्माण होते.या थेरपीमुळे फक्त तीव्र अॅक्नेवर उपचार केले जात नाहीत तर यामुळे फाइन लाइन,इनलार्ज पोर्स,डार्क स्पॉट व पिंगमेंटेशन समस्या देखील कमी करता येते.
पल्स डाय लेझर (पीडीएल) ही इतर लेझर उपचारांपेक्षा एक युनिक लेझर ट्रिटमेंट आहे-
यामध्ये लालसर पिम्पल्सवर उपचार करण्यात येतात.कारण हे उपचार थेट तुमच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतात ज्यामुळे तुमचे पिम्पल्स लवकर बरे होतात.या क्रियेमध्ये लाईटच्या रुपांतरीत उष्णतेमुळे रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूच्या बिघाड झालेल्या त्वचेवर कार्य केले जाते.या प्रोसेसला आठवडा अथवा १० दिवस लागतात.यातील सेशनसाठी जास्तीतजास्त १० ते १५ मिनीटे लागतात.या सिटींग किती असतील हे मात्र त्या व्यक्तीवर अवलंबून असू शकते.पण साधारणपणे दोन ते तीन सेशन मध्ये उपचार केले जाऊ शकतात.अॅक्ने, ब्लॅकहेडचा त्रास दूर करण्यासाठी कसा कराल मुलतानी मातीचा वापर हे देखील जरुर वाचा.
फ्रॅक्शनल लेझर उपचार-
फ्रॅक्शनल लेझर उपचार ही नॉन-इनवेसिव ट्रिटमेट असतात.ज्यामध्ये स्कीनवर फ्रॅक्शन उपचार करण्यासाठी मायक्रोस्कोपिक ट्रिटमेंट झोन्स मध्ये विभाजित केलेले लेझर बीम असलेले साधन वापरण्यात येते.असा विचार करा की हे उपचार एका फोटोग्राफिक इमेजप्रमाणे असतात ज्यामध्ये टप्प्याटप्याने पिक्सेलमध्ये बदल होतात.हे उपचार इपिडर्मिस(त्वचेच्या पृष्टभागावरील पेशी )व डर्मल कोलेजन(त्वचेच्या मधल्या भागाचा थर) या दोन्हींवर कार्य करतात.सर्जिकल व अॅक्नेचे स्कार्स,फेशियल लाइन,सुरकुत्या,सन डॅमेज आणि स्कीन पिगमेंटेशनसाठी हे उपचार करण्यात येतात.यासाठी घेण्यात येणारे तीन ते चार सेशन महिन्यातून एकदा घ्यावे लागतात.मात्र हे उपचार खोलवर झालेल्या डागांवर कार्य करत नाहीत.जाणून घ्या चेहर्यावर पुन्हा त्याच जागी पिंपल का येतो ?
मायक्रोनीडल रेडीओ फ्रिक्वेन्सी-
फ्रॅक्शनल लेझर उपचारांपेक्षा मायक्रोनीडल रेडीओ फ्रिक्वेन्सी उपचार सुरक्षित मानन्यात येतात.हे मायक्रोनीडल्स त्वचेच्या ठराविक खोलीपर्यंत वापरण्यात येतात त्यामुळे रेडीओफ्रिक्वेन्सी इनर्जी त्वचेच्या आत सोडण्यात येते.या क्रियेमुळे त्वचेच्या खोलवर असलेल्या टीश्यूजना उष्णता मिळाल्यामुळे कोलजनच्या निर्मितीला व नवीन कोलेजन फायबरला चालना मिळते.यासाठी लहान सोनेरी सुया वापरण्यात येतात ज्या इंटरनल कंडक्टर म्हणून कार्य करतात.त्वचेच्या आतील खोलवर असलेल्या व जुन्या डागांवर ही एक सर्वात परिणामकारक ट्रिटमेंट आहे.या प्रोसेससाठी ३ ते ४ सिटींग घ्याव्या लागतात.या उपचारांच्या रिकवरी साठी एक दिवस पुरेसा असतो.तसेच हे उपचार संवेदनशील त्वचेसाठी देखील योग्य असतात.एजींग चेंजेस,लूज स्कीन व सुरकुत्यांवर देखील हे उपचार करण्यात येतात.
यासाठी एक नवीन सुपर लेटेस्ट उपचारांचे माध्यम जे लवकरच मार्केटमध्ये दाखल होणार ते म्हणजे गोल्ड नॅनोपार्टीकल ट्रिटमेंट.हे उपचार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत पण त्यावर संशोधन सुरु आहे.यामध्ये त्वचेच्या ग्रंथीमध्ये गोल्ड पार्टीकल सोडून त्यांना एका विशिष्ट लेझरच्या सहाय्याने उष्णता देण्यात येईल.मात्र हा उपचार अजूनही संशोधनाच्या टप्प्यावर असल्याने तो वापरणे शक्य नाही.
लक्षात ठेवा तुम्ही यापैकी कोणतीही पिंपल ट्रिटमेंट निवडली तरी या उपचारांमुळे तुमची त्वचा कोरडी होत असल्याने तुम्हाला नियमित त्वचा मॉश्चराइज करण्याची गरज अाहे.यासाठी तुमच्या डर्माटॉलॉजिस्टकडून चांगल्या मॉश्चराइजर क्रीमबद्दल माहीती घ्या व कमीतकमी ४ ते ५ दिवस कोणतेही सौदर्यप्रसाधन वापरणे पुर्णपणे टाळा.त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय अवश्य वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock