कधीकधी गरोदर आहे हे माहित नसल्यामुळे किंवा नऊ महिने सेक्शुअल गरजांसाठी वाट पहावी लागू नये यासाठी गरोदर महिला देखील सेक्स करु शकतात.पण गरोदरपणातील सेक्स कधीकधी धोकादायक देखील ठरु शकतो.प्रेगन्सी सेक्स सुरक्षित जरी असले तरी काहीवेळा यामुळे तुम्हाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.विशेषत: तेव्हा जेव्हा या काळात सेक्स करताना स्त्री-पुरुष दोघेही योग्य ती काळजी घेत नाहीत.
हार्ट टू हार्ट काउंसलिंगचे सेक्सोलॉजिस्ट डॉ.राजन भोसले यांच्याकडून जाणून घेऊयात प्रेगन्सी सेक्स करताना अनेक कपल काय चुका करतात.ज्यामुळे कदाचित मिसकॅरेज होणे अथवा आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
पहिल्या तिमाहीमध्ये सेक्स करणे-
डॉक्टर तुम्हाला गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सेक्स करु नका असा सल्ला देतात कारण गर्भाच्या विकासासाठी हा काळ अत्यंत कठीण काळ असतो.या काळातच स्त्रीच्या गर्भाशयाच्या वरील भागात गर्भाची गर्भनाळ रुजत असते.सेक्स दरम्यान होणा-या जलद हालचालींमुळे गर्भनाळेला रुजणण्यासाठी अडथळा येऊ शकतो.यासाठी वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यामध्ये सेक्स करणे-
गरोदरपणाच्या शेवटचा महिन्यामध्ये देखील सेक्स करणे फारच धोकादायक ठरु शकते.डॉ.भोसले यांच्यामते यासाठी प्रसुती काळ जवळ आल्यावर अशा जोडप्यांनी सेक्स करणे टाळावे कारण या काळात सेक्स केल्यास त्या स्त्रीला लवकर प्रसव वेदना सुरु होऊ शकतात.
वुमन-ऑन-टॉप(डब्लूओटी) या पोझिशनमध्ये सेक्स न करणे-
गरोदर महिलेच्या पुरुषांनो सेक्स दरम्यान तिला तुमच्यावर नियंत्रण ठेऊ द्या.वुमन-ऑन-टॉप(डब्लूओटी) ही पोझिशन कदाचित या काळात एक बेस्ट सेक्स पोझिशन असू शकते.कारण या पोझिशनमुळे स्त्रीला सेक्स दरम्यान होणा-या स्पीड व इन्टेसिटीवर नियंत्रण ठेवता येते.पण काही जोडप्यांना मिशनरी पोझिशन आवडत असल्यामुळे ते डब्लूओटी पोझिशनचा वापर करीत नाहीत.मिशनरी पोझिशन मुळे गरोदर स्त्रीच्या पोटावर दाब येऊ शकतो.यासाठी डॉ.भोसले गरोदरपणी सेक्स करताना वुमन-ऑन-टॉप(डब्लूओटी) ही पोझिशन वापरण्याचा सल्ला देतात.तसेच जाणून घ्या गरोदर स्त्रियांनी पाठीवर का झोपू नये ?
स्त्रीला Placenta Previa असताना सेक्स करणे-
सामान्यत: गर्भधारणेनंतर गर्भनाळ स्वत:हून गर्भाशयाच्या वरच्या भागात जोडली जाते.पण काही वेळा गर्भनाळ गर्भाशयाच्या मुखाजवळ अथवा गर्भाशयाच्या खालील भागात रुजते.या स्थितीला Placenta previa असे म्हणतात.अशा वेळी सेक्स करणे विशेषत: गर्भासाठी धोकादायक ठरु शकते.
ओरल सेक्सच्या परिणांमाकडे दुर्लक्ष करणे-
जरी काही गायनेकॉलॉजिस्ट सेक्सला पर्याय म्हणून गरोदरपणी तुम्हाला ओरल सेक्सचा सल्ला देत असले तरी त्यामुळे तुम्हाला कोणताही धोका नसतो असे मुळीच नाही.डॉ.भोसले यांच्यामते ओरल सेक्समध्ये पुरुषांकडून महिलेला ओरल सेक्सचा आनंद देताना तिच्या व्हजायनामध्ये हवा शिरु शकते.ज्यामुळे Air embolism ही समस्या निर्माण होऊ शकते.ही एक अशी गंभीर परिस्थिती असते ज्यामध्ये कदाचित गर्भनाळ फाटण्याची देखील शक्यता असू शकते. तसेच ओरल सेक्समुळे HIV चा प्रसार होऊ शकतो का ? हे देखील जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock